संघर्ष केल्याशिवाय जीवनात सुख मिळवणे कठिण!

prernadayi vichar marathi

 

आपण आपल्या आजुबाजूला अशी बरीच लोकं बघतो, ज्यांच्यामध्ये थोडादेखील संयम नसतो.

ज्यांना कोणत्याही समस्येतून ताबडतोबत बाहेर पडायचे असते, कोणत्याही प्रयत्नानंतर लगेच यशाची अपेक्षा असते, ज्यांना संघर्ष न करता विजय प्राप्त करायचा असतो. आणि हे सगळे संघर्ष न करता मिळावे अशी त्यांची भाबडी अपेक्षा असते.

पण मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, या जगातील लहानातील लहान जीवाला सुध्दा पुढचा क्षण पाहण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागतो.

जे संघर्षाला नाही म्हणतात ते, त्यांच्या आयुष्यात कित्येक सुखांना मुकतात. तुम्हाला जर तुमच्या जीवनात सुख, शांती, समाधान हवं असेल तर, तुमच्याकडे एकच गोष्ट कायम उरते ती म्हणजे स्वतःवरती संयम पाळून संघर्ष करत राहणे.

आजपर्यंत ज्या-ज्या महान व्यक्ति या जगात होऊन गेल्या त्यांच्या यशाची गुरूकिल्ली होती…. संघर्ष, संघर्ष आणि केवळ संघर्ष.

तुम्हालाही तुमच्या आयुष्यात प्रत्येक घडीला वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागत असेल.

या जगात सर्व सुखी असा कुणीच नाही, हे आपणा सर्वांनाच माहित आहे. प्रयत्नांती परमेश्वर, आधी हाताले चटके तेव्हा मिळते भाकर असे बरेच सुविचार तुम्ही आजपर्यंत ऐकत आला असाल, परंतु हाताला चटके सोसून भाकर तयार होईपर्यंतचा संयम जर तुमच्यात असेल, तर तव्यावरची भाकर ही नक्कीच तुमचीच असणार.

समस्या सगळ्यांच्या आयुष्यात असतात परंतु आपल्याला वाटतं आख्ख्या जगाचं टेन्शन मलाच आहे, आख्खं जग सुखात आहे आणि मीच तेवढा समस्यांनी गुरफटलेला आहे.

तर असं काहीही नसतं, आपल्या आयुष्यातील समस्या लपवून सुखी राहता आलं पाहिजे, हे प्रत्येकालाच जमत नाही.

डोळ्यासमोर उभा असलेला, संघर्ष, समस्या बाजूला सारून कसं दैनंदिन आयुष्य जगता येईल यासाठीच काही खास टिप्स तुम्हाला या लेखात मी सांगणार आहे.

या उपायांचा अवलंब करून तुम्ही हसत हसत संघर्षाला सामोरे जायला तयार व्हाल.

१) संघर्षाशी मैत्री करा – जगात सर्वात जास्त संघर्ष मलाच करावा लागत आहे, घर-दार, बायका-मुलं, नोकरी याचं टेन्शन फक्त मलाच आहे कारण माझं नशिब खराब आहे. असं म्हणून स्वतःच्या नशिबाला दोष देत बसू नका.

नशिब वगैरे या बोलायच्या गोष्टी असतात, परंतु वास्तविकतः विचार केला तर आपलं नशिब आपण बदलवू शकतो.

यासाठी आपल्यासमोर कित्येक महान पूरूषांची उदाहरणे आहेत, अशांची उदाहरणे डोळ्यासमोर ठेवून आपण न खचता आलेल्या समस्यांना सामोरे गेलं पाहिजे.

ज्यांना संघर्षाशी मैत्री करून पुढे जाता येतं ते या जगात महान ठरतात. तुम्हीही असेच काहीतरी चांगले करायच्या उद्देशाने रोज येणाऱ्या समस्यांना आपलंसं करून जीवन जगायला शिकलं पाहिजे.

चांगल्या गोष्टी सहजासहजी मिळत नाही – जी गोष्ट तुम्हाला लवकर किंवा लगेच मिळते तिची तुम्हाला किंमत राहत नाही. अर्थात, अशा गोष्टी तुमच्यासाठी चांगल्या नसतातच. वाईट सवयी लगेच लागतात परंतु चांगल्या सवयी लागायला काही काळ जावा लागतो.

तसेच यशाच्या बाबतीत आहे, यश मिळवण्यासाठी दिर्घकाळ संघर्ष करावा लागतो. काही न करता मिळालेल्या गोष्टी जास्तकाळ टिकत नाहीत. तुम्ही चोरी, लबाडी करून, खोटं बोलून, लुटमार करून पैसे मिळवू शकता. पण हा व्यवसाय तुम्ही चिरकाल नाही करू शकत.

यातून माणसाला लगेच अडचणी येत नाहीत परंतु जेव्हा येतात तेव्हा, तुमचा हा वाईट धंदा तुम्हाला आयुष्यातून उठवू शकतो. आणि कष्ट करून मिळवलेले पैसे यामध्ये जे समाधान असतं ते वाईट मार्गाने मिळवलेल्या पैशात, संपत्तीत नसतं.

जेव्हा कामात अडचणी येतात तेव्हा समजून जा की, तुम्ही योग्य दिशेने जात आहात.  पण असे अडथळे येऊनही जेव्हा तुम्ही न थांबता, न थकता पुढे जात राहाल तेव्हा ठरलेले ध्येय गाठण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही. 

त्यामुळे एखाद्या कामात खूपच अडचणी येत असतील तर खचून जाऊ नका. हाच तुमच्या आयुष्यातला खरा संघर्ष आहे आणि या संघर्षाच्या काही पायऱ्या अजून चढल्या की, तुमचे यश तुमच्या समोर असणार आहे, हे मनात ठेवून आलेल्या संघर्षाला आपलंसं करायला शिका.

Give Up करू नका, धीर धरा हेच सांगणारी एक उत्कंठावर्धक कहाणी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

३) समस्येचे मूळ शोधा – जॉबमध्ये सारख्या अडचणी येत आहेत, कितीही जॉब स्विच केले तरी कुठेच टिकत नाहीये, अमुक-अमुक कोर्स पूर्ण करायचा आहे पण होतच नाहीये, व्यवसाय पुढे जात नाहीये, घरातल्या समस्या सुटता सुटत नाहीये.

अशा अनेक समस्या आपल्या सर्वांच्या आयुष्यात असतात. त्यासाठी त्या समस्येचे मूळ शोधता आलं पाहिजे. एखादी अडचण वारंवार येत असेल तर त्या प्रत्येक प्रयत्नामध्ये काहीतरी एक चूक समान असते.

जोपर्यंत ही कॉमन चूक तुम्ही शोधत नाही तोपर्यंत तुम्हाला त्या समस्येमागील कारणं सापडत नाहीत.

आणि कारणच माहित नसेल तर त्यावर उपायही शोधता येत नाही.

संघर्ष करणे म्हणजे गाढवासारखे एखाद्या गोष्टीसाठी राबत राहणे नव्हे, नुसतीच पायपीट करून दिशा सापडत नाही तर त्यासाठी योग्य दिशेने चालावे लागते व ही दिशा शोधण्याचे काम हे सर्वप्रथम तुमचे असते.

तुम्हाला तुमच्या आयुष्यात येणाऱ्या समस्यांचे नीट व्यवस्थापन करता आले, की तुम्ही त्या सहजपणे सोडवू शकता. त्यामुळे नुसतेच प्रयत्न न करता समस्येमागील मूळ कारण आधी शोधा आणि मग पुढचे प्रयत्न करत रहा.

४) आपल्या जगण्याचे कारण शोधा- हा प्रश्न खूप कमी जणं स्वतःला विचारतात. परंतु हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे.

जो तुमचे आयुष्य सुखकर करेल. या भूतलावरील कोणताच जीव सहजच जगत नाही,

प्रत्येकाच्या जगण्यामागे कारण असते. किड्या मुंग्या, प्राणी, पक्षी यांना आणि आपल्यातील प्रत्येकाला आपला मृत्यू कधी येईल हे माहित नसते, पण त्यांना पुढचा क्षण, उद्याचा दिवस कसा असेल हे पाहायचे असते.

त्यांच्यामध्ये विश्वास असतो की उद्या येणार आणि आपण जगणार त्यासाठी उद्याच्या उदरनिर्वाहासाठी आपल्याला आजच आपले संरक्षण करणे आवश्यक असते.

म्हणूनच, हंगामानुसार ते आपापल्या घरट्यांची, खाण्या-पिण्याची सोय करत असतात. पण या सगळ्यात जो खचतो, तो मात्र संपतो….

हे जग तुमच्यासोबत धावणार नाही, तर तुम्हाला जगासोबत धावता आले पाहिजे, यासाठी आधी आपण का धावतो आहे, याचे कारण आपल्याकडे असायला हवे. जर कारणच नसेल तर आपल्या संघर्षालाही काहीच अर्थ नाही.

तर मित्रांनो, हे वरील सर्व मुद्दे वाचून नक्की एकदा स्वतःला त्यातले प्रश्न विचारा आणि बघा काय उत्तर मिळतं ते, नक्कीच तुमचा संघर्ष देखील सुखमय होईल.

Manachetalks

तुम्हाला हा लेख कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. आणि हो! हा लेख दिलेल्या योग्य पर्यायांचा वापर करून आपल्या मित्र मैत्रिणींना शेअर करा.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!