बघा जपानी शाळा कशा असतात? काय फरक असतो, त्यांच्या शाळेत आणि आपल्या शाळेत

जपानच्या प्राथमिक शाळेतील मुलांची ओळख म्हणजे “रांदोसेरू” दप्तर.
जपानच्या प्राथमिक शाळांमध्ये खरोखरच परीक्षा नसतात का?

जपानमधील बहुतांश प्राथमिक शाळांमध्ये विशेष कप्प्याचं दप्तर वापरलं जातं.

त्याला म्हणतात रांदोसेरू, हे केवळ प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी बनवलेलं दप्तर आहे.

विद्यार्थ्यांसाठी ते शालेय गणवेशाच्याऐवजी वापरलं जातं…

japanese School Kid Backpack

जपानमधील प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांच्या मूल्यमापन पद्धतीबद्दल ही जाणून घ्या.

जपानमधील प्राथमिक शाळांमध्ये, एका वर्गातून दुसऱ्या वर्गात जाण्यासाठी, उत्तीर्ण व्हायला कोणत्याही परीक्षा नाहीत.

हे वाचून भारतातील मुलांनाही वाटेल की त्यांच्या शाळेतही अशी पद्धत असती तर!

१) शाळेची दिनचर्या – मध्यान्ह भोजन आणि स्वच्छता

जपानमधील जवळपास सगळ्याच प्राथमिक शाळांमध्ये दुपारी गरम, संतुलित आहार दिला जातो.

जेवण वाढणे आणि त्यानंतरची साफसफाई ही सर्व कामं विद्यार्थी करतात.

रोजच्या साफसफाईची वेळही ठरलेली असते.

क्लासरूम आणि कॉरिडॉरपासून टॉयलेटपर्यंत विद्यार्थी दररोज स्वत:च्या हाताने स्वच्छता करतात.

school in japan

२) अभ्यासाव्यतिरिक्त कसा असतो जपानी शाळांचा दिनक्रम ?

न्यूगाकुशिकी आणि “सोत्सुग्योशिकी” – हे आहेत मुलांच्या प्रगतीचा उत्सव साजरा करण्याचे दिवस.

जपानच्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये होणारा “न्युगाकुशिकी” उत्सव म्हणजे प्रवेशचा समारंभ.

तर “सोत्सुग्योशिकी” म्हणजे दीक्षांत समारंभ आहे.

या उत्सवांमध्ये, शाळेत प्रवेश घेणारे नवीन विद्यार्थी, शाळेतून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी, आणि शाळेतले बाकीचे विद्यार्थीसुद्धा सहभागी होतात.

school in japan

३) सर्वांगीण विकासासाठी अभ्यासक्रमात खेळ अत्यावश्यक आहे.

जपानी शाळांमध्ये खेळ हा एक अनिवार्य विषय आहे.

वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळल्यानं वयोमानानुसार शारीरिक शक्ती आणि शारीरिक क्षमता विकसित होते.

याचबरोबर, मुलं खेळाचे नियम, सांघिक सहकार्य आणि शारीरिक व्यायामाचा आनंद याबद्दल शिकतात.

जपानी शाळांमध्ये उन्हाळ्यात पोहण्याचे वर्गही घेतले जातात.

४) आपत्ती व्यवस्थापनसाठी असणारा अभ्यासक्रम हा जीवन रक्षक ठरतो (Disaster Education in Japan)

भूकंप, सुनामी, पूर या नैसर्गिक आपत्ती जपानमध्ये पुन्हा पुन्हा घडतात.

हीच गोष्ट लक्षात घेऊन शाळांमध्ये आपत्ती व्यवस्थापन नियमितपणे घेतलं जातं. ‘

भूकंप झाल्यास सर्वप्रथम काय करावे?’ आग लागल्यावर सुरक्षित ठिकाणी पळून जाण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?

आपत्कालीन परिस्थितीत त्यांचे प्राण वाचवण्यासाठी मुलं शाळेत शिकतात.

school in japan

५) “चला चला स्वयंपाक शिकूया !” “गृहशास्त्र” चा मनोरंजक वर्ग

जपानी शाळांमध्ये रोजच्या आयुष्यात उपयोगी पडणारी माहिती आणि मनोरंजन हे दोन्ही शिकवण्याचं कौशल्यं आहेत.

भाज्या वेगवेगळ्या आकारात कापायला शिकणे, चाकू किंवा आग काळजीपूर्वक वापरणं मुलांना शिकवलं जातं.

पौष्टिक आणि संतुलित आहाराबद्दल स्वत: साठी विचार करायचा आणि नंतर असा आहार शिजवून खायचा हा ही अभ्यासक्रमाचा भाग असतो.

त्याचबरोबर बटणं लावणे, शिलाई मशीनने शिवणे, करवत आणि खिळ्यांचा वापर करून उपयोगी वस्तू तयार कळणे हे ही “गृहविज्ञान” च्या अभ्यासक्रमात शिकवलं जात जे भविष्यात निःसंशयपणे प्रत्येकासाठी उपयोगी पडतंं.

school in japan

६) सुंदर लेखन करून पहा! ‘शोशा’ वर्ग

जपानमध्ये अगदी प्राथमिक शाळेपासून हायस्कूलपर्यंत कॅलिग्राफीचे वर्ग घेतले जातात.

लहान वयाचे विद्यार्थी पेन्सिल आणि पेननं कॅपिटल अक्षरे लिहिण्याचा प्रयत्न करतात.

थोडे मोठे विद्यार्थी पारंपारिक लेखन साहित्य, ब्रश आणि शाई वापरतात.

सरळ बसून आणि नमुन्याचं काळजीपूर्वक निरीक्षण करून प्रत्येक अक्षर योग्य संतुलनाने साधत लिहिण्याचा सराव केला जातो.

जपानमध्ये सुंदर लेखनावर भर दिला जातो.

‘शोशा’ हा जपानी शाळांचा एक वैशिष्ट्यपूर्ण अभ्यासक्रम आहे.

school in japan

७) लहान मुलांच्या विकासात मदत करणारी – शालेय आरोग्य तपासणी

जपानी शाळांमध्ये कायद्यानुसार नियमित आरोग्य तपासणी केली जाते.

फक्त उंची आणि वजन मोजलं जात नाही, तर दृष्टी आणि लघवीच्या तपासण्याही केल्या जातात.

रोग किंवा समस्या असतील तर लक्षात आल्यानंतर लगेच त्यावर उपचार केले जातात.

दात किडले आहेत का? ते नीट घासले जातात ना? याची दंतचिकित्सकाकडून तपासणीही केली जाते.

school in japan

मुलांची वाढ योग्य पद्धतीने होण्यासाठी आणि सुदृड आरोग्य राखण्यासाठी मदत करणाऱ्या जपानी शाळां या खरोखरच अनोख्या आहेत.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय