कॉफी प्यायल्यानंतर शौचाला जाण्याची भावना का निर्माण होते? 

बद्धकोष्ठता साठी घरगुती उपाय

आज वाचूया ‘कॉफी आणि बरंच काही’ या विषयावर.

पण हे बरंच काही  आपल्या पोटाशी निगडीत आहे. गमतीचा भाग सोडून देऊया.

पण कॉफीचे सेवन आपल्या शरीरावर, पोट साफ करण्यावर आणि पचनशक्तीवर नेमका काय परिणाम करते याची शास्त्रीय माहिती आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत.

चहा, कॉफी ही पेये जवळजवळ प्रत्येक घरात प्यायली जातात. सकाळी उठल्यावर चहा किंवा कॉफी न पिणारे लोक विरळाच.

अट्टल चहाबाज लोक तर असतातच पण कॉफीचे शौकीन असणारे पण काही कमी नाहीत. सकाळी उठल्याबरोबर एक मग भरुन कडक कॉफी ह्यांना हवीच असते.

आणि सकाळी उठून कॉफी पिणाऱ्या बहुतांश लोकांचा असा अनुभव असतो, की कॉफी प्यायल्यावर थोड्या वेळातच त्यांना शौचाला जाण्याची भावना होते. कॉफी पिऊन झाली की साधारण अर्ध्या तासात टॉयलेटला जावे लागतेच असा बहुतेकांचा अनुभव असतो.

असे का होत असेल? काय आहेत ह्या मागची नेमकी कारणे?

आज आपण ह्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

बहुतांश लोकांना कॉफी प्यायल्यानंतर शौचाला जाण्याची भावना निर्माण होते, त्यांचे पोट साफ होते ही गोष्ट खरी आहे.

खूप लोक तर कॉफी कडे पोट साफ करण्याचे औषध या दृष्टीनेच पाहतात. सकाळी उठून एक मग कडक कॉफी प्यायली की त्यानंतर पोट नक्की साफ होणार असे त्यांना वाटते.

बद्धकोष्ठता असणारे लोक आवर्जून सकाळी उठून कॉफी पितात.

या विषयी केलेल्या अधिक संशोधनात आणि वेगवेगळ्या सर्व्हे मध्ये असे आढळून आले आहे की कॉफी प्यायल्यानंतर शौचाला जाण्याची भावना निर्माण होण्याचे प्रमाण स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा अधिक प्रमाणात आढळून येते.

काही लोकांना ताबडतोब तर काही लोकांना अर्ध्या तासापर्यंतच्या कालावधीत बाथरूममध्ये जाण्याची गरज निर्माण होते.

कॉफी प्यायल्यामुळे शौचाला जाण्याची भावना होण्यामागे खालील कारणे आहेत.

या विषयी केलेल्या संशोधनात शास्त्रज्ञांना असे आढळून आले की, कॉफी प्यायल्यामुळे आतड्यांच्या अंतर्गत भागात होणाऱ्या हालचाली जलद गतीने होऊ लागतात त्याच प्रमाणे कॉफी मुळे आतड्यांमध्ये होणारे गॅस्ट्रिक ऍसिडचे सिक्रिशन (निर्मिती) जास्त प्रमाणात होते. त्याचप्रमाणे आतड्यांमध्ये कॉफीच्या सेवनाने एक प्रकारची रिएक्शन होऊन cholecystokinin आणि gastrin या द्रव्यांची निर्मिती मोठ्या प्रमाणात होते ज्यांच्यामुळे शरीराची पचनची शक्ती वाढते आणि पचन जलद गतीने होते.

याबाबतीत काहीवेळा असे म्हटले जाते, की कॉफी मध्ये असलेल्या कॅफिन मुळे असा परिणाम दिसून येतो. परंतु हे खरे नाही. कॅफीन विरहित कॉफीमुळे सुद्धा असाच परिणाम होताना आढळून येतो.

परंतु याचा अर्थ असा नव्हे की कॉफी हे पोट साफ होण्याचे औषध आहे.

कॉफीमध्ये दुधाचा वापर केलेला असतो त्यामुळे काही लोकांना अपचन, डायरिया इत्यादी आजार देखील होऊ शकतात.

तसेच कॉफीच्या अतिरिक्त सेवनामुळे पोटाचे विकार होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.

याचा अर्थ जरी कॉफीच्या सेवनामुळे पोट साफ होण्यास मदत होत असली तरी कॉफीचा पोट साफ होण्याचे औषध म्हणून वापर करू नये.

तसेच या बाबतीत केवळ कॉफीवर अवलंबून न राहता नियमित व्यायाम करणे,  भरपूर पाणी पिणे, फायबर युक्त आहार घेणे असे उपाय करून आपली पचनशक्ती चांगली राखली पाहिजे.

नैसर्गिकरित्या पोट साफ होणे ही जास्त चांगली आणि आरोग्यदायी गोष्ट आहे.

तर मित्र मैत्रिणींनो, ही आहे कॉफी बाबतची मनोरंजनात्मक परंतु शास्त्रीय माहिती.

तुम्ही सकाळी चहा घेता की कॉफी? आणि तुमचा त्याबाबत काय अनुभव आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

तसेच ही शास्त्रीय माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून हा लेख नक्की शेअर करा.

Manachetalks

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

1 Response

  1. जयंतराव घाटोळ says:

    सकाळी चांगली झोप घेऊन झाल्यानंतर उठलो की ब्रश केल्यावर भरपूर पाणी पिऊन एक कप गरम चहा घेतल्यास पोट छान साफ होऊन ताजेतवाने वाटते. नंतर मी माॕर्निग वाॕक म्हणून सहा किलोमीटर सायकल चालवून येतो. चहा जर घेतला नाही तर पोट नीट साफ होत नाही आणि माॕर्निंग वाॕकचे वेळी पोट नीट साफ न झाल्याची हुरहुर लागून राहते, कधीकधी मूडही नीट राहात नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!