भारतीय सिनेमागृहाचा नव्या युगाचा चकचकीत चेहरा PVR!

PVR Story Marathi

भारतीय सिनेमागृहाचा नव्या युगाचा चकचकीत चेहरा PVR!
पण तुम्हांला त्यामागचा संघर्ष माहिती आहे का?

नवा चित्रपट मित्र-मैत्रिणींबरोबर Enjoy करायचा, एखादा चित्रपट Family सोबत पहायचा, A.C ची गार हवा, स्वच्छता, सेवेला तत्पर कर्मचारी, आरामदायी आसन व्यवस्था यासारख्या गोष्टींचं आता नवल वाटत नाही इतकं आपण मल्टिप्लेक्सला सरावलो आहोत.

सिंगल स्क्रीन थिएटरला अडगळीत टाकून एका बदलाची, मल्टिप्लेक्सची भारतात सुरवात केली ती PVR ग्रुपने.

जाणून घ्या PVR चा फुल फॉर्म

मल्टिप्लेक्सला थिएटरला जाताना तुम्ही सहज PVR ला जातोय असं म्हणता.

या PVR चा फुल फॉर्म तुम्हांला माहिती आहे का ?

PVR म्हणजे ‘प्रिया व्हिलेज रोड शो’ (Priya Village Roadshow).

PVR कंपनीचे मालक अजय बिजली आहेत.

PVR मधल्या प्रिया, या सिंगल थिएटरचे मालक होते अजय बीजलींचे वडिल त्यांनी १९७८ साल हे थिएटर घेतलं होतं.

त्याचबरोबर अजय बिजलींचे वडील अमृतसर ट्रान्सपोर्ट कंपनीचे ही मालक होते.

दिल्ली मधून शिक्षण पूर्ण करून हार्वर्ड युनिव्हर्सिटी मधून ओनर मॅनेजमेंट प्रोग्रामचा कोर्स केलेल्या अजय यांनी १९८८ साली वडिलांचा बिझनेस जॉईन केला.

पण तिथं त्यांचं मन रमत नव्हतं. नेमकं काय करायचं हे ही अजयना कळत नव्हतं.

लग्नानंतर मात्र आपलं वेगळं करीयर करण्याचं त्यांनी पक्कं ठरवलं.

पण करायचं काय? याचं उत्तर अजून त्यांना मिळालं नव्हतच.

मग अजयना त्यांच्या वडिलांनी प्रिया थिएटर चालवायला दिलं.

कारण त्यावेळी प्रतिस्पर्धी थिएटर समोर प्रिया टॉकीजचा बिझनेस कमी होत होता.

त्यासाठी अजय यांनी प्रिया सिनेमाचं रूपरंगच बदलवून टाकलं.

थिएटरमध्ये डॉल्बी साउंड सिस्टीम सुरू केली. भिंती रंगवल्या, स्टाफला नवं रूप दिलं आणि दिमाखात नव्या रुपात प्रिया थिएटर प्रेक्षकांच्या स्वागतासाठी सज्ज झालं.

आता प्रिया थिएटरचा बिझनेस जोरात सुरू झाला.

पण १९९२ मध्ये अजय यांच्या वडिलांचं निधन झालं आणि ट्रान्सपोर्ट व्यवसायाची धुरा पुन्हा एकदा अजय यांना सांभाळावी लागली.

दिवसभर ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये काम करायचं आणि संध्याकाळी प्रिया थिएटर सांभाळायचं अशी धावपळ अजय आणि त्यांच्या पत्नीची सुरू होती.

एके दिवशी अशी घटना घडली की अजय बिजली यांचं आयुष्य बदलून गेलं.

त्यांच्या ट्रान्सपोर्ट कंपनीला आग लागली आणि पूर्ण ऑफिस जळून खाक झालं.

आता अजय यांच्यासमोर दोन पर्याय उभे राहिले.

एक तर ट्रान्सपोर्ट व्यवसाय पुन्हा नव्याने उभा करायचा किंवा प्रिया थिएटरकडे पूर्ण लक्ष द्यायचं.

अजय बिजली यांनी आपलं संपूर्ण लक्ष प्रिया थिएटर वर केंद्रित करायचं ठरवलं.

त्यात नवं काय करता येईल याचा विचार करताना ‘मल्टिप्लेक्स’ ही संकल्पना त्यांच्या डोळ्यासमोर आली.

ही संकल्पना त्यावेळी परदेशात रूजली होती. अजय यांनी ती परदेशात बघितली होती.

ही संकल्पना भारतात रूजवण्याची त्यांची खूप इच्छा होती.

कशापद्धतीनं मल्टिप्लेक्स भारतात सुरू करता येईल याचा अंदाज घेत असताना हॉलीवूडच्या डिस्ट्रिब्युटरकडून अजय यांना ऑस्ट्रेलियाच्या ‘व्हिलेज रोडशो’ या कंपनीची माहिती मिळाली.

‘व्हिलेज रोडशो’ कंपनी भारतात त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी पार्टनर शोधत होते.

‘व्हिलेज रोडशो’ चे डायरेक्टर होते जॉन क्रोफोर्ड.

जॉनला भेटायला अजय ऑस्ट्रेलियाला गेले.

६०% शेअर्स हे प्रिया सिनेमाचे आणि ४०% हे ‘व्हिलेज रोडशोचे’ असा ठराव करून दोन कंपन्या एकत्र आल्या आणि त्यांची आद्याक्षरं एकत्र येऊन नाव तयार झालं PVR.

‘प्रिया व्हिलेज रोड शो’ (Priya Village Roadshow)

चालू स्थितीतल्या प्रिया थिएटरमध्ये बदल न करता दुसरं मल्टिप्लेक्स सुरू करण्याचं अजय यांनी ठरवलं.

‘अनुपम’ हे थिएटर भाड्याने घेऊन अजय बिजली यांनी १९९७ ला ४ स्क्रीन असलेलं भारतातील पहिलं ‘PVR अनुपम’ हे मल्टिप्लेक्स सुरू केलं.

मल्टिप्लेक्स पहाण्यासाठी लोकांची रीघ लागली.

१००० सीट्सच्या एका टॉकीजपेक्षा ३०० सीट्सचे ४ स्क्रीन ही नवी पद्धत लोकांना आवडली.

१९९८ला बॉलीवूडला ही उद्योगाचा दर्जा मिळाला.

आता उद्योग बहरायला वेळ लागणार नव्हता.

सगळंच सुरळीत चालू असेल तर तो उद्योग कसला?

‘व्हिलेज रोडशो’ या ग्रुपने भारतातून बाहेर पडायचं ठरवलं.

तोपर्यंत PVR ग्रुप ने जवळपास १०० करोडचे करार वेगवेगळ्या मॉल्स बरोबर केले होते, ज्यांचं अजून ही बांधकाम सुरू होतं.

आता ४०% शेअर्स विकत घेणं हे मोठं आव्हान अजय बिजली यांच्या समोर उभं ठाकलं होतं.

ICICI बँकेने PVR ग्रुपला ४० करोडचं अर्थसहाय्य केलं आणि एकूण ८० करोड रुपये भरून PVR ही एक पूर्णपणे भारतीय कंपनी झाली.

२००६ मध्ये PVR ने ICICI चं कर्ज फेडलं, २५० करोडची कमाई केली आणि १२० स्क्रीन चा नवा प्लॅन जाहीर केला आणि यशस्वी रित्या पुर्ण ही केला.

आता PVR ला भारतात स्पर्धा ही सुरू झाली होती.

या स्पर्धेवर मात करण्यासाठी PVR ग्रुपनं निर्मीतीत उतरायचं ठरवलं.

तारे जमी पर, गजनी, गोलमाल रिटर्न्स, डॉन, ओंकारा या चित्रपटांसाठी PVR भागीदार झाले आणि प्रचंड यश मिळवलं.

PVR हा भारतातला एक नंबरचा सिनेमा बिजनेस चा ग्रुप झाला.

हॉलीवूडच्या सिनेमाचे ते एकमेव डिस्ट्रिब्युटर्स आहेत.

सध्या भारतात त्यांचे ५०० पेक्षा अधिक स्क्रीन आहेत.

PVR ही भारतातील सर्वात मोठी थिएटर कंपनीसुद्धा आहे.

PVR चे भारतात ७१ शहरांमध्ये १७६ सिनेमा हॉल आणि ८५६ स्क्रीन आहेत.

PVR ग्रुपच्या आजपर्यंतच्या प्रवासात सिने आशिया, युथ आयकॉन, रिटेलर ऑफ द इयर सारख्या प्रतिष्ठित पुरस्काराननं सन्मानित करण्यात आलं आहे.

भारतीय सिनेमांचा हा चकचकीत चेहरा PVR फार मोठा प्रवास करत, अडीअडचणींवर मात करत नंबर वन पदापर्यंत पोचला आहे.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!