जीवनात प्रगती करायची असेल तर ही एक गोष्ट कराच.

मित्रांनो, आपण बरीच स्वप्नं पहातो. मनातल्या मनात अनेक योजना बनवतो. नवीन वर्षाचे संकल्प करतो. पण काही काळानंतर लक्षात येतं की गोष्टी आपण ठरविल्याप्रमाणे घडत नाहीयेत.
आपण जो काही विचार करत होतो त्याप्रमाणे काही झालंच नाही. आणि मग आपण याची कारणं शोधायला सुरुवात करतो.
तेव्हा लक्षात येतं की आपण ज्या लोकांवर अवलंबून राहिलो त्यांनी ठरवून दिलेली टार्गेट्स वेळेवर पूर्ण केली नाहीत.
कामात चालढकल केली आणि आपणही त्यांच्यावर नको तितका विश्वास ठेवला.
पण वेळ निघून गेलेली असते. पश्चात्ताप करण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. कारण यात इतरांपेक्षा आपला आळशीपणाच नडलेला असतो.
आज आम्ही तुम्हाला अशीच एक बोधकथा सांगणार आहोत. अगदी साधी गोष्ट आहे ही, पण यातून तुम्हाला खूप मौल्यवान धडा शिकता येईल.
नीट लक्षपूर्वक समजून घ्या ही गोष्ट.
एका गावात एक शेतकरी कुटुंब रहात होते. शेतकऱ्याने आपल्या शेतात गहू पेरला होता.
थोड्याच दिवसांत गहू छान वाढू लागला. शेत अगदी हिरवेगार आणि भरगच्च दिसत होते. त्या गव्हाच्या शेतात एका चिमणीने घरटे बांधले आणि अंडी घातली.
काही दिवसांनी अंड्यातून छोटी पिल्ले बाहेर आली. चिमणी त्यांच्यासाठी खाऊ आणायला दूर जात असे. एके दिवशी ती खाणे घेऊन आली तेव्हा पिल्ले खूप घाबरली होती.
तिने काय झाले ते विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की, शेतकरी शेतात आला होता. चांगले भरघोस वाढलेले पीक पाहून तो खुश झाला. आणि म्हणाला की उद्या मुलांना सांगून पीक कापणी करून घेतली पाहिजे.
पिल्लांना हे ऐकून खूप भीती वाटत होती. आणि आता आपलं घर नाहीसं होणार म्हणून ती पिल्ले दु:खी झाली होती. ती आपल्या आईला म्हणाली की आता आपण कुठे जायचं ?
पिल्ले खूपच लहान होती. त्यांना उडता पण येत नव्हते. हे सर्व ऐकून चिमणी मात्र म्हणाली की घाबरु नका.
उद्या कोणीही पीक कापायला येणार नाही. आणि खरंच दुसऱ्या दिवशी कोणीही आलं नाही.
असेच काही दिवस निघून गेले. पिल्ले हळूहळू मोठी होत होती. शेतातील पीक पण खूप उंच झाले होते.
पिल्ले म्हणाली की आता आपल्याला इथून जावेच लागेल. पण चिमणी मात्र शांत होती. ती म्हणाली की घाबरु नका.
उद्या कोणीही इथे येणार नाही. आणि खरंच दुसऱ्या दिवशी सुद्धा कोणीही तिकडे फिरकले नाही.
असेच अजून काही दिवस निघून गेले. आता पिल्ले बऱ्यापैकी मोठी झाली होती. त्यांच्या पंखात बळ आले होते. एकेदिवशी नेहमीप्रमाणे चिमणी खाणे घेऊन आली तेव्हा पिल्ले तिला म्हणाली की आज शेतकरी आला होता.
तो म्हणत होता की मुलांनी आणि कामगारांनी मी सांगितले ते काम केलेच नाही. आता जर पीक कापले नाही तर ते वाया जाईल. त्यामुळे उद्या कोणाचीही वाट न बघता मी स्वतःच पीक कापून टाकेन. कोणावरही अवलंबून रहाणार नाही.
पिल्ले म्हणाली की मग उद्या पण कोणी येणार नाही का? तेव्हा चिमणी म्हणाली की आता आपल्याला ताबडतोब हे घर सोडून दुसरीकडे गेलेच पाहिजे.
पिल्लांना काही समजेना. ती म्हणाली की यावेळी खरंच शेतकरी येणार कशावरून?
तेव्हा चिमणी त्यांना म्हणाली की पहिल्या वेळी शेतकरी मुलांवर अवलंबून राहिला आणि दुसऱ्या वेळी कामगारांवर. म्हणून त्याचे काम वेळेवर झाले नाही.
पण आता मात्र त्याला समजलंय की जोपर्यंत स्वतः काम सुरू करत नाही तोपर्यंत ठरविल्याप्रमाणे काहीच होणार नाही. म्हणून उद्या तो नक्कीच येईल. आणि चिमणी पिल्लांना घेऊन थोड्या अंतरावर जाऊन थांबली.
सकाळ झाली आणि त्यांनी शेतकऱ्याला येताना पाहिले. तो शेतात आला आणि लगेच पीक कापायला सुरुवात केली. चिमणीने पिल्लांकडे पाहिले. त्यांनीही मान डोलावली. त्या दिवशी त्यांना एक खूप महत्वाचा धडा शिकता आला होता.
सारांश
जेव्हा तुम्ही इतरांवर अवलंबून रहाता तेव्हा कोणतेही काम तुमच्या मनासारखे होणे कठीण असते.
याचा अर्थ इतरांची मदत घेऊच नये असा नाही. इतरांचे सहकार्य घ्यावे पण, जर काम ठरविल्याप्रमाणे करायचे असेल तर स्वतःच पुढाकार घेतला पाहिजे. या जगात इतर लोकं त्यांनाच मदत करतात जे स्वतः कष्ट करतात.
मित्रांनो, कशी वाटली ही गोष्ट? जर का तुम्हाला आवडली असेल तर जरूर लाईक व शेअर करा. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे यातली शिकवण अमलात आणा!!!
रहस्य जगण्याचे : समाधानी आयुष्याचे पुस्तक अमेझॉनवर खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.
रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.
रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे या पुस्तकाची अनुक्रमणिका खाली दिलेली आहे.
- अस्थिर मनाला शांत करणारी ही आहेत १५ जादूई वाक्यं!!!
- तणावाखाली असतानाही मानसिक ताकद टिकवून ठेवणाऱ्या पाच सवयी.
- निराशेतच दडलाय ध्येय गाठण्याचा मार्ग!!!
- अडचणीतून मार्ग काढून आयुष्य रुळावर कसं आणावं?
- मनातून विचारांचे वादळ काढून टाकून जगण्याची कला शिकवणारे आठ सोपे मार्ग.
- वाईट विचारांच्या भुताला कसे पळवून लावावे, यासाठीचे तीन नियम!!
- आयुष्यातील चार कटू सत्य, ‘जी’ स्वीकारली तर तुम्ही एक ‘कणखर व्यक्ती’ बनू शकाल
- हे तेरा प्र श्नं स्वतःला विचारून स्वतः मधले उत्तम व्हर्जन विकसित करा!
- तुम्ही भरभरून का जगू शकत नाही? जाणून घ्या कारणे.
- नीरस आयुष्य सप्तरंगी करण्याचे दहा उपाय.
- आपला अंतरात्मा काय सांगतो ते ऐका.. या पाच कारणांसाठी.
- आयुष्याचा आढावा घ्यायचाय? हे चोवीस प्रश्न स्वतः ला विचारा.
- स्वतःसाठी या दहा गोष्टी करायला कधीच घाबरु नका
- पॉझिटिव्ह एनर्जी साठी करा हे पाच उपाय!!!
- मनाशी दोस्ती करण्याचे ५ उपाय.
- स्वतः वर प्रेम करा, आयुष्य सुंदर भासेल!!!
- स्वप्नं वास्तवात आणण्यासाठी हे करा…!!!
- जीवन मूल्य म्हणजे काय? आणि ती जपायची कशी?
- समाधानी आयुष्याची त्रिसूत्री!!!
- एक मुक्तपत्र… तुमच्या मनाचे मैत्र!!!
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा
'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा