लग्नाच्या काही वर्षानंतर जोडपी एकमेकांसारखे दिसायला लागतात का?

लग्नाच्या काही वर्षानंतर जोडपी एकमेकांसारखे दिसायला लागतात का?

लग्नाच्या काही वर्षानंतर जोडपी एकमेकांसारखे दिसायला लागतात, असा अनुभव तुम्ही सुद्धा बरेचदा घेतला असेल.

ज्यांच्या लग्नाला बराच काळ लोटला आहे अशा दांपत्याच्या चेहऱ्यात साम्य जाणवतं.

याचा अर्थ असा आहे की, आयुष्यभर एकमेकांवर प्रेम करणारे एकमेकांशी इतकं जुळवून घेतात की, ते नकळतपणे एकमेकांच्या भावभावनांचं अनुकरण करतात, ज्यामुळे त्यांच्या चेहऱ्याचे स्वरूप बदलते.

१९८७ सालीच संशोधकांनी मांडलेल्या एका गृहीतकानुसार, जोडपी एकसारखी दिसायला लागतात, कारण ते एकाच प्रकारच्या वातावरणात राहतात, एकाच पद्धतीचं अन्न खातात आणि एकमेकांच्या भावनिक अभिव्यक्तींची नक्कल ही करतात.

पण काहीं संशोधकांच्या मते हा चेहऱ्यातील बदल नसून, मुळात जोडीदार निवडताना स्वतःसारखी चेहरेपट्टी असणारा, वैशिष्ट्य असणारा जोडीदार निवडणे हे त्या मागचं कारण असतं.

लग्नाच्या काही वर्षानंतर जोडपी एकमेकांसारखे दिसायला लागतात का?

दीर्घकालीन नातेसंबंधातील जोडपे कालांतराने सारखी दिसायला लागतात का?

हा आताचा नाही तर फार पुर्वीपासून चर्चिला जाणारा विषय आहे.

पण लग्नाच्या काही वर्षानंतर जोडपी खरंच एकमेकांसारखी दिसायला लागतात का?, हे शोधण्यासाठी १९८० च्या दशकात एक वैज्ञानिक प्रयोग केला गेला.

जोडपी एकसारखी का दिसतात? यामागे काही कारणं आहेत का?

बरेचदा तरुण मंडळी आपला जोडीदार निवडताना पालकांसारखा निवडतात.

एखादा पुरुष लग्न करताना त्याच्या आईसारख्या सवयी आणि दिसणं असणारा जोडीदार निवडतो.

संशोधकही हेच सांगतात की जोडीदार निवडताना पुरुष आपल्या आईशी साम्य असणाऱ्या स्त्रीची निवड करतो, तर स्त्री आपल्या वडिलांशी साम्य असणाऱ्या पुरुषाला निवडते.

यात प्रामुख्याने केस आणि डोळ्यांचा रंग याचा विचार केला जातो.

लग्नाच्या काही वर्षानंतर जोडपी एकमेकांसारखे दिसायला लागतात का?

तेंव्हा त्याच्या लक्षात आलं की पती-पत्नीच्या चेहऱ्यावर अजिबात साम्य नसले तरी जवळपास २५ वर्षांनंतर ते आश्चर्यकारकपणे एकसारखे दिसले.

त्याच्या सर्वेक्षणातील आणखी एक गोष्ट समोर आली की जोडपी जितकी त्यांच्या वैवाहिक जीवनात आनंदी असतात तितकंच त्यांच्या चेहऱ्यावरचं साम्य वाढतं.

एकत्र अनुभव घेणं वाढवतं त्यांच्यातलं साम्य

लग्नाच्या काही वर्षानंतर पती पत्नी एकमेकांसारखे दिसतात कारण ते जोडीदारासोबत अनुभव शेअर करतात.

लग्नानंतरच्या काही वर्षात एकत्र राहून जोडपी आनंदी आणि दुःखी क्षण एकत्र अनुभवतात.

जोडपे या नात्याने ते एकत्र असताना प्रत्येक गोष्टीचा त्यांच्या देहबोली आणि भावनिक स्थितीवर परिणाम होतो.

त्यांचा इतिहास त्यांच्या चेहऱ्यावर वाचता येतो, गंमत म्हणजे जोडप्याच्या चेहऱ्यावर सुरकुत्या ही त्याच ठिकाणी तयार होतात.

एका अभ्यासानुसार, ज्यांच्या चेहऱ्याशी तुमचं साम्य असतं त्यांच्याकडे तुम्ही आकर्षित होता, याला asortative वीण म्हणतात.

रोगप्रतिकारक शक्तीत सुद्धा असते साधर्म्य

शास्त्रज्ञांच्या एका गटाने असा ही निष्कर्ष काढला आहे की ज्या जोडप्यांचे लग्न झाले आहे त्यांच्या रोगप्रतिकारक शक्तीत खूप साम्य असतं.

बॉंडींग चांगलं असेल तर होऊन जातात एकमेकांचं प्रतिबिंब

एकमेकांना अनुरूप असणारं जोडपं बऱ्याच वेळा एकमेकांच्या सवयी आणि देहबोली यांच आरशातल्या प्रतिबिंबासारखं नकळत अनुकरण करतात.

यातून हे लक्षात येतं की त्यांच्या नात्यात भावनिक सहजता आणि विश्वास आहे.

शास्त्रज्ञ सांगतात की सहजीवनात जोडीदार त्यांच्या वैवाहिक आयुष्यात आपापल्या स्वतःच्या सवयी बदलतात.

उदाहरणार्थ, जर त्यांच्यापैकी एकानं डायटिंग केल़ तर दुसर्‍याने अनेकदा तसंच केलं असं होऊ शकतं किंवा सकाळी उठून जॉगिंग ला जाणं, सायकलिंग साठी जाणं, ट्रेकिंग करणं या गोष्टी आपसूकच, ज्यांच्यात चांगलं बॉंडींग आहे असे जोडीदार बरोबरीने करतात.

पण मित्रांनो पती पत्नीच्या चेहऱ्यात फरक असू दे किंवा समानता आपल्या खास व्यक्तीच्या प्रेमात पुन्हा पुन्हा पडणे हीच सगळयात मौल्यवान गोष्ट आहे.

एका आजी-आजोबांच्या लग्नाचा ६० वा वाढदिवस होता.

आजोबांना अल्झायमर होता. त्यांना त्यांची मुलं, त्यांचं घर किंवा इतर काही आठवत नव्हते.

पण जेंव्हा जेंव्हा ते आजीला पहायचे तेंव्हा म्हणायचे, ‘बघा, माझी सुंदर बायको!”

जोडपी एकसारखी दिसतात, म्हणजे नेमकं काय याचं संशोधकांनी कसं विश्लेषण केलं?

संशोधकांनी याचं विश्लेषण करण्यासाठी गेल्या काही वर्षांत जोडप्यांचे हजारो फोटो घेतले.

चेहऱ्यांचं विश्लेषण करण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा ही वापर केला.

८० च्या दशकाच्या सुरुवातीला मात्र संशोधकांना स्वयंसेवकांवर आणि विश्लेषणासाठी डोळ्यांवर अवलंबून राहावे लागलं

संशोधकांनी जोडप्यांची लग्नापूर्वीचे फोटो आणि लग्नाच्या २५ वर्षांनंतरचे फोटो मिळवले.

एकूण ५१७ जोडप्यांचा डेटाबेस तयार केला.

संशोधकांनी स्वयंसेवकांना ५ चेहऱ्यांसह एका ठराविक चेहऱ्याकडं बघायला सांगितलं.

त्या ५ पैकी एक त्यांचा जोडीदार होता.

त्यानंतर स्वयंसेवकांना या चेहऱ्यांमधील साम्य काही जाणवतं का हे विचारलं….

त्यानंतर पुढे फेशियल रेकग्निशन तंत्रज्ञानाचा वापर करून हेच ​​केले गेले.

निष्कर्ष काय आहेत?

संशोधकांना असं आढळून आल़ं, की चेहरे बदलण्याऐवजी, जोडप्यांचाच कल त्यांच्यासारखेच चेहऱ्याचे वैशिष्ट्य असलेला जोडीदार निवडण्याकडे असतो.

जोडप्यांच्या चेहऱ्यावरील वैशिष्ट्ये कालांतराने एकसारखी दिसतात, या सिद्धांताचे समर्थन करणारा कोणताही पुरावा त्यावेळी संशोधकांना सापडला नाही.

नवे निष्कर्ष मात्र पूर्वीच्या संशोधनाच्या विरूद्ध आहेत.

ज्यात अनेकांनी असं सुचवलं आहे, की जोडप्यांच्या चेहऱ्यावरील वैशिष्ट्यं बदलतात आणि ते कालांतराने ते एकसारखे दिसतात.

तुम्ही आणि तुमची प्रिय व्यक्ती सारखी दिसता का? तुमच्या आसपास अशी एकसारखी दिसणारी जोडपी आहेत का? हा लेख वाचण्यासाठी तुमच्या अशा, जोडीदारासारख्या दिसणाऱ्या मित्र मैत्रिणींना कमेंट मध्ये टॅग करा….

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!