पहा, हे पाच अरबपती आपल्या मुलांचे संगोपन कसे करतात

श्रीमंत लोक गरीब लोकांकडून काय शिकू शकतात

अरबपती असणारे पालक आपल्या मुलांचं संगोपन कशा पद्धतीने करतात?

या ५ लोकप्रिय पालकांची पद्धत समजून घेऊया.

बऱ्याच जणांना असं वाटतं, की श्रीमंत लोक पैसे कमावण्यात इतकी बिझी असतील की त्यांना आपल्या मुलांकडे लक्ष द्यायला वेळच नसेल.

पण जरा नीट लक्ष दिलंत, तर तुमच्या असं लक्षात येईल की श्रीमंत लोकांची मूलं जास्त यशस्वी, जास्त हुशार असतात, कारण त्यांना उच्च मूल्यांची शिकवण मिळालेली असते.

काय असतात ही श्रीमंत मुलांची मूल्य? कशा प्रकारे श्रीमंत पालक त्यांचं संगोपन करतात?

हेच तर आज जाणून घेऊया!

सामान्य लोक काय करतात? तर स्वतःच्या मुलाला स्पर्धेत ढकलून देतात.

कोणता ब्रँड घ्यायचा? याची स्पर्धा किंवा नवनवीन काहीतरी काहीतरी शिकत राहण्याची स्पर्धा यामध्ये सामान्य माणसांची मुलं भरडली जातात.

श्रीमंत घरात मात्र मुलं “कोण” होणार यावरती लक्ष केंद्रित केले जात.

सामान्य लोकांच्या घरात मुलं मोठेपणी “काय” होणार यावर फोकस असतो.

जनरली मुलांना विचारलं जातं बघा की, “मोठेपणी तू काय होणार ?” पण श्रीमंत घरात मात्र त्याला सतत तू “कोण होणार?” असंच विचारलं जातं.

असा फरक असल्यामुळे प्रचंड संपत्ती असणारे पालक कशा पद्धतीने आपल्या मुलांचे संगोपन करतात ते जाणून घेणं फारच मनोरंजक आहे.

आपण ज्यांना चांगलंच ओळखतो अशा काही अरबोपतींचा त्यांच्या मुलांच्या जडणीघडणीत काय वाटा आहे ते जाणून घेऊया.

१) मुकेश आणि नीता अंबानी

अंबानी कुटुंबाची पुढची पिढी त्यांची तिन्ही मुलं नेतृत्वगुणांने झळाळून निघालेली तुम्ही पाहिलं असेल.

त्यामागं नेमकी काय पालकनीती आहे?

ते समजून घेण्यासाठी अनंत अंबानीच्या बाबतीत घडलेली एक घटना समजून घेऊया.

अनंतने एकदा आईकडे जास्त पॉकेटमनी मागितला.

“आईने जास्त पैसे कशाला हवेत?” असं विचारल्यानंतर आनंद म्हणाला “मी फक्त ५ रुपये घेऊन जातो त्यामुळे मुलं मला छळतात, म्हणतात, तू अंबानी आहेस की भिकारी?” मुकेश आणि नीता याच्यावर मनापासून हसले पण त्यांनी चुकूनही पॉकेटमनी वाढवला नाही.

नीता अंबानीं यांनी आई म्हणून एकदा सांगितलं की ‘देशाचे भविष्य उज्वल करण्याचा विडाच तुम्ही उचलला असला तरी आपल्या मुलांच्या आयुष्याला आकार देण्याची जबाबदारी ही तुमचीच आहे.”

हे मुकेश अंबानीना पटलं आणि म्हणूनच रविवारचा संपूर्ण दिवस मुलांबरोबर होमवर्क करणे, मुलांच्या शंकाची उत्तर शोधणं यामध्ये ते त्यांचा वेळ घालवायचे.

मुलांशी गप्पा मारून ध्येयाचे अनेक पर्याय त्यांच्यासमोर ठेवायचे.

मानवता, साधेपणा, नम्रता हे गुण मुकेश आणि नीता अंबानी यांनी आपल्या मुलांना शिकवले.

पब्लिक ट्रान्सपोर्टमधून शाळेत जाण्याची सवय सुद्धा त्यांच्यासाठी महत्त्वाची ठरली.

आता तुम्ही एका प्रश्नाचे उत्तर द्या.

“तुम्ही अनंतचे आई-वडील असता तर तुम्ही त्याचा पॉकेटमनी वाढवला असता का?
तुम्ही तुमच्या मुलांची प्रत्येक इच्छा पूर्ण करता का?”

जर तुमचे उत्तर “हो” असेल तर लक्षात घ्या तुम्ही तुमच्या मुलांचे एक नंबरचे शत्रू आहात.

२) स्टीव्ह जॉब

एका पत्रकाराने स्टीव्ह जॉब यांना विचारलं की “तुमच्या मुलांकडे तर लेटेस्ट I PAD असेल.”

स्टीव जॉब्स यांनी उत्तर दिलं की “माझी मुलं I PAD वापरत नाहीत.”

पत्रकार गडबडला त्यांनं विचारलं “का?”

त्यावर ते म्हणाले “मी आमच्या घरात टेक डिटॉक्स करतो”. टेक डिटॉक्स म्हणजे टेक्नॉलॉजी पासून दूर राहणं.

हे ऐकून पत्रकाराला प्रचंड आश्चर्य वाटलं. त्यांनं विचारलं “पण नेमकं असं का करता?”

स्टीव्ह जॉब म्हणाले की “मुलांचा मूळ स्वभाव आणि त्यांची निर्मिती क्षमता पूर्णपणे विकसित व्हावी यासाठी हे गरजेचे आहे, नाहीतर ते पूर्णपणे टेक्नॉलॉजी वरती अवलंबून राहतात.”

म्हणूनच एकत्र जेवताना स्टीव्ह जॉब आपल्या मुलांशी छान चर्चा करायचे.

१) महापुरुषांविषयी चर्चा

२) ध्येय गाठणा-या व्यक्तींविषयी चर्चा

३) चरित्र घडवण्यासाठी कोणते गुण असले पाहिजेत याविषयी चर्चा

४) कोण होणार याविषयी चर्चा

५) त्याचबरोबर पुस्तक आणि इतिहास या विषय सुद्धा चर्चा व्हायची.

सामान्य घरात काय चित्र दिसतं?

तर जेवणाच्या वेळेला प्रत्येक जण आपापल्या मोबाईल मध्ये बुडून गेलेले असतात.

आई वडील मोबाईल सोडून प्रेरणादायी गप्पा मारायला थोडेसे अपयशी ठरतात, असं चित्र आज घराघरात दिसतं.

३) जेफ बेझोस.

जगातल्या सगळ्यात श्रीमंत व्यक्तींमध्ये ज्यांची गणना होते त्या जेफ बेझोस यांची महत्त्वाची सवय तुम्हाला माहिती आहे का?

ते असं म्हणतात तुमच्या मुलांच कौतुक करण्याची पद्धत बदला.

तुम्ही त्यांच्या गुणांचं कौतुक करू नका, गुण बऱ्यापैकी अनुवंशिक असतात.

मुलांचे गुण तुमच्या चांगल्या आर्थिक परिस्थितीमुळे बऱ्यापैकी विकसित होऊ शकतात.

त्यामुळे त्यांच्या गुणांचं कौतुक करण्याऐवजी त्यांच्या कष्टाची, त्यांच्या मेहनतीची तारीफ करा.

उदाहरणार्थ तुमच्या मुलांनी एखादं सुंदर पेंटिंग तयार केलं असेल तर “किती सुंदर पेंटिंग तयार केलं आहेस” याऐवजी “हे पेंटिंग तयार करण्यासाठी तू तुझा जीव ओतून काम केलेलं आहेस” असं त्याला सांगा.

एखाद्या चांगल्या पद्धतीने धावणाऱ्या मुलांना “तू किती छान धावतो” हे सांगण्याऐवजी “आजच्या शर्यतीत मन लावून ताकदीचा योग्य वापर केलास हे व्यवस्थित लक्षात आलं” हे त्याच्या मनावर बिंबवा.

मतितार्थ काय? तर व्यक्ती ची तारीफ करू नका, त्यामुळे माणसांच्या मनात इगो निर्माण होतो.

त्या व्यक्तीनं केलेला मेहनतीचं कौतुक करा.

व्यक्तीचं कौतुक केलं जातं तेव्हा ती व्यक्ती स्वतःला ग्रेट समजायला लागते.

कष्टाचा कौतुक केल्यावर मात्र पुढच्या वेळेला ती व्यक्ती आणखी कष्ट करायला सरसावते.

ही पायरी मुलांचा यशासाठी फार महत्वाची ठरतं.

४) बिल गेट्स

बिल गेट्स पालक म्हणून वावरताना अपयशाबद्दल रागवत नाही किंवा यशाच वारेमाप कौतुकही करत नाहीत.

ते म्हणतात “अरे वा ! चांगली मेहनत केलीस” किंवा ” जsरा मेहनत कमी पडली, पुढच्या वेळेला जास्त मेहनत कर”.

मित्रांनो आई वडील ईथेच तर कमी पडतात.

मुलांना नेमकं काय शिकवायचं हे लक्षात घ्या.

त्यांच्यावर शिक्के मारू नका, त्यांचं संगोपन सजगपणे करा.

“यांचं कसं होणार?” किंवा “याला कोणतीही गोष्ट जमतच नाही” ” त्याला कोणत्याही कलेची आवड नाही” ” कोणत्याही खेळात त्याचं मन रमत नाही” ” तो मुलगा बघा कसा खेळतो?” “ती मुलगी बघा कशी छान गाते?” अशी कुणाशीही त्याची तुलना करू नका, आणि कोणत्याही स्पर्धांमधे त्याला ढकलू नका.

५) वॉरन बफे

अरबपती असणारे वॉरन बफे कशा पद्धतीचे पालक आहेत?

जेव्हा त्यांची मूलं त्यांच्याकडे काही मागणी करायचे तेंव्हा वॉरेन बफे त्याला सांगत “एक पेपर घे, या पेपर वरती या गोष्टीची का गरज आहे? ते लिहून काढ.

ते लिहिलेलं वाचून काढलं आणि जर त्यातून तुला वाटलं की त्या वस्तूची तुला खरंच आहे तर माझ्याकडे ये मी ती वस्तू तुला घेऊन देतो”.

बऱ्याच वेळेला त्या वस्तू विषय लिहिता-लिहिता मुलांच्या लक्षात यायचं खरंच या गोष्टीची आता फारशी काही गरज नाही.

अशा गोष्टी ९९% वेळा घडायच्या. मुलांची मागणी कार, घर, ब्रँडेड कपडे या सगळ्या लिहून काढता काढता त्यांच्या लक्षात यायचं की या गोष्टी आत्ता फार गरजेच्या नाहीत.

आणि म्हणूनच स्वतःची ९९% संपत्ती दान करण्याची घोषणा वॉरेन बफे यांनी केली त्या वेळेला त्यांच्या मुलांनी कोणतीही आडकाठी केली नाही.

याउलट आपण बघतो की सामान्य घरात छोटयाशा संपत्तीवरून सुद्धा पालक मुलं किंवा भावंडांच्यात वाद होतो.

पण वॉरेन बफेच्या मुलांनी इतकी प्रचंड संपत्ती वाटून टाकायला काहीच हरकत घेतली नाही.

कारण त्यांच्यामध्ये जी काही मूल्ये रूजवली होती ती होती नीड्स अँन्ड वॉन्टसची.

“गरज” आणि “हट्ट” यातला फरक या मुलांच्या लक्षात आला होता, आणि म्हणून ती मुलं समाधानी आहेत.

बऱ्याच वेळेला पालकच मला जे मिळालं नाही ते मुलांना मिळावं म्हणून त्यांची प्रत्येक मागणी, प्रत्येक इच्छा तर पुर्ण करतातच.

पण त्यांनी न मागता सुद्धा त्यांना चांगली शाळा, चांगले कपडे चांगल्या वस्तू मिळवून देतात.

मुलांना प्रत्येक गोष्ट आणून देणं किंवा आम्हाला कसं काहीच मिळालं नाही याचा रडगाणं गाणं त्यात दोन्ही गोष्टी पालक म्हणून टाळल्या पाहिजेत.

एक जबाबदार पालक होताना आपल्या मुलाचा मूळ स्वभाव जाणून घेऊन त्याला आकार देण्यासाठी फक्त मदत करा आणि एक उत्तम पालक बना.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!