एक गॅस सिलिंडर जास्त दिवस चालण्यासाठी १३ टिप्स

एक गॅस सिलिंडर जास्त दिवस चालण्यासाठी १३ टिप्स

वाढती महागाई, वाढती लोकसंख्या आणि वाढता भ्रष्टाचार असे अनेक प्रश्न सर्वांना भेडसावत आहेत.

या कोरोनाच्या काळात तर महागाईने आभाळाला हात टेकले आहेत. रोजच्या जगण्यात लागणाऱ्या सर्वच गोष्टी खूप महागल्या आहेत. पेट्रोल, डिझेल, भाजीपाला, कपडे, सिलेंडर सगळ्यांच्याच किमती खूपच वाढल्या आहेत.

या वाढत्या महागाईला आपण काही करू शकत नाही, पण सगळ्या गोष्टींचा काटकसरीने वापर कसा करावा यासाठी नक्कीच प्रयत्न करू शकतो. सध्या काटकसर करणे ही काळाची गरज बनली आहे.

सिलेंडर ही किचनमध्ये लागणारी अतिशय आवश्यक गोष्ट आहे. याशिवाय आपण किचनमध्ये काहीच नाही करू शकत. फार मागे न जाता मागील चार वर्षांपासूनच्या गॅस किमतींचा अभ्यास केला तर २०१६ मध्ये गॅसची किंमत ५०० रू होती आणि २०२२ मध्ये ती ९०३ इतकी झाली आहे. म्हणजेच या चार वर्षात कुकींग गॅस ४०० रू नी महागला आहे. पण गरज असल्याने सर्वानाच गॅस वापरणे आवश्यक ठरते.

म्हणून एक सिलेंडर जास्तीत जास्त दिवस जाण्यासाठी नक्की काय करावे याच्या काही उपयुक्त टिप्स आपण या लेखात पाहणार आहोत

१. गॅस घेताना एक गोष्ट नक्की नीट पहा आणि ती म्हणजे गॅस व्यवस्थित भरलेला असावा. त्यामुळे गॅस आल्यावर त्याचे वजन करा.

गॅसचे वजन जर १४ kg पेक्षा जास्त असेल तरच तो वापरा नाहीतर तो परत करा. त्यामुळे काटा सरळ ठेवून वजन पाहून घ्या.

२. जेंव्हा तुम्ही नवा गॅस जोडाल ती तारीख कॅलेंडरवर लिहून ठेवा. म्हणजे गॅस संपल्यावर तो किती दिवस गेला हे तुमच्या लक्षात येईल.

३. गॅसवर काम करताना गॅस फ्लेम नेहमीच कमी ठेवा. शिवाय ही फ्लेम सतत चेक करत रहा. जर फलेम निळी असेल तर ठीक आहे पण पिवळी असेल तर मग गॅस आणि बर्नर दोन्ही आणि व्हिनेगरने स्वच्छ करा.

गॅस स्टोव्ह कसा साफ करावा?

गॅसमध्ये काही अडकले आहे का ते पहा आणि कोरड्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्या.

४. सिलेंडर मधला गॅस जर लीक होत असेल तर गॅस वाया जातो त्यामुळे रेग्युलेटर जवळ गॅस लीक तर होत नाही ना ते पहावे आणि वेळीच दुरुस्त करून घ्यावे.

५. स्वयंपाक करताना नेहमी स्वच्छ आणि कोरडी भांडी गॅस वर ठेवा. नाहीतर ओली भांडी कोरडी होण्यासाठी जास्त गॅस घालवतात.

६. स्वयंपाकाची पूर्वतयारी करूनच गॅस चालू करा. म्हणजे भाज्या चिरण्यात, धुण्यात किंवा मसाला करण्यात वेळ असेल आणि तरीही गॅस चालू ठेवून तुम्ही हे सगळं करत असाल तर गॅस खूप जास्त लागेल.

७. भाजी शिजवताना नेहमी गरम पाण्याचा वापर करा. म्हणजे कमीत कमी वेळेत भाजी शिजेल आणि गॅस वाया जाणार नाही.

१०. सगळं काम झाल्यावर गॅस स्वच्छ करून ठेवा आणि रेग्यूलेटर बंद करायला विसरू नका.

११. प्रेशर कुकर वापरणे हा गॅस बचत करण्याचा उत्तम मार्ग आहे. त्यामुळे अन्न शिजवताना प्रेशर कुकरचा वापर करा म्हणजे गॅस वाचेल.

१२. ओव्हन, मायक्रोव्हेव, इलेक्ट्रिक केटल यांचा वापर करा म्हणजे गॅसवर लोड येणार नाही आणि पर्यायाने गॅसची बचत होईल.

१३. रोज सगळ्यांनी एकत्र मिळून जेवण करावे. म्हणजे प्रत्येकाचे अन्न गरम करण्यासाठी लागणारा गॅस वाचेल आणि गॅस जास्त दिवस जाईल.

अशा प्रकारे आपण आपल्या किचनच्या सवईमध्ये थोडे बदल केले आणि काही गोष्टी कटाक्षाने पाळल्या तर आपल्या गॅसची नक्कीच बचत होईल यात शंकाच नाही.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

1 Response

  1. Monty Randhir says:

    ही वाढती महागाई जर आपन काटकसर करण्यापेक्षा आपण जर आपलं पगार जर वाढून घेतले तर काटकसर करण्याचा प्रयत्न होऊ शकत नाही बरे से लोक आजही 15000 चे काम करतात आणि पंधरा हजारा मध्ये काहीच होत नाही त्यामुळे पंधरा हजारापेक्षा वीस हजाराची नोकरी जर केले तर पाच हजार त्याला एक्स्ट्रा हातात मिळतात आणि वीस हजाराची करतोय ते 25 हजार सॅलरी घ्यावी कारण प्रत्येक माणूस हा कुठलं कुठे कमी पगार कर करतो सर्वांनी एक मते जर विचार केले सर्वाना चांगले सॅलरी कारण आपणच ठरवतो की हे मालक नको जास्त पगार देणार नाही त्यामुळे आपण कोणीही पगार वाडी निर्णय घेत नाही आणि आपण जर निर्णय घेतला तर आपल्याला साथ देणारे लोक फार कमी आहेत त्यामुळे सर्व लोकांनी जर विचार केला तर सर्वांना चांगला पगार मिळेल आणि एखाद्या पेपर मध्ये जर सविस्तर लेख लिहिलात तर सर्वांना अशा मिळेल की पगार वाढ होईल आणि सर्व लोकांनी एकत्र येऊन कुठतरी किंवा कुठल्या तरी ढिकाणी आपले विचार मांडले जेणे करून आपली पगार वाढ होते यामध्ये कापड दुकानात काम करणारा मुलगा किंवा वेगवेगळे व्यवसाय मध्ये कामाला लागले मुलं हे पण कमी पगारात काम करतात ते एकत्र आले तर सर्वांचे पगार वाढ होईल Monty Ranbir 8793899401

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!