आयुर्वेदिक सुगंधी उटणे बनवा घरच्या घरी 

utane powder

दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव, मंद तेवणाऱ्या पणत्या, आकाशकंदील, रोषणाई!!!

फराळाची चंगळ, दारासमोर सुंदर रांगोळी आणि दिवाळीचा खरा आनंद म्हणजे भल्या पहाटे सुगंधी उटणे लावून केलेलं अभ्यंगस्नान!!!

सुगंधी उटण्याचा मंद सुवास मन कसं प्रसन्न करतो. दिवाळी जवळ आली की बाजारात फेरफटका मारताना हा उटण्याचा सुगंध जाणवतो.

जरी विकत मिळणाऱ्या उटण्याचे अनेक प्रकार उपलब्ध असले तरी या लेखातून खास आयुर्वेदानुसार घरच्या घरी सुगंधी उटणे कसे बनवायचे  हे आम्ही सांगणार आहोत.

हे उटणे जास्त प्रमाणात बनवून ठेवून तुम्ही वर्षभर वापरु शकता. नक्कीच केमिकल युक्त साबणा पेक्षा तुमच्या त्वचेसाठी हे अतिशय लाभदायक आहे.

उटण्याचे गुणधर्म कोणते?

उटण्याचे संस्कृत नाव आहे उद्वर्तन. याचा अपभ्रंश होऊन उटणे किंवा उबटन असा शब्द रुढ झाला. उद्वर्तन म्हणजे लेप लावणे.

उटणे खरखरीत असते त्यामुळे त्वचेवर स्क्रबिंग करते. या हलक्या घासण्यामुळे डेड स्कीन निघून जाते. व नवीन सतेज त्वचा येते.

उटण्याने केलेल्या मालिश मुळे रक्ताभिसरण सुधारते. त्वचेचा ग्लो नैसर्गिकरीत्या वाढतो.

काळेपणा, सन टॅनिंग दूर होते.

उटण्यासाठी वापरलेल्या वनस्पती जंतुनाशक, रंग उजळणाऱ्या, त्वचा मुलायम करणाऱ्या असतात उटण्याचा सुगंध मन प्रसन्न करतो.

त्वचेवरील छिद्रे उघडल्याने त्वचेचे आरोग्य सुधारते लहान मुलांना उटणे लावून मालिश केले असता शरीरावरील लव निघून जाते. शरीराचे बल वाढते.

उटणे संपूर्णतः नैसर्गिक त्यामुळे सुरक्षित आहे.

असे अनेक फायदे असलेले उटणे नेमके दिवाळीच्या अभ्यंगस्नानासाठी का वापरत असावेत?

अभ्यंगस्नान आणि उटणे 

विशेषत: वात प्रकृतीच्या लोकांना हा त्रास अधिक जाणवतो. टाचांना भेगा पडणे, ओठ फुटणे, सांधेदुखी हा त्रास थंडीमुळे जास्त वाढतो.

म्हणून या दिवसांत थंडीपासून बचाव करण्यासाठी गरम पाण्याने स्नान व त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी कोमट तेलाने सर्वांगाला मसाज केला जातो.

त्यानंतर सुगंधी उटणे लावून अभ्यंगस्नान केले जाते. यामुळे थंडीपासून संरक्षण तर मिळतेच पण अभ्यंग म्हणजे मसाज केल्याने स्नायू व हाडे मजबूत होतात.

उटण्यामुळे त्वचा निरोगी, चमकदार आणि मुलायम होते.

असे हे उटणे फक्त दिवाळीपुरतेच न वापरता संपूर्ण वर्षभर वापरले तर त्वचेचा पोत सुधारतो.

कांती तेजस्वी होते. डाग, पुरळ आणि इतर स्कीन ॲलर्जीचे प्रमाण कमी होते. केमिकल युक्त साबणाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी असे उटणे भरपूर बनवून ठेवले तर वर्षभर टिकते.

उटणे कसे बनवायचे?

आयुर्वेदिक दुकानात वेगवेगळ्या वनस्पतींचे चूर्ण किंवा भरड म्हणजे जाडसर दळलेली पावडर मिळते. यापैकी वनस्पतींचे खालीलप्रमाणे मिश्रण करून तुम्ही सहजपणे घरच्या घरी शुद्ध, नैसर्गिक, औषधी गुणधर्म युक्त उटणे बनवू शकता.

उटण्यामधील घटक 

  • मसूर डाळीचे पीठ : १०० gm
  • आवळकाठी : १०gm
  • सारिवा : १०gm
  • वाळा : १०gm
  • नागरमोथा :  १०gm
  • ज्येष्ठमध :  १० gm
  • सुगंधी कचोरा : १०gm
  • आंबेहळद : १० gm
  • तुलसी पावडर :  १० gm
  • कापूर :  २ gm

यात तुम्ही घरात वाळवलेल्या देशी गुलाबाच्या पाकळ्यांची पावडर किंवा उन्हात वाळवलेल्या संत्र्याच्या सालीची पावडर सुद्धा मिक्स करु शकता.

वरील सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र करून हवाबंद डब्यात भरून ठेवावे. म्हणजे उटण्याचा सुगंध छान टिकून रहातो.

वापरताना यातले उटणे कच्च्या दुधात भिजवावे. त्यात एक चमचा तीळ तेल किंवा खोबरेल तेल मिसळून मग अंगाला लावावे. तेल टाकल्याने उटणे कोरड्या त्वचेवर घासले जात नाही.

तसेच ते त्वचेला चांगले चिकटून रहाते. सर्वांगाला हा उटण्याचा लेप हळूवारपणे मालिश करुन लावावा.

उटण्याचे कण डोळ्यात जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. हा लेप थोडासा वाळला की हलक्या हाताने घासून काढावा.

चेहऱ्यावरील लेप जोरात घासू नये. तो पाण्याने धुवून काढावा. उटणे काढून स्नान करण्यासाठी कोमट पाणी वापरावे.

असे आरोग्यदायी उटणे बनविण्याची ही पद्धत तुम्हाला कशी वाटली ते जरूर सांगा. लाईक व शेअर करून ही उपयुक्त माहिती सर्वांपर्यंत पोहोचवा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!