कमी वयात दाढी पांढरी होतेय? जाणून घ्या कारणे

दाढीचे केस पांढरे होता

आजकाल आपण पाहतो की तरुण वयातच दाढीचे केस पांढरे होण्याची समस्या खूप जास्त प्रमाणात दिसून येते.

हे लपविण्यासाठी मग मार्केट मधील केमिकल युक्त प्रॉडक्ट्स वापरली जातात. पण त्यांचा तात्पुरता उपयोग होतो आणि त्यापेक्षाही वाईट गोष्ट म्हणजे अनेक दुष्परिणाम देखील होतात.

याच समस्येच्या मुळाशी असलेली कारणे आणि त्यावरचे उपाय यावर चर्चा करण्यासाठी मनाचेTalks हा खास लेख घेऊन येत आहे.

आजकाल तरुण वयातच दाढीचे केस पांढरे झालेल्या अनेक व्यक्ती आपल्याला दिसतात.

पूर्वीच्या काळात केस पांढरे होण्याची समस्या ही वयानुसार दिसून येत असे. पण आता बदलत्या काळात आपल्या सर्वांच्या जीवनशैलीत खूप फरक पडतो आहे.

त्यामुळे साधारणतः २५ ते ३० या वयोगटातील व्यक्तींना दाढीचे केस पांढरे होण्याची समस्या भेडसावत आहे.

याचप्रमाणे तरुणाईचे डोक्यावरचे केस अकाली पांढरे होताना दिसतात. याची अर्थातच त्यांना लाज वाटते.

समाजात वावरताना या गोष्टीचा न्यूनगंड सुद्धा येऊ शकतो. मग हे लपविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल डाय वापरले जातात. पण यामागे मूळ कारणे कोणती हे जाणून घेऊया.

दाढीचे केस पांढरे होण्याची कारणे

यामागे अनेक कारणे असू शकतात पण मुख्य कारण म्हणजे लाईफस्टाईल!!!

आजकाल आपली जीवनशैली तणावग्रस्त आहे. वेगवान जीवन आणि त्यामुळे खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी यामुळे शरीरात अनेक प्रकारचे बदल होत असतात.

दुसरे कारण म्हणजे मेलॅनिनची कमतरता. यामागे हार्मोन्स मधील बदल हे कारण असू शकते. आता यापैकी प्रत्येक कारण सविस्तर जाणून घेऊया.

१. मेलॅनिनची कमतरता

शरीराची त्वचा आणि केस यांची नैसर्गिक चमक टिकवून ठेवण्यासाठी मेलॅनिन उपयुक्त आहे.

हा एक प्रकारचा पिगमेंट असून याच्या कमतरतेमुळे त्वचा, केस व डोळे यांच्या रंगात फरक पडतो.

शरीरातील मेलॅनिनची मात्रा योग्य प्रमाणात रहावी यासाठी आहारात भरपूर प्रमाणात पालेभाज्या, फळे यांचा समावेश करावा.

पण या सर्व धावपळीत आपल्या तब्येतीची काळजी घ्यायचे मात्र राहून जाते. याचा परिणाम म्हणून चिंता, स्ट्रेस, टेन्शन हे मागे लागते. आणि या अतिरिक्त ताणामुळे डोक्याचे केस, दाढी, मिशी पांढरी होते.

३. पोषक आहाराची कमतरता

यामागे सुद्धा लाईफस्टाईल हेच कारण आहे. सततचे जंक फूड खाऊन शरीराला पाहिजे त्या प्रमाणात पोषण मिळत नाही.

परिणाम म्हणून दाढीचे केस लवकर पांढरे होतात. आहारात व्हिटॅमिन सी युक्त फळे घ्यावीत. चौरस आहार आणि नियमित व्यायाम यामुळे ही समस्या कमी होऊ शकते.

४. व्यसने

स्मोकिंग आणि ड्रिंकिंग हे नवीन लाईफस्टाईल आणि सोशलायझिंग चा एक भाग झालेले आहेत. अनेक तरुण वयातील मुले या व्यसनांच्या आहारी गेलेली आहेत.

पण यामुळे रक्तवाहिन्यांचे आकुंचन होते. त्यामुळे रक्तप्रवाहात अडथळा येतो आणि दाढीचे केस पांढरे होताना दिसतात. म्हणून अशा सवयींपासून दूर रहावे.

दाढीचे केस पांढरे होत असल्यास करा हे घरगुती उपाय

१. आवळा

आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि लोह असते. त्यामुळे केसांसाठी आवळा हितकर आहे.

एका लोखंडी कढईत रात्रभर वाटलेला आवळा भिजत ठेवावा. सकाळी पांढऱ्या झालेल्या दाढीच्या केसांवर याचा लेप लावावा. काही वेळानंतर धुवून टाकावा. हा उपाय नियमितपणे केल्यास पुन्हा केस काळे होण्यास मदत होते.

२. योग्य प्रमाणात पाणी पिणे

योग्य प्रमाणात पाणी पिणे अतिशय आवश्यक आहे. यामुळे शरीर रुक्ष होत नाही. तसेच शरीरातील अनावश्यक विषाक्त पदार्थ पाण्यासोबत मलमूत्राद्वारे बाहेर पडतात.

म्हणजेच बॉडी डिटॉक्स साठी पुरेसे पाणी पिणे गरजेचे आहे. शरीरातील अशुद्धी बाहेर गेल्यामुळे अकाली केस पांढरे होण्याची शक्यता कमी होते.

३. पुदिना

पुदिन्याची पाने वाटून त्यात दोन चमचे वाटलेल्या कांद्याचा रस मिसळावा.

नंतर हा लेप दाढीच्या केसांवर लावावा. काही वेळानंतर धुवून टाकावा. हा उपाय केल्याने काही दिवसांतच दाढीचे केस पुन्हा काळे होतात.

थोडक्यात काय तर योग्य आहार आणि व्यायाम तसेच तणावमुक्त जीवनशैली यामुळे अकाली दिसणाऱ्या म्हातारपणाच्या खुणा घालवणे शक्य आहे.

काहीवेळा आनुवंशिकतेमुळे तरुण वयातच केस पांढरे होणे, दाढी, मिशा पांढऱ्या होणे असा त्रास होतो.

अशावेळी मार्केट मध्ये उपलब्ध असलेल्या केमिकल युक्त प्रसाधनांचा वापर करु नये. काही काळानंतर त्यांचे दुष्परिणाम निश्चितच होतात. त्याऐवजी वरील घरगुती उपाय केल्यास कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. आणि याचबरोबर व्यसनांपासून कटाक्षाने दूर रहावे.

हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करुन आम्हाला सांगा.

लेख आवडला तर लाईक व शेअर करायला विसरू नका.

असेच मनाचेTalks चे विविध लेख तुम्ही ऍमेझॉन किंडल वर जाहिरातींविना वाचू शकाल.

रहस्य जगण्याचे : समाधानी आयुष्याचे पुस्तक अमेझॉनवर खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!