RO विसरा, मातीच्या भांड्यात पाण्याचा फिल्टर तयार करा आणि थंड पाणीही मिळवा!!

RO विसरा, मातीच्या भांड्यात पाण्याचा फिल्टर तयार करा. आणि नैसर्गिक थंड पाणीही मिळवा!!
हैद्राबादचा माणसानं तयार केला घरगुती पद्धतीने पाणी फिल्टर.
थ्री-पॉट वॉटर फिल्टरेशन यासाठी काही सहज उपलब्ध होणारे नैसर्गिक घटक लागतात.
खडबडीत वाळू, रेती आणि कोळसा यापासून तुम्ही तुमचं स्वतःचं वॉटर फिल्टर तयार करू शकता.
रिव्हर्स ऑस्मोसिस ज्याला आपण RO म्हणतो, ती सिस्टीम पाणी स्वच्छ करण्यासाठी वापरतात.
बरेच लोक या उपायाची निवड करायला नाखुश असतात कारण यामध्ये पाणी गाळताना पाण्यातील महत्वाची खनिजं काढून टाकली जातात.
गाळण्याची प्रक्रिया होताना पाणी जास्त प्रमाणात लागतं आणि बरचसं पाणी वाया ही जातं, तसच यासाठी इलेक्ट्रिसिटीचा ही वापर करावा लागतो.
५४ वर्षीय एमव्ही रामचंद्र हैदराबादमध्ये राहतात आणि शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी कोणत्याही तंत्रज्ञानावर अवलंबून रहात नाहीत
रामचंद्र त्यांचा 26 वर्षीय मुलगा आणि त्यांची पत्नी, असं हे तिघांचं कुटुंब, तीन मातीच्या भांड्यांमधून शुद्ध केलेले पाणी वापरतात.
यात खडबडीत वाळू, रेत आणि कोळशाचे नैसर्गिक शुद्धीकरण करणारे घटक असतात.
तीन मातीच्या भांड्यांमधून पाणी गाळून घेणे ही एक सुरक्षित पद्धत आहे.
नैसर्गिक पाणी शुद्धीकरण
हैद्राबाद मध्ये राहणाऱ्या रामचंद्रना लहानपणापासूनच महानगरपालिकेच्या माध्यमातून येणाऱ्या पाण्याची सवय होती.
पण १२ वर्षांपूर्वी नागोळे इथं राहायला गेल्यावर मात्र महानगरपालिकेच्या पाण्याचा स्वच्छ पुरवठा होत नसल्यामुळं त्यांना स्टोअर्समधून कॅनबंद पाणी विकत घ्यावं लागलं.
पुरवठा करणा-या पाईप्समध्ये बिघाड असल्यामुळं महानगरपालिकेचं पाणी दूषित होतं.
त्या पाईप्समध्ये सांडपाणी मिसळल्याच्या घटना राम यांच्यासमोर उघड झाल्या.
या पद्धतीत, नळाचं पाणी टाकून फक्त २० मिनिटांत शुद्ध पिण्याचे पाणी मिळवता येतं
हा फिल्टर कसं काम करतो?
थ्री-पॉट फिल्टरेशन सिस्टममध्ये म्हणजे तीन मडक्यांच्या पद्धतीने पाणी शुद्ध करण्यासाठी वाळू, रेत आणि कोळशाने भरलेली दोन भांडी असतात.
वाळू आणि खडीचं मिश्रण अशुद्ध पाण्यात असलेल्या हानिकारक जीवाणूंविरूद्ध लढायला मदत करतं.
तर कोळशामुळे पाण्याची दुर्गंधी दूर व्हायला मदत होते.
तीन मडक्यांची, पाणी गाळण्याची ही सिस्टीम तयार करणं अगदी सोपं आहे आणि तुम्ही घरच्या घरी अगदी सहज ती तयार करू शकता.
घरच्या घरी पाणी गाळण्यासाठी तुम्हांला या वस्तुंची गरज भासेल.
१) एकाच आकाराची 3 मातीची भांडी. एक टॅपसह जोडलेले (रेडीमेड उपलब्ध)
२) खडबडीत वाळू (बांधकामासाठी वापरल्या जाणार्या वाळूसारखी)
३) रेत
४) कोळसा
वाळू, रेत आणि कोळशाचं प्रमाण हे मातीच्या भांड्यांच्या आकारावर अवलंबून असतं.
पाणी गाळण्याची सिस्टम कशी तयार करायची ?
१) मातीची भांडी स्वच्छ धुवून घ्या.
२) दोन भांडी २ कप पाण्याने भरा आणि १५ मिनिटे जाऊ द्या.
३) पाणी काढून टाका आणि तळाशी छिद्र पाडण्यासाठी तीक्ष्ण खिळे वापरा
(लक्षात ठेवा तळाशी छिद्र पाडण्यासाठी हातोडा किंवा ड्रिलचा वापरू नका, भांडे फुटू शकतं. हलक्या हाताने छिद्र पाडा)
गाळण्यासाठी साहित्य
४) वाळू, रेत आणि कोळसा कमीतकमी ३ ते ४ वेळा पूर्णपणे धुवा
५) मग त्यांना सूर्यप्रकाशात एक दिवस कोरडे होऊ द्या.
गाळण्याचे साहित्य भांडयांमध्ये व्यवस्थित भरुन घ्या
६) वरच्या भांड्यात रेत आणि वाळू समान प्रमाणात भरा.
७) त्यावर कोळशाचे तुकडे एकसारखे पसरा.
भांडं अर्ध्यापेक्षा कमीच भरेल याची खात्री करा.
८) दुसऱ्या भांड्यात वाळू आणि खडी समान प्रमाणात भरा.
९) कोळशाचे तुकडे एकसारखे पसरवा.
दुसऱ्या भांड्यात, पहिल्याच्या तुलनेत जरा जास्त वाळू आणि रेव घाला.
साधारण अर्ध्यापर्यंत भरा.
१०) ही भांडी एका स्टँडवर ठेवा. सर्वात वरच्या भांड्यात आवश्यक प्रमाणात पाणी घाला आणि ते शेवटच्या भांड्यात येईपर्यंत थांबा.
पाणी गाळण्यासाठी घरच्या घरी, स्वस्तात मस्त, आणि सुरक्षित यंत्रणा सुरू होईल
ही मातीची भांडी दर ६ महिन्यांनी किंवा १ वर्षानी स्वच्छ करून घेतली पाहिजेत किंवा बदलली पाहिजेत.
आतले घटकसुद्धा वेळच्या वेळी बदलले पाहिजेत.
मातीच्या मडक्यांचं पाणी गाळणारं यंत्र वापरणारे रामचंद्र स्वतः सिव्हिल इंजिनिअर आणि पर्यावरणवादी आहेत.
त्यांनी वासन या एनजीओसाठी काम केलं आहे.
जलस्रोत व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करण्याचं काम त्यांनी २० वर्षे केलं
पाण्याच्या शुद्धतेचा अभ्यास केला.
RO चं पाणी आणि कॅनमधलं पाणी शुद्ध केलं जातं.
पण रामचंद्र म्हणतात, “पिण्याच्या पाण्याचं शुद्धीकरण म्हणजे हानिकारक जीवाणू काढून टाकणं, आवश्यक खनिजे काढून टाकणं नव्हे.
RO पाणी हे हानिकारक जीवाणू आणि रोगजंतूंना काढून टाकू शकतं, पण त्याचवेळी ते पाण्यातील महत्त्वपूर्ण खनिजंसुद्धा काढून टाकतं.
कॅन मध्ये भरलेलं पाणी काहीवेळा बेपर्वाईने किंवा बेजबाबदारपणे शुद्ध न करता भरण्याची शक्यता असते.
तुम्हाला काही प्रश्न असतील काही शंका असतील तर तुम्ही रामचंद्र यांच्याशी [email protected] या वर ईमेलद्वारे संपर्क साधू शकता.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा
'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा