केसांच्या विक्रीचा व्यवसाय करा आणि दर महिन्याला मोठी रक्कम मिळवा

hair-selling-business-marathi

लेखाचं शीर्षक वाचून चकित झालात ना? एकतर केसांच्या विक्रीचा व्यवसाय ही नवीनच गोष्ट आणि त्यातून भरपूर कमाई? हे नक्की आहे तरी काय? ह्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी लेख संपूर्ण वाचा.

आपल्या डोक्यावरचे केस आपल्याला मोठी रक्कम मिळवून देऊ शकतात?

होय, हे खरे आहे. केसांपासून मोठा व्यवसाय उभा राहू शकतो. जगभरातून मानवी केसांना खूप मागणी आहे. आणि जगात सर्वत्र केस विक्रीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो. महत्वाची गोष्ट ही की भारतही ह्या व्यवसायात आघाडीवर आहे. 

अशा प्रकारच्या नैसर्गिक केसांचा विग(टोप) बनवण्यासाठी किंवा हेयर transplant साठी उपयोग होतो. कॅन्सरसारख्या दुर्धर आजारामुळे ज्या रुग्णांचे केस गेले आहेत त्यांना या केसांचा खूप फायदा होतो. तसेच डोक्यावरील केस विरळ असणाऱ्या लोकांना देखील या केसांचा फायदा होतो.

करोनानंतर जेथे मोठमोठे व्यवसाय डबघाईला आले तेथे ह्या केसांच्या विक्रीच्या व्यवसायाला मात्र चांगली मागणी असून, भरपूर किमतीला केस विकले जातात. आपल्यासाठी महत्त्वाची बाब ही आहे की, भारतीय केसांना जगभरातून मोठी मागणी आहे. 

त्यामुळे दर महिना नियमित उत्पन्न मिळवण्याच्या दृष्टीने हा एक चांगला व्यवसाय ठरू शकतो. 

नेमका कसा असतो हा केसांच्या विक्रीचा व्यवसाय?

आपण आधीच पाहिले की जगभरातून भारतीय केसांना मोठी मागणी आहे. भारतीय लोकांचे केस निसर्गतः काळे, दाट आणि मजबूत असतात. त्यामुळे या केसांना सगळीकडे भरपूर मागणी असून अतिशय चांगली रक्कम देखील मिळते. 

आपल्या भारत देशातून दर वर्षी जवळ जवळ ४० लाख डॉलर इतक्या किमतीचे केस विदेशात एक्सपोर्ट केले जातात. आपल्या डोक्यावरून गळणाऱ्या केसांची किंमत करोडो रुपये इतकी आहे याची आपल्याला कल्पना देखील नसते.

परंतु हे खरे आहे. केसांच्या प्रतवारीनुसार त्यांची किंमत ठरते आणि चांगल्या प्रतीच्या केसांना भरपूर रकमेचा परतावा मिळतो. 

वेगवेगळ्या गाव आणि शहरांमध्ये तसेच तिरुपती सारख्या देवस्थानातून जिथे केस देवाला अर्पण केले जातात तेथून मोठ्या प्रमाणावर केस गोळा केले जातात आणि त्यांची विक्री केली जाते.

how to sell hair

 

काही गावांमध्ये केस गोळा करण्याच्या कामासाठी वेगवेगळ्या लोकांना नियुक्त केले जाते. अशा प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणांहून गोळा केलेल्या केसांची प्रतवारी ठरवून त्या त्या प्रमाणे त्यांची विक्री केली जाते. 

कशी ठरते केसांची किंमत ?

दक्षिण भारत आणि गुजरात येथील केसांना मोठ्या प्रमाणावर मागणी असते कारण तिथल्या लोकांचे केस मजबूत आणि चमकदार असतात. आता हा व्यवसाय हळूहळू महाराष्ट्रातही जोमाने वाढू लागला आहे.

नेमका कसा होतो या केसांचा उपयोग?

अशा पद्धतीने खरेदी केलेल्या केसांचा व्यावसायिक उपयोग विग म्हणजेच केसांचा टोप बनवण्यासाठी किंवा हेअर ट्रान्सप्लांट करण्यासाठी उपयोग करतात.

सर्वप्रथम गोळा केलेले केस केमिकलचा वापर करून स्वच्छ केले जातात. त्यानंतर ते केस सरळ केले जातात. आणि मग त्यांचा वापर  विग बनवण्यासाठी किंवा  हेअर ट्रान्सप्लांटसाठी केला जातो. 

परंतु केस खरेदी करताना काही गोष्टींची खबरदारी घेणे आवश्यक असते. ती खालील प्रमाणे

१.  केस कापलेले असू नयेत. 

२.  त्यांची लांबी कमीत कमी आठ इंच असली पाहिजे. 

३.  तसेच केस योग्य प्रकारे निगा राखलेली असले पाहिजेत. 

४.  केसांवर आधी कोणतीही रासायनिक प्रक्रिया केलेली असू नये.

आम्ही आधीच सांगितल्याप्रमाणे जगभरात भारतीय केसांना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. याचे प्रमुख कारण भारतीय लोकांचे केस मजबूत आणि चमकदार असतात हे तर आहेच, पण जगभरातून वर्जिन केस म्हणजेच ज्या केसांवर कोणतीही रासायनिक प्रक्रिया केलेली नाही, केसांना कोणत्याही प्रकारचा डाय अथवा रंग लावलेला नाही अशा केसांना जास्त मागणी असते. 

बहुसंख्य भारतीयांचे केस अशाप्रकारचे असल्यामुळेच त्यांना जास्त मागणी असते. भारतातून तिरुपती मंदिरातून सर्वात जास्त प्रमाणात केसांची विक्री होते. या सर्व केसांना अमेरिका, चीन, ब्रिटन आणि युरोप येथून मोठ्या प्रमाणावर मागणी असते. थोडक्यात काय तर आस्था म्हणून लोकांनी देवाच्या चरणी अर्पण केलेले केस, हे उत्पन्नाचे साधन ठरतात.

आज आपण एका वेगळ्याच प्रकारच्या व्यवसायाची माहिती घेतली. मित्रांनो, तुम्ही देखील हा केसांच्या विक्रीचा व्यवसाय करून भरपूर कमाई करू शकता. 

केसांची खरेदी करणाऱ्या काही वेबसाईट्स सुद्धा उपलब्ध आहेत. त्यात १00 डॉलर पासून हजारो डॉलर्स म्हणजेच लाखो भारतीय रुपये अशी किंमत केसांना मिळू शकते.

उदाहरणादाखल खाली एका वेबसाईटवर कशा प्रकारे तुम्ही तुमचे काही केस लाखो रुपयांमध्ये विकू शकता हे दाखवले आहे.

how to sell hair

ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी हा लेख नक्की शेअर करा. ज्या महिला स्वतःचे पार्लर चालवतात त्यांच्यासाठी सुद्धा हि उत्तम संधी असू शकते.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!