अवघड कामं पूर्ण करण्याचे/मेंदूला चालना देण्याचे सात उपाय.

how to do difficult things in marathi

एखादं काम तुम्हाला अवघड वाटतं त्यावेळी तुम्ही ते टाळता का? की सरळ अपूर्ण सोडता?

असं असेल तर हा लेख तुमच्यासाठीच आहे. आयुष्यातील कोणतंही कठीण काम करण्यासाठी गरज असते ती आपल्या मनाला समजावण्याची!!!!

एकदा का तुम्ही मनावर घेतलंत की मग इतर सर्व मागे खेचणारे विचार गळून पडतात. आणि फक्त आपलं ध्येय कसं गाठायचं, त्यासाठी काय करायचं हेच आपण सतत पहातो.

या लेखातून आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत ज्यामुळे आयुष्यात कठीण, न आवडणाऱ्या गोष्टींपासून तुम्ही पळ काढणार नाही.

विचार करा की तुम्ही सकाळी योगासनांच्या क्लासला जाताय. तुमची वेळ आहे सकाळी सहाची !!! तुम्हाला त्यासाठी सकाळी पाच वाजताच उठावं लागतं.

आणि साधारण एक आठवडा क्लास सुरू होऊन झालाय. या एवढ्या दिवसात तुम्हाला समजलंय की योगासने करणे तुम्हाला तितकेसे जमत नाहीय.

मग अशा परिस्थितीत रोज पाचचा गजर वाजला की तुम्ही उठायलाच टाळाटाळ करता.

यापुढे क्लासला जाऊन आसनं करायची आहेत या विचारानेच तुम्हाला आळस भरतो.

अंथरुणातून उठण्याची अजिबात इच्छा होत नाही.

याउलट का आपण त्या क्लासला ॲडमिशन घेतली? चूकच झाली असे विचार सारखे मनात येतात.

हे एक उदाहरण म्हणून आपण बघतोय. यात योगासने करणं हे या व्यक्तीला कठीण वाटतंय आणि आपल्याला ते चांगलं जमतं नाही याची कल्पना देखील तिला आहे.

पण जर असं असूनही हे न जमणारं काम नेटाने पूर्ण करायचं असेल तर त्यासाठी काय केलं पाहिजे?

अवघड गोष्टींना आव्हान म्हणून स्विकारा.त्या मुळे तुम्ही एक कणखर व्यक्तिमत्त्व बनाल !!!

असे अनेक प्रेरणादायी विचार तर आपण ऐकतो. मग ते प्रत्यक्षात कसे आणायचे हे पाहूया.

अवघड कामं का टाळायची नाहीत?

मानवी मनाचं एक वैशिष्ट्य आहे. आपल्याला सहज, जास्त श्रम न करता जे काही साध्य होईल ते हवं असतं.

पण असं असलं तरीही सहजपणे होणारी प्रत्येक गोष्ट ही उत्कृष्ट असेलच असं नाही.

आणि कोणतेही काम करताना आपण सर्वात सोपा मार्ग शोधतो त्यावेळी आपण आळशी होत जातो.

हो, हे अगदी खरं आहे. कारण झटपट काम उरकणे किंवा सोपा उपाय शोधणे म्हणजेच तुम्ही नवीन कल्पना, वेगवेगळ्या पद्धतीने विचार करणे, नवीन मार्ग शोधणे यापैकी काहीही करण्यासाठी तुमच्या मेंदूचा वापर करत नाही.

तुमचा फोकस शॉर्ट कट मारुन एकदाचे काम उरकून टाकणे हाच असतो. आणि मेंदूला आपण जशी सवय लावू तसाच तो काम करतो.

म्हणून अशा प्रकारे सोपा मार्ग शोधणे म्हणजे आपण आळशी होत जाणे!!!

मेंदूवर झालेल्या शास्त्रीय संशोधनानुसार शरीराच्या इतर स्नायूंप्रमाणेच, जर तुम्ही जास्त वापर केलात तर मेंदू अधिक कार्यक्षम राहील.

न वापरल्याने मेंदूला गंज चढतो असे व्यवहारातही आपण म्हणतोच.

शरीराचा जो अवयव वापरला जात नाही त्याची कार्यक्षमता हळूहळू कमी होऊ लागते आणि हेच मेंदूच्या बाबतीतही खरे आहे.

सतत नवनवीन गोष्टी शिकत राहिल्यास मेंदूचा रक्तपुरवठा आणि कार्यशक्ती दोन्ही सुरळीत रहातात.

मेंदू तल्लख ठेवण्यासाठी टिप्स

बराच काळ पर्यंत तुम्ही नवीन काही शिकलाच नाहीत तर नव्याने एखादी गोष्ट करताना तुम्हाला ती जड जाते.

किंवा एखाद्या गोष्टीत बराच खंड पडला तर पूर्वीचे काही तुम्हाला नीट आठवत नाही.

हा अनुभव तर आपण सर्वांनी घेतलाच असेल.

अमेरिकेत एक प्रयोग करण्यात आला. यात काही उंदरांना प्रयोगशाळेत अगदी आरामदायक परिस्थितीत ठेवून त्यांची निरीक्षणे नोंदविली गेली.

तर इतर काही उंदरांना शिकार पकडणे किंवा जगण्यासाठी धडपड करावी लागते त्यांची निरीक्षणे सुद्धा नोंदविली गेली.

तुलनात्मक अभ्यास केल्यावर असे लक्षात आले की आरामदायक परिस्थितीत असणाऱ्या उंदरांच्या मेंदूचे वजन धडपड करणाऱ्या उंदरांच्या मेंदूच्या तुलनेत कमी भरले.

म्हणजेच अवघड परिस्थितीत रहाणाऱ्या उंदरांचा मेंदू वजनाला जास्त होता, अधिक कार्यक्षम होता आणि घनता सुद्धा जास्त आढळली.

याचाच निष्कर्ष असा निघतो की अवघड किंवा आव्हानात्मक परिस्थितीला सामोरे गेल्यास मेंदूचा विकास अधिक चांगल्या प्रकारे होतो.

पण तुम्ही म्हणाल की हे तर उंदरांबाबत झालं, पण मानवी मेंदूचं काय?

तर मानव आणि उंदीर यांच्या मेंदूच्या तौलनिक अभ्यासात असं दिसतं की या दोघांच्याही मेंदूची संरचना आणि कार्यक्षमता यात खूपच साम्य आहे. दोघांच्याही मेंदूमध्ये असलेल्या न्यूरॉन्समधेही साम्य आहे.

तर या प्रयोगातून लक्षात येईल की ज्याप्रमाणे व्यायाम केल्याने शरीराला फायदा होतो, तसाच मेंदूचा व्यायाम केल्याने मेंदू अधिक कार्यक्षम होतो.

जर तुम्ही मेंदूच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेतली तर मेंदू दीर्घ काळ तुम्हाला साथ देईल.

कशी घ्यायची मेंदूची काळजी?

१. मेंदूचे संरक्षण करा

ताणतणाव, अपुरी झोप, अपघात आणि प्रदूषण यापासून मेंदूचे रक्षण करा.

२. पौष्टिक आहार घ्या

मेंदूच्या विकासासाठी आवश्यक असणारी खनिजे आणि जीवनसत्त्वे यांनी समृद्ध आहार घ्यावा.

३. नकारात्मकता टाळा

नेहमी आशावादी, आनंदी आणि सकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न करा.

४. मेंदूचे व्यायाम करा : मेंदू साठी व्यायाम

निरंतर नवनवीन गोष्टी शिकत रहाणे हा मेंदूसाठी उत्तम व्यायाम आहे.

मेंदू साठी व्यायाम

५. सुखी दांपत्य जीवन

यामुळे शरीरातील इस्ट्रोजेन वाढते. परिणामी मेंदू अधिक कार्यक्षम होतो आणि स्मृती चांगली राहते.

३६ गुण जुळुनही ३६ चा आकडा असेल तर नवरा बायकोने काय करावे😄

६. चांगले संगीत ऐका

यामुळे तुम्ही रिलॅक्स होता आणि तुमची एकाग्रता वाढते.

७. वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घ्या

ताणतणाव, चिंता, अस्वस्थता आणि डिप्रेशन यांसारख्या समस्यांना वेळीच ओळखून त्यावर लवकरात लवकर उपचार सुरू करणे आवश्यक आहे.

अशाप्रकारे तुम्ही मेंदूची काळजी घेतली तर तुम्ही कोणत्याही आव्हानाला सामोरे जाल. जर तुम्हाला प्रगती करायची असेल तर आळस, शॉर्ट कट हे सोडून द्यावे लागेल.

नेहमीच्या कम्फर्ट झोन मधून बाहेर पडावे लागेल. मळलेल्या वाटेवरुन चालत राहीलात तर नवीन ठिकाणी पोहोचणार कसे? मग अशा नवनवीन ठिकाणांचा शोध घ्यायचा तर नव्या वाटा, त्यावरची आव्हाने स्विकारलीच पाहिजेत.

हे सर्व सोपे नाही, कष्ट जास्त करावे लागतील पण शेवटी तुम्ही आनंदी आणि समाधानी असाल!!!

आपलं लहानपण जरा आठवून बघा. जेव्हा तुम्ही चालायला शिकलात, थोडे मोठे झाल्यावर सायकल चालवायला लागलात, नंतर बाईक चालवताना सुद्धा तुमच्या लक्षात आले असेल, पहिल्या प्रयत्नात कधी कोणती नवीन गोष्ट जमते का?

आधी आपण थोडं धडपडतो आणि सतत सराव केला की अवघड गोष्ट कधी सोपी होऊन जाते ते कळतही नाही!!!

म्हणून आयुष्यात कोणत्याही अवघड गोष्टींपासून पळ काढू नका.

अवघड गोष्टी साध्य करण्याचे काही उपाय.

१. टप्प्याटप्प्याने काम करा

एखादे अवघड काम करताना लहान उद्दिष्ट ठेवा. प्रत्येक पायरी पार केलीत की स्वतः चे न चुकता कौतुक करा.

यामुळे हळूहळू तुम्ही प्रगती करत जाल.

२. सकारात्मक विचार करा

कोणतेही आव्हान पेलताना तुम्ही मानसिक रित्त्या खम्बिर असाल तर ते काम तडीस नेण्यासाठी पूर्ण प्रयत्न कराल.

म्हणून सकारात्मक विचार केल्यास तुम्ही तुमच्या ध्येयापासून विचलित होत नाही.

३. इतरांची मदत घ्या

टीम वर्क केल्याने उत्साह तसेच जबाबदारीची भावना वाढीस लागते आणि कोणतेही काम पूर्ण करण्यासाठी आपण जास्त प्रयत्न करतो.

कोणतेही अवघड काम करताना आपला आत्मविश्वास हा सर्वात मोठा मित्र आहे. याच्या सहाय्याने आपण भीती, चिंता यावर मात करु शकतो.

म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा. सतत प्रयत्न करत रहा आणि कोणतेही अवघड वाटणारे काम साध्य करा.

हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करुन सांगा. यातला कोणता उपाय तुम्हाला आवडला हे आम्हाला कळवा.

लाईक व शेअर करून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचवा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!