दिखाव्याला भुलण्याआधी ही लक्षणं ओळखा

या जगात दोन प्रकारची माणसं असतात. एक खरीखुरी, सच्चेपणा असणारी आणि दुसरी प्रेमळपणाचा बुरखा पांघरलेली.

वरवर मनमिळावू, हसतमुख दिसणारी आणि मैत्रीचा खोटा मुखवटा घालून वावरणारी !!!

पण बऱ्याच वेळा काय होतं की आपण या मुखवट्या मागचा खरा चेहरा ओळखू शकत नाही. आणि त्यामुळे आपले अनेक प्रकारचे नुकसान होऊ शकते.

कधी आर्थिक फटका बसतो तर कधी मनस्ताप होतो किंवा यांच्या गोड बोलण्याच्या आणि प्रेमळ वागण्याच्या जाळ्यात आपण अलगदपणे असे काही अडकतो की यातून बाहेर पडेपर्यंत भावनिकदृष्ट्या अगदी घायाळ होऊन जातो.

शिवाय यातून सावरण्यासाठी बराच वेळ निघून जातो.

अशा कटु अनुभवामुळे नातेसंबंध आणि मैत्री याबद्दल आपले मन नेहमीच साशंक रहाते. आपण असे कसे फसविले गेलो? ही भावना छळत रहाते आणि त्याचा परिणाम मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर सुद्धा होतो.

आपल्या आयुष्यात अशा काही व्यक्ती असतील तर वेळीच सावध होणे आवश्यक आहे. पण खरोखरच निर्मळ मनाची माणसं आणि काही अंतस्थ हेतू ठेवून वरवर गोड वागणाऱ्या व्यक्ती यांच्यातला फरक कसा ओळखावा?

या लेखातून आम्ही याबाबत सविस्तर माहिती देणार आहोत. अशी काही लक्षणं किंवा विशिष्ट वर्तन याबाबत तुम्हाला जागरूक करण्यासाठी मनाचेTalks हा विशेष लेख घेऊन येत आहे.

लहान वयापासून आपल्याला चांगल्या माणसांचे गुण कोणते आणि ते कसे ओळखावेत हे शिकवलं जातं. त्याचप्रमाणे माणसांमधल्या वाईट प्रवृत्ती कोणत्या हे सुद्धा सांगितलं जातं.

मग एवढं सगळं माहित असूनही गडबड कुठे होते? आपली अडचण अशी आहे की फक्त “ब्लॅक ऑर व्हाईट ” म्हणजे एक तर चांगले किंवा वाईट या नजरेने प्रत्यक्ष आयुष्यात आपण वावरुच शकत नाही. या काळ्या आणि पांढऱ्याच्या मधे असलेली करड्या रंगाची छटा आपण गृहीत धरतो का? या ग्रे शेड मधेच असे मुखवटे पांघरलेल्या माणसांची सर्व लक्षणं दिसतात. आणि ती योग्य वेळी लक्षात आली तर पुढे होणारे नुकसान टाळता येते.

ही खोटेपणाचा मुखवटा घातलेली माणसं नक्की ओळखायची कशी?

आजकालच्या जगात वावरताना सतर्क रहाणे गरजेचे आहे. कारण स्वार्थी वृत्ती वाढल्याने कोणीही आपल्याला सहज फसवू शकते किंवा आपला अनेक प्रकारे गैरफायदा घेतला जाऊ शकतो. म्हणून वरवरच्या व्यक्तिमत्त्वावरुन माणसे कळणे खरंच कठीण आहे. मग कोणाशीच मैत्री किंवा नातेसंबंध ठेवायचेच नाहीत का?

की प्रत्येक नवीन माणूस आपल्याला फसवेल का अशी भीती मनात ठेवून जगायचं?

तर याचं उत्तर आहे “नाही!!! असं करायचं नाही.”

असं घाबरून जगणं शक्य नाही आणि त्याची काही गरजही नाही. आपण थोडीशी काळजी घ्यायची. आपली निरीक्षणक्षक्ती वाढवायची.

कोणतंही नातं असू दे त्याला पुरेसा वेळ द्यायचा. व्यक्ती कितीही चांगली वाटली तरी पटकन विश्वास ठेवायचा नाही. कारण कालांतराने मुखवटा आणि खरा चेहरा यातला फरक उघड होतोच.

कोणत्या ना कोणत्या प्रसंगात हे दिसून येतेच. फक्त आपले नुकसान टाळण्यासाठी धीर धरणे आणि इतरांच्या प्रभावाखाली वाहवत न जाणे या दोन गोष्टी कटाक्षाने पाळल्या पाहिजेत.

याचबरोबर काही वेळा असंही लक्षात येतं की आपल्या नात्यातील व्यक्ती अशा मुखवटाधारी आहेत.

कधीकधी हे लवकरच समजतं तर कधी बरीच वर्षं त्यांच्यासोबत काढल्यावर!!!

जर ही व्यक्ती दूरच्या नात्यातील असेल तर तुम्ही त्यांच्याशी कामापुरता संबंध ठेवू शकता किंवा सरळ त्यांना टाळू शकता, पण खरा प्रश्न येतो जेव्हा तुमच्या घरात, अगदी जवळच्या नात्यात अशी व्यक्ती असते तेव्हा!!!

अशावेळी तुम्ही त्यांना टाळू शकत नाही किंवा सरळ त्यांच्यापासून दूर निघून जाणे सुद्धा परिस्थितीमुळे शक्य होईलच असे नाही. मग अशावेळी रोजचा मनस्ताप कसा टाळायचा आणि आपले भावनिक आरोग्य कसे जपायचे हे समजले पाहिजे.

चांगली माणसे आणि चांगुलपणाचा आव आणणारे यातील फरक असे आहेत.

१. खरोखरीच चांगली माणसे ही नेहमीच चांगुलपणा दाखवतात. तुमच्याकडून त्यांची कोणतीही अपेक्षा नसते.

पण काही माणसांचे अंत:स्थ हेतू वेगळे असतात आणि ते साध्य करण्यासाठी म्हणून ते तुमच्याशी आपुलकीने वागतात. अशावेळी या माणसांची आपल्या कडून काही अपेक्षा आहे का हे तपासून पहावे.

त्यांच्या बोलण्या वागण्यातून त्यांनी असे कोणते संकेत दिले आहेत का हे आठवून बघावे. निरपेक्ष हेतूने मैत्री किंवा नाते जपणाऱ्या व्यक्ती खरोखरच निर्मळ मनाच्या असतात.

२. चांगली माणसे ही मोकळ्या मनाने इतरांची स्तुती करतात किंवा तुम्ही केलेल्या चांगल्या कामाचा अभिमान बाळगतात. पण याविरुद्ध खोटेपणाने वागणारे इतरांवर सतत टीका करतात. इतरांच्या कामात दोष काढून आपण कसे शहाणे हे दाखवण्यासाठी धडपडत असतात. म्हणूनच इतरांवर सतत टीका करणाऱ्या व्यक्तींना चार हात लांब ठेवणेच हिताचे आहे.

३. प्रामाणिक माणसे नेहमीच आपण दिलेला शब्द पाळण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. पण कोणी जर गोड बोलून मोठमोठ्या बाता मारत असेल आणि प्रत्यक्ष वेळ आल्यावर आपला शब्द फिरवत असेल तर अशा माणसांपासून सावध रहा. दिलेला शब्द पाळण्याची सवय ही लहान सहान बाबतीतही दिसून येते.

ठरविलेल्या वेळी न येणे, किंवा त्याबद्दल कोणतेही कारण न देणे, घेतलेले पैसे वेळेवर परत न करणे, वस्तू वेळेवर परत न देणे मग ते पुस्तक असो की पेन !!! अशा प्रसंगातून माणसांची पारख होते. छोट्या छोट्या कमिटमेंट न पाळणारी माणसे तुम्हाला मोठा दगाफटका करु शकतात. म्हणून ही लक्षणे वेळीच ओळखून सावध व्हावे.

४. मनाने चांगली माणसे आपले मत मोकळेपणाने व्यक्त करतात. तुमचे म्हणणे पटले‌ नाही तर तसे स्पष्ट शब्दात सांगतात. पण चांगुलपणाचा आव आणणारी माणसे तुमच्या तोंडावर गोड बोलतात आणि पाठीमागून टीका करतात.

गॉसिपिंग करणाऱ्या व्यक्तींना दूरच ठेवा कारण ज्या व्यक्ती इतरांबद्दल वाईट साईट तुम्हाला सांगतात त्या तुमच्या अपरोक्ष इतरांना तुमच्या कागाळ्या नक्कीच सांगत असणार.

५. चांगली माणसे मोठेपणा मिरवत नाहीत. स्वत:चा बडेजाव दाखवणे, आत्मस्तुती यापासून ती नेहमीच लांब रहातात पण जी माणसे स्वतःची महती गात रहातात त्यांच्यापासून सावध राहिले पाहिजे. अशा व्यक्ती अहंकारी असतात. आणि आपले खरे स्वरूप लपविण्यासाठी स्वतः ची स्तुती स्वतः च करतात.

६. चांगली माणसे आपले काम करत रहातात. त्याचे प्रदर्शन मांडण्याची त्यांना गरज भासत नाही. पण मुखवटधारी माणसे मात्र सतत इतरांचे लक्ष वेधून घेण्यासाठी प्रयत्न करत असतात. लहानसे काम केले तरी त्याचा मोठा गाजावाजा करतात.

सण समारंभ अशा वेळी सर्वांचे लक्ष आपल्या कडे गेलेच पाहिजे यासाठी हरतऱ्हेने प्रयत्न करतात. यातून त्यांचा स्वार्थ दिसून येतो.

७. चांगल्या मनाची माणसे तुम्ही जसे आहात तसाच तुमचा स्विकार करतात. प्रत्येक माणूस हा स्वतःचे विशिष्ट व्यक्तिमत्त्व घेऊन जन्माला आला आहे. आणि प्रत्येक व्यक्ती मधे चांगले आणि वाईट दोन्ही गुण आहेत याची या माणसांना जाणीव असते.

पण काही माणसे मात्र तुमचे स्वतंत्र अस्तित्व मान्य करत नाहीत. ते तुमच्यावर दडपण आणतात. तुम्हाला स्वतः सारखे वागायला भाग पाडतात. अशा व्यक्तींना आपल्या आयुष्यात जास्त महत्त्व देऊ नका.

अन्यथा ते तुमचे मानसिक संतुलन बिघडवून टाकतील. त्यांना तुमच्या आयुष्यात ढवळाढवळ करण्याचा हक्क देऊ नका.

८. चांगल्या मनाची माणसे इतरांना आदराने वागवतात. तुमचे समाजातील स्थान, कामाचा दर्जा, तुम्ही कोणत्या पदावर आहात किंवा तुमच्याकडे किती संपत्ती आहे यावर त्यांचे वागणे अवलंबून नसते. पण फक्त आपल्या स्वार्थासाठी इतरांचा वापर करणारी माणसे मात्र धन, सत्ता, सौंदर्य असलेल्या व्यक्तींशीच ओळख करण्यात रस घेतात.

अशी माणसे तुमची आर्थिक, शारीरिक फसवणूक करु शकतात. किंवा तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या पदावर असाल तर त्याचा गैरवापर करण्यासाठी तुम्हाला भरीस पाडू शकतात. अशा माणसांना ओळखायचे असेल तर हॉटेलमध्ये वेटर बरोबर किंवा आपल्या नोकरांशी त्यांचे वागणे कसे आहे याचे निरीक्षण करावे.

या आठ प्रकारचे वर्तन आणि वरील लक्षणे यावरून आता तुमच्या मनात चांगली माणसे आणि चांगुलपणाचा बुरखा पांघरून आपली फसवणूक करणारे यांच्यातील फरक स्पष्ट झाला असेल.

आता यानंतर आपल्या जवळच्या आणि समाजातील इतर माणसांचे नीट निरीक्षण करा. त्यांच्या सवयी कोणत्या आहेत हे जाणून घ्या.

आंधळेपणाने कोणावरही विश्वास न टाकता थोडे डोळसपणे वागलात तर तुमचाच फायदा होईल. चमकणारे सर्व सोनेच नसते. म्हणून वरवरच्या थाटामाटाला आणि गोड बोलण्याला हुरळून जाऊ नका. नाहीतर का भुललासी वरलिया रंगा…..!!! असं म्हणण्याची वेळ येईल.

लेख आवडला तर नक्की लाईक आणि इतरांनाही फसवणुकीपासून वाचवण्यासाठी आवर्जून शेअर करा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय