आर्थिक ज्ञानमोती (Pearls of financial wisdom) भाग १

Pearls of financial wisdom

आजकाल व्हॉट्सऍपवर अनेक पोस्ट फिरत असतात. गंमत म्हणजे मी लिहलेल्या पोस्ट पोरक्या किंवा दुसऱ्याच्या नावाने पुन्हा माझ्याकडे येतात.

एकंदरीत आर्थिक विषयावर कमी पोस्ट असतात आणि फारच थोडे लोक त्या वाचतात. अलीकडेच एका पोस्टमध्ये आर्थिक विषयावर सुंदर माहिती आढळून आली ती कुणी संकलित केले ते माहीत नाही.

त्यातील भाव कायम ठेवून आशय पोहोचवण्याचा छोटासा प्रयत्न. यात भावानुवाद आणि मूळ वचन एकापाठोपाठ एक दिले आहे. यात काही दोष असेल तर त्यात माझी समजूत कमी पडते आहे असे समजावे.

1) माझ्यामते, आपली सर्वात मोठी मालमत्ता म्हणजे आपल्यावर कोणतेही कर्ज नसणे.

In my opinion, the biggest asset one can have is zero debt.

2) कर्जरोखे म्हणजे धनसंचय तर समभाग म्हणजे धननिर्मिती.

Bonds are for storing wealth and equities are for creation of wealth.

3) सर्वात मोठी आर्थिक शिस्त म्हणजे आपल्या ऐपतीपेक्षा कमी खर्च करणे.

The greatest discipline in personal finance is living below your means.

4) बेन चार्लसन्सच्या मते, भावनांच्या मोजमापनाची पुनर्तपासणी करणे शक्य नाही. म्हणूनच पूर्वीची मंदी ही गुंतवणुकीची हुकलेली संधी होती असे वाटते तर अनेकदा भविष्य साशंक वाटते.

As Ben Carlson says, emotions cannot be back tested. That’s why past bear market always looks like opportunities and future ones scary.

5) लवकर मिळवलेले आर्थिक स्वावलंबन आणि आधी मिळवलेली निवृत्ती ह्या पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. माझ्या मते पाहिल्यात हार्दिक शुभेच्छा आहेत तर दुसऱ्यात लवकर झालेली स्वप्नपूर्ती आहे.

Early financial independence and early retirement are completely different.To me, the former is a blessing and the latter is a curse.

6) दहा वर्षांपूर्वी एखादया गोष्टीची आपण सुरुवात केली असती तर आता कुठे असतो याचा विचार आत्ता करण्यापेक्षा आज सुरुवात करून १० वर्षानंतर आपण कुठे असू याचे स्वप्न पहा.

Don’t think how it would have been if you’ve started 10 years ago. Start today and visualise: how you would feel 10 years from now.

7) आपण ज्यांच्या संगतीत असतो त्यांच्याप्रमाणेच आपली जीवनशैली आणि खर्च करण्याची वृत्ती बनते. त्यामुळेच त्यांची निवड करताना आपली उद्दिष्टे, खर्च करण्याची क्षमता आणि व्यक्तित्व यांच्याशी सुसंगत व्यक्तींच्या संगतीत रहा.

The neighbourhood we live determines our life style & spending. Need to be careful in choosing one which matches our goals, pocket (budget) and personality.

8) क्रेडिट कार्डची किमान देय एवढीच रक्कम नियमित भरण्याची सवय हा आपण भविष्यात मोठया कर्जाच्या जाळ्यात अडकण्याचा पहिला संकेत आहे.

Paying minimum balance regularly on your credit card is the first sign that you’re getting into huge, certain debt trap.

9) अनेक दीर्घ कालावधीची गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार मंदीची वाट पहात हाती असलेल्या सुवर्णसंधी सोडतात. या संधीचा उपयोग करणाऱ्या ९०% दीर्घकालीन गुंतवणूकदारांना यातून सर्वाधिक फायदा होतो.

Many are long term investors till next bear market…. Ignoring the ‘bear market phase’ mostly benefits 90% long term investors.

10) नेहमी मर्यादित जोखीम स्वीकारा. अतिधाडस दाखवून घेतलेला एक चुकीचा निर्णय आपल्याला आपल्याला आर्थिकदृष्ट्या एक तापाहून अधिक मागे घेऊन जाऊ शकतो.

Don’t take aggressive bets. But take measured & pre-calculated risk Remember: One blunder can push you back by a decade or more in terms of wealth.

11) अधिक बचत, योग्य गुंतवणूक निर्णयआणि संयम यांच्या संयोगातूनच मोठया प्रमाणात संपत्ती निर्माण होते. लक्षात ठेवा शेअरबाजारात कमीपात्र व्यक्तीची संपत्ती अधिकपात्र व्यक्तीकडे हस्तांतरित होत असते.

Big money can be made through high savings, wise investing decisions and huge patience. Remember: Stock market is the place where wealth is transferred from an impatient men to a patient, mild & sober guy!

(क्रमशः)….

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

3 Responses

  1. P P DHAMANGAONKAR says:

    VERY GOOD EDUCATIVE WRITE UP FOR BEGINNERS

  2. योगेश रेडिज says:

    खूप छान

  3. Amol More says:

    Khup सुंदर… लेख आहेत sir… Aaple… Thnks u so much… And wish you all the best… Keep it up

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!