गरोदरपणात मॉर्निंग सिकनेस ने त्रस्त आहात? करा हे उपाय

गरोदरपणात मॉर्निंग सिकनेस का जाणवतो?

 

बाळाच्या आगमनाची गोड बातमी मिळाली की घरदार आनंदाने नाचू लागतं. बाळाच्या आईसाठी तर हा अनुभव विलक्षण अनुभूती देणारा असतो.

पहिल्याच वेळी हा अनुभव घेणारी स्त्री जशी आनंदी असते तशीच काही बाबतीत अस्वस्थ देखील.

गर्भधारणा झाल्यानंतर पहिल्या तीन महिन्यांत आईला जाणवणारा मुख्य त्रास म्हणजे सकाळी उठल्यावर मळमळ आणि चक्कर आल्यासारखे वाटणे.

याबद्दल शास्त्रशुद्ध आणि सखोल माहिती देण्यासाठी आम्ही खास हा लेख घेऊन येत आहोत.

मॉर्निंग सिकनेस म्हणजे काय ?

गरोदरपणातील पहील्या तीन महिन्यांत चक्कर येणे, मळमळणे अशी लक्षणे दिसतात.

हा त्रास जास्त करून सकाळी जाणवतो त्यावरून हे नाव पडले आहे पण ही लक्षणे दिवसभरात कोणत्याही वेळी जाणवू शकतात.

मॉर्निंग सिकनेसची कारणे

गरोदरपणात शरीरातील अनेक हार्मोन्स बदलतात आणि त्यामुळे अशी लक्षणे दिसतात असे वैद्यकीय शास्त्रात मानले जाते पण या लक्षणांचा उद्भव नक्की कशामुळे होतो हे समजलेले नाही.

गर्भधारणा झाल्यानंतर सहा ते नऊ आठवड्यांनी हा त्रास सुरू होतो आणि बारा ते पंधरा आठवडे संपत आले की हळूहळू कमी होतो.

ही एक नैसर्गिक अवस्था आहे त्यामुळे लक्षणे खूपच गंभीर नसतील तर साधे घरगुती उपाय केल्यास आराम मिळतो.

पण तीव्र लक्षणे असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. पहिल्याच वेळी गर्भवती असलेल्या स्त्रियांना हा त्रास जास्त होतो.

प्रेग्नन्सी मधील तीव्र लक्षणांमुळे कोणते परिणाम होऊ शकतात?

अती प्रमाणात उलट्या झाल्यामुळे शरीरातील पाणी कमी होते व डिहायड्रेशन होऊ शकते.

या अवस्थेला वैद्यकीय भाषेत Hyperemesis Gravidarum असे म्हणतात.

वारंवार उलट्या झाल्यामुळे गरोदर स्त्रीचे वजन कमी होते.

गर्भातील बाळाच्या पोषणावर याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.

२. मायग्रेन किंवा मोशन सिकनेस म्हणजे चालत्या गाडीत बसले असता चक्कर व मळमळ जाणवणे असा त्रास पहिल्या पासून असेल तर गर्भावस्थेत ही लक्षणे जास्त वाढण्याची शक्यता असते.

३. अनुवंशिक म्हणजे जर गरोदर स्त्रीच्या आईला गर्भारपणात असा त्रास झाला असेल तर

मॉर्निंग सिकनेस टाळण्यासाठी काय करावे?

एकदम जास्त प्रमाणात अन्न घेण्याऐवजी तीन ते चार वेळा थोडे थोडे खाऊन घ्यावे.

अती मसालेदार, उग्र पदार्थ टाळावेत. साधे, घरगुती, ताजे अन्न सेवन करावे.

तेलकट व चरबीयुक्त पदार्थ पचायला जड असतात म्हणून ते टाळावे.

प्रोटीन युक्त पदार्थांचा आहारात समावेश करावा.

ज्या विशिष्ट वास किंवा आवाज यामुळे त्रास होतो ते ट्रीगर्स टाळावेत. योग्य प्रमाणात द्रवपदार्थ घ्यावेत.

डॉक्टरांच्या सल्ल्याने व्हिटॅमिन औषधे सुरू करावीत. फॉलिक ॲसिड योग्य प्रमाणात घेणे खूप गरजेचे आहे.

गर्भधारणा होण्याच्या पूर्वी या गोळ्या सुरू केल्या तर उलट्यांचा त्रास जास्त प्रमाणात होत नाही.

जर डिप्रेशन किंवा इतर कोणत्याही प्रकारचा मानसिक त्रास जाणवत असेल तर काऊन्सेलरची मदत घ्यावी.

मॉर्निंग सिकनेस आणि आयुर्वेदिक उपचार

आयुर्वेदामध्ये गर्भिणी परिचर्येचे खूप छान वर्णन केले आहे. यात पहिल्या तीन महिन्यांत उलट्यांचा त्रास होत असल्यामुळे गर्भिणीला कोणता आहार द्यावा हे सांगितले आहे.

तोंडाला चव नसणे, मळमळ ही लक्षणे असताना डाळिंब, लिंबू रस किंवा आल्याचा रस यांचा उपयोग करावा.

दुधामुळे शरीराचे पोषण होते. गाईचे दूध पचायला हलके आणि पोषणमूल्य जास्त असलेले आहे. म्हणून पहिल्या तीन महिन्यांत दुधाचे पदार्थ गर्भिणीला द्यावेत.

विविध प्रकारची खीर, पायस यांचा आहारात समावेश करावा.

मूग व मुगाचे पदार्थ पचायला हलके असल्याने मुगाचे कढण, यूष म्हणजे सूप सारखा प्रकार आहारात घ्यावा.

मनुका, लोणी, तूप, मऊ भात, ताक, पेज यामुळे उलट्यांचा त्रास कमी होतो.

काळ्या मनुका खाणे फायदेशीर आहे.

कोकम, आवळा, चिंच, कैरी, डाळिंब इत्यादी फळांमुळे तोंडाला चव येते.

ऋतुमानानुसार उपलब्ध असणारी फळे आणि त्यांच्यापासून बनविलेले सरबत यामुळे अशक्तपणा जाणवत नाही. उत्तम प्रकारे पोषण होते.

दुधी भोपळा, पडवळ, दोडके, लालभोपळा या भाज्या नियमितपणे आहारात घ्याव्यात.

खडीसाखर, वेलची, यामुळे मळमळ कमी होते.

याशिवाय आयुर्वेदानुसार गर्भिणीचे मन प्रसन्न राहील असे वातावरण असावे हे सुद्धा सांगितले आहे.

यासाठी उत्तम संगीत ऐकणे, मंत्रपठण, जप, चांगल्या पुस्तकांचे वाचन नियमितपणे करावे.

मन स्थिर व शांत असेल तर शारीरिक त्रास कमी प्रमाणात जाणवतात.

गर्भिणीने हलका व्यायाम करावा. पुरेशी झोप घ्यावी. अतिश्रमाची कामे, घोडेस्वारी किंवा अवघड ट्रेक करु नयेत.

सुयोग्य आहार, नियमित तपासणी, सकारात्मक दृष्टीकोन ठेवला की गर्भावस्थेतील पहिला टप्पा आनंदाने पार पडेल.

तुम्हाला हा लेख कसा वाटला हे कमेंट्स करुन सांगा. लाईक व शेअर करा.

हसरे, खेळकर, नीरोगी बाळ जन्माला येण्यासाठी गर्भसंस्कार कसे करावे?

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!