करूया सीमोल्लंघन आपल्या क्षमतांचे!!

dasra shubhechha in marathi simollanghan

मानवी मनाचा हा नैसर्गिक गुणधर्म आहे की आपल्याला सुरक्षित वातावरण हवे असते.

पण कधीकधी याचा अतिरेक होतो आणि आपली प्रगती थांबते.

कोषातील सुरवंटाचे सुंदर फुलपाखरू होण्यासाठी त्याने भोवतालचे वेढून टाकणारे आवरण दूर केले पाहिजे.

त्याचप्रमाणे आपणही जीवनात आपल्याला मागे खेचणाऱ्या गोष्टी ओलांडून पुढे वाटचाल केली पाहिजे. यालाच म्हणतात सीमोल्लंघन !!!

या लेखात आम्ही स्वतःच्या क्षमता वाढविण्याचे उपाय तुम्हाला सांगणार आहोत.

१. नियमित व्यायाम

आयुष्यात कोणतेही ध्येय गाठण्यासाठी आपले शरीर सुदृढ हवे. नाहीतर मनात कितीही कल्पना असल्या तरी त्या प्रत्यक्षात उतरवणे शक्य नाही.

म्हणून आपले शरीर ही सर्वात मोठी संपत्ती आहे. आणि हे शरीर शेवटपर्यंत चालते फिरते रहायला हवे तर व्यायामाला पर्याय नाही.

दररोज न चुकता दिवसातून एक तास व्यायामासाठी राखून ठेवलाच पाहिजे.

यात योगासने, चालणे, धावणे, सायकलिंग, पोहणे असा कोणताही व्यायाम अंगातून घाम निघेपर्यंत करावा.

चालणाऱ्याचे भाग्य चालते असे म्हणतात. याचा अर्थ असा की तुम्ही सक्रीय असाल तर अनेक संधींचा लाभ घेऊ शकता.

२. सदैव विद्यार्थी दशेत रहा

शिक्षणानंतर मनासारखी नोकरी मिळाली की स्थैर्य येते. आणि काही जण आहे त्या परिस्थितीत समाधान मानतात.

नवीन काही शिकण्याचा कंटाळा करतात. यामुळे आपल्या प्रगतीला खीळ बसते.

वय वाढले, वेळ मिळत नाही, खूप जबाबदारी आहे अशी अनेक कारणे आपण पुढे करतो आणि स्वतःभोवती एक कुंपण घालून घेतो.

हा विचार म्हणजे एक पिंजरा आहे. यामुळे तुम्ही मुक्त होऊन, पंख पसरून आभाळात भरारी कधीच घेऊ शकणार नाही.

समाज काय म्हणेल या भीतीपोटी कित्येक व्यक्ती शारीरिक आणि मानसिक छळ सहन करत रहातात.

दबावाखाली जगण्यात आयुष्यातील उमेदीची वर्षे वाया जातात आणि निराशा पदरी पडते.

तुमच्या आयुष्यातील शिक्षण, लग्न, मुल जन्माला घालण्याचा निर्णय, नोकरी, व्यवसाय याबाबत पाऊल उचलताना लोक काय म्हणतील हा विचार बाजूला ठेवा.

कारण अडचणीच्या वेळी हेच लोक काढता पाय घेतात. महत्त्वाचे निर्णय घेताना जवळच्या व्यक्तींचा सल्ला जरूर घ्या पण अंतिम निर्णय घेण्याचा हक्क स्वतःजवळ ठेवा.

४. माझे आयुष्य माझी जबाबदारी

ज्याप्रमाणे निर्णय घेण्याचा हक्क आपला त्याचप्रमाणे त्या निर्णयाची संपूर्ण जबाबदारी आपली.

जर काही गोष्टी चुकीच्या घडल्या तर इतरांना दोष देत बसू नये. काय चुकले, कुठे चुकले हे परीक्षण करावे.

जेव्हा आपण संपूर्णपणे ” स्व” चा स्विकार करतो तेव्हाच एक व्यक्ती म्हणून आपला विकास होतो.

भित्रेपणा किंवा आत्मविश्वास नसला की जबाबदारी टाळण्याची वृत्ती वाढीस लागते.

यामुळे आपल्या व्यक्तीमत्त्वाची मर्यादा स्पष्ट दिसते. कोणत्याही नात्यात किंवा कामाच्या ठिकाणी अशा व्यक्तींना गृहीत धरले जाते.

म्हणून या कमजोरी वर मात करून ही सीमा पार करा. भलेही काही निर्णय चुकतील पण तुमचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल.

५. नकाराचे स्वातंत्र्य

भिडस्त स्वभाव आपले खूप नुकसान करतो. आणि कधीकधी तर वेळेवर न बोलल्यामुळे प्रचंड मनस्ताप होतो.

म्हणून तुमच्या तत्त्वात न बसणाऱ्या गोष्टींना नाही म्हणायला शिका.

बऱ्याच वेळा पडखाऊ स्वभावामुळे कामावर किंवा घरातही आपला गैरफायदा घेतला जातो.

अगदी लहान सहान गोष्टींपासून ते थेट मोठ्या आर्थिक व्यवहारात आपल्याला गृहीत धरले जाते.

आणि मग आयुष्य म्हणजे फक्त एक तडजोड होऊन बसते. म्हणून स्पष्टपणे नाही म्हणा आणि आपल्या नकारावर ठाम रहा.

यासाठी भांडण करणे, स्पष्टीकरण देणे यांची काहीही गरज नाही. ‘No is a complete sentence.’

आपल्या व्यक्तीमत्त्वाबाबत गंभीरपणे विचार करा. वेगवेगळ्या प्रसंगात आपण कसे वागतो, कसे बोलतो याचे आत्मपरीक्षण करा.

म्हणजे स्वतःच्या कमतरता आणि बलस्थान याबाबत कळेल. याकरीता डायरी लिहीणे हा उत्तम उपाय आहे.

रोज घडणारे महत्त्वाचे प्रसंग आणि त्यावेळचे आपले वर्तन हे या डायरीमधून आपल्याला समजेल. एकदा का strength and weaknesses याबाबत समजले की एक एक मर्यादा समजून घ्या.

आणि त्यांच्यावर काम करा. आपले सद्विचारी नातेवाईक, मित्र मंडळी यांच्याकडून वेळोवेळी फीडबॅक घ्या.

मानसिक त्रास असेल किंवा व्यक्तिमत्त्वातील काही मर्यादा बदलणे त्रासदायक वाटत असेल तर न लाजता कौन्सिलरची मदत घ्या.

समुपदेशन आपल्याला आपल्या व्यक्तीमत्त्वाबाबत जागरूक करते, उपाय आणि पर्याय सुचवते.

आणि मग नव्याने स्वतःकडे पहाता येते.

मित्रमैत्रिणींनो दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर हे असे सीमोल्लंघन करा. तुमचे आयुष्य सोन्यासारखे झळाळून उठेल.

लेख आवडल्यास जरूर लाईक, शेअर करा. सुविचारांचे सोने लुटा !!! 

विजयादशमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

4 Responses

 1. Goraksha Hari sukate says:

  खूप छान लेख आहे.
  आजपासून नक्कीच प्रयत्न सुरू वात करतो

 2. प्रमोद रा. नाईक says:

  सुविचारांचे सोनं लुटण्याची संधी आपण सीमोल्लंघन या लेखातुन दसऱ्याच्या शुभ दिवशी दिली त्या बद्धल आपल्याला मनःपूर्वक धन्यवाद व खुप खुप शुभेच्छा.

 3. Sandeep Mahekar says:

  परिस्थितीशी दोन हात करतानाच क्षमतांचा कस लागतो आणि त्या विकसीत होत जातात.
  परिस्थिती आपल्याला comfort zone च्या बाहेर काढते त्यामुळेच खरी प्रगति होते.
  हे खारे सीमोल्लंघन..

 4. Sandeep Mahekar says:

  परिस्थितीशी दोन हात करतानाच क्षमतांचा कस लागतो आणि त्या विकसीत होत जातात.
  परिस्थिती आपल्याला comfort zone च्या बाहेर काढते त्यामुळेच खरी प्रगति होते.
  हे खरे सीमोल्लंघन..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!