ई-सिगरेटच्या वापराने खरंच धूम्रपानाचे व्यसन सुटते कि नाही?

धूम्रपान, सिगरेट, सिगार हे शब्द तर आपल्या परिचयाचे आहेत पण ही ई सिगरेट म्हणजे नेमके काय? भारतात ह्या ई सिगरेटसना मान्यता आहे का?

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.

धूम्रपान करणे, सिगरेट ओढणे वाईट हेच आपल्या मनावर ठसलेले आहे आणि ती गोष्ट खरी देखील आहे. धूम्रपानाचे आरोग्यावर खूप हानिकारक परिणाम होतात. म्हणूनच धूम्रपान करण्याचे व्यसन लागलेल्या लोकांची ही सवय सुटावी म्हणून ई सिगरेट किंवा इलेक्ट्रोनिक सिगरेट बाजारात आली. परंतु हळूहळू लोकांना ह्या ई सिगरेटचं सुद्धा व्यसन लागायला लागलं. त्याचेही आरोग्यावर दुष्परिणाम दिसू लागले.

महत्वाची बाब अशी की भारतातील युवा पिढीवर ह्याचे दुष्परिणाम होऊ नयेत म्हणून आता भारत सरकारने ई सिगरेटच्या निर्मिती, इम्पोर्ट, एक्सपोर्ट, विक्री, जाहिरात ह्या सर्वांवर बंदी आणली आहे. पण ही ई सिगरेट म्हणजे नेमके आहे तरी काय?

ई-सिगरेट म्हणजे नेमके काय?

इलेक्ट्रॉनिक सिगरेट जिला ई-सिगरेट असे म्हटले जाते ते एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस आहे. हे डिवाइस बॅटरीवर चालते आणि निकोटीन सोल्युशनचे एरोसोल म्हणजेच एक प्रकारच्या धूर अथवा धुक्यामध्ये रूपांतर करते. ज्याप्रमाणे साध्या सिगरेटचा धूर शरीराच्या आत प्रवेश करतो त्याच प्रकारे या ई-सिगरेटचा हा धूर नाकावाटे आत घेता आणि बाहेर सोडता येतो. महत्त्वाची गोष्ट अशी की या e-cigarette मध्ये तंबाखू नसते आणि साध्या सिगरेटप्रमाणे ती जळत देखील नाही. तंबाखू नसल्यामुळे e-cigarette आरोग्याच्या बाबतीत कमी हानिकारक असते.

ई-सिगरेट ही खऱ्या सिगरेट सारखीच दिसते आणि ती ओढली असता जणू आपण खरी सिगरेटच ओढत आहोत असे ओढणाऱ्या व्यक्तीला वाटते. याचा उपयोग करून धूम्रपानाचे व्यसन सोडवण्यासाठी लोक प्रयत्न करतात.

ई-सिगरेट दिसायला साध्या सिगरेट सारखीच असते, ती साध्या सिगरेटच्या आकारात तर मिळतेच पण हुक्का किंवा पाईपसारख्या आकारात सुद्धा मिळते. तसेच ती पेन, शिट्टी, लाइटर अशा निरनिराळ्या आकारात देखील मिळते. सिगार, हुक्का किंवा पाईप ह्या आकारांमुळे लोकांना आपण सिगार, हुक्का किंवा पाईप ओढत आहोत अशी फिलिंग येते.

ई-सिगरेट कशी काम करते?

वेगवेगळ्या आकारात मिळणारी ही ई सिगरेट ओढणाऱ्या व्यक्तीने तोंडात धरली की ऍक्टिव्हेट होते. बॅटरीचा वापर होऊन e-cigarette मध्ये असणारे निकोटीन सोल्युशन गरम होते आणि त्यातून धूर निर्माण होतो. हा धूर सिगरेट ओढणाऱ्या व्यक्तीच्या शरीरात श्वासावाटे जातो. पुन्हा श्वासावाटे बाहेर टाकला जातो. हे दर्शवणारा एक एलईडी इंडिकेटर सुद्धा ई सिगरेट वर असतो.

ई-सिगरेटची बॅटरी चार्जरने अथवा युएसबी पोर्टने चार्ज करता येते. तसेच ह्यामध्ये असणारे निकोटिन सोल्युशन आणि फ्लेवर्ड लिक्विड असणारे कार्ट्रीज पुन्हा पुन्हा भरता येते.

ई-सिगरेटमध्ये वापरल्या जाणाऱ्या फ्लेवर्ड लिक्विडमध्ये निकोटीन, प्रॉपलिन ग्लायकॉल, ग्लिसेरॉल, फ्लेवरिंग एजेंटस् आणि इतर काही केमिकल्स असतात. ही सर्व द्रव्ये आणि निकोटीन सोल्यूशन ह्यांच्या मिश्रणाने जो फ्यूम किंवा धूर निर्माण होतो तो सिगरेट ओढणाऱ्याच्या फुफ्फुसांमध्ये प्रवेश करतो.

ई-सिगरेट नेहेमीच्या सिगरेटपेक्षा कशी वेगळी असते? किती सुरक्षित असते?

जगाच्या पाठीवर बहुतेक सगळ्या लोकांचा असा समज आहे की ई सिगरेट ही नेहमीच्या सिगरेटपेक्षा सुरक्षित असते आणि तिच्या वापराने आरोग्यावर कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. परंतु दुर्दैवाने ही गोष्ट खरी नाही. ई-सिगरेट देखील आरोग्यासाठी तितकीच अपायकारक आहे.

ई-सिगरेटमध्ये सुद्धा नेहमीच्या सिगरेट प्रमाणे निकोटीन, अतिशय बारीक केमिकल्सचे कण, काही मेटल्सचे कण हे आरोग्याला अपायकारक असणारे पदार्थ असतात.

जमेची बाब इतकीच की नेहमीच्या सिगरेटपेक्षा कमी प्रमाणात टॉक्सिक पदार्थ ई-सिगरेटमध्ये असतात. परंतु तरीही ह्या सिगरेटपासून आरोग्याला होणारा धोका कमी होत नाही.

ई-सिगरेटचे साईड इफेक्ट कोणते?

ई-सिगरेटचा वापर करून नियमित धूम्रपान केल्यास

१. माणसाच्या मेंदू हृदय आणि फुफ्फुसांवर थेट परिणाम होऊ शकतो.

२. यामध्ये निकोटिन असल्यामुळे त्याचे देखील व्यसन सहजपणे लागू शकते.

३. गर्भवती स्त्रियांनी e-cigarette ओढल्यास गर्भाच्या मेंदूच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो.

४. ह्या सिगरेटमुळे मेटॅलिक कण, बारीक केमिकल्स थेट फुफ्फुसांमध्ये जाऊन अडकून बसू शकतात. त्यामुळे पुढे ब्रोंकाइटिस किंवा न्युमोनिया होऊ शकतो.

५. ई सिगरेटचा थेट परिणाम दात आणि हिरड्या यांच्या आरोग्यावर होतो.

६. खूप जास्त काळ ई सिगरेटचा वापर केल्यास शरीरात रक्ताच्या गुठळ्या होणे किंवा कॅन्सरसारखे गंभीर आजार होणे याची शक्यता वाढते.

७. ई-सिगरेटच्या बॅटरी किंवा निकोटीन सोल्यूशनमुळे अपघात होऊन काही व्यक्ति जखमी झाल्याच्या घटना देखील घडल्या आहेत.

८. ह्या ई सिगरेटींचे व्यसन लागत असल्यामुळे ई सिगरेट मिळाली नाही तर व्यसनी माणसाला होणारा त्रास अशा व्यक्तिंना होऊ शकतो.

ई-सिगरेट खरंच धूम्रपानाचे व्यसन सोडवण्यासाठी उपयोगी असते का?

जेव्हा ई-सिगरेट बाजारात आणली गेली तेव्हा तिची जाहिरात धूम्रपानाचे व्यसन सोडवण्यासाठी उपयोगी अशा पद्धतीने केली गेली. धूम्रपानाच्या व्यसनामुळे त्रस्त झालेले आणि आजारी पडलेले लोक सहाजिकच या नव्या ई-सिगरेटकडे आकर्षित झाले. परंतु थोड्याच दिवसात असे लक्षात आले की त्यांचे धुम्रपानाचे व्यसन तर सुटले नाहीच परंतु या नव्या ई-सिगरेटचे व्यसन मात्र त्यांना लागले.

बहुतेक सर्व लोकांनी दोन्ही पद्धतीच्या सिगरेटी ओढणे सुरू ठेवले. याच कारणामुळे भारतामध्ये सध्या ई सिगरेट वर बंदी आहे. तसेच एफडीएने सुद्धा e-cigarette हे धुम्रपानाचे व्यसन सोडवण्याचा उपाय नाही असे सांगितले आहे.

निष्कर्ष

यावरून आपल्या असे लक्षात येते की e-cigarette सुद्धा नेहमीच्या सिगरेट इतकीच आरोग्यासाठी अपायकारक आहे. तिचे देखील व्यसन लागू शकते. आणि कोणतेही व्यसन आरोग्यासाठी चांगले नाही. व्यसनाचे आरोग्यावर गंभीर परिणाम होतात, जीवाला धोका सुद्धा निर्माण होऊ शकतो.

जर तुम्हाला धूम्रपान करण्याचे व्यसन लागले असेल तर ते सोडवण्यासाठी ई-सिगरेटच्या नादी न लागता तज्ञ डॉक्टर आणि व्यसनमुक्ती केंद्रातील लोक यांचा सल्ला घ्या आणि धूम्रपानाच्या व्यसनातून स्वतःला सोडवा.

तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचावी म्हणून हा लेख शेयर करायला विसरू नका.

स्वस्थ रहा, आनंदी रहा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय