मुलांसाठी सर्व पालकांनी मिळून एक फनफेअर आयोजित करा

मुलांना बाहेरच्या जगात आत्मविश्वासानं वावरायला शिकवा. मुलं हा धडा कधीच विसरणार नाहीत.
शाळेचा अभ्यास तर ते करतीलच, पण व्यावहारिक शहाणपण शिकायला त्यांना मदत करा.
आज आपण सगळीकडे छोटे मोठे स्टॉल पहातो. तिच संकल्पना सोसायटीतल्या मुलांसमोर मांडा.
एखादया रविवारी मुलांना फनफेअर मांडू द्या. दोन-दोन, तीन-तीन, मुलांच्या जोड्या ठरवा.
यामध्ये ग्राहक असतील सोसायटीचे सगळे पालक!
मुलांना सांगा तुमच्या कल्पनेनं विक्री करा. तुम्ही त्यांना थोडीशी हिंट द्या.
भाज्या विकत आणून त्या निवडून पँक करून त्यांची विक्री करू देत.
कुणी मक्याचे दाणे आणून पॉपकॉर्न करून विकतील.
कुणी चाटसारखे सोपे पदार्थ, सरबत करतील.
काही जण राख्या, आकाशकंदील असे सिझनल गोष्टी तयार करुन विकतील.
यासाठी लागणारं साहित्य साहजिकच पालक आणून देतील. यात पालक आणि पाल्यांनी एकत्रित पणे हे सर्व करण्याची गम्मत अनुभवा.
हे एक छोटसं मिनी मॉडेल असेल, पण धडा मोठा असेल.
कच्चा माल खरेदी करणं, त्यावर प्रक्रिया करणं, त्याला सजवणं, विक्री साठी लोकांना पटवून देणं, सुट्टे पैसे परत देणं आणि शेवटी हिशोब करणं हे मुलांना प्रचंड आवडेल.
ही सगळी धावपळ करताना मुलं समाजात मिसळायला शिकतील. एकमेकांना मदत करायला शिकतील.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा
'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा