चतुराईचे हे पाच फंडे जाणून घेतलेत तर दुनिया तुम्हाला सलाम करेल!!!

व्यक्तिमत्व विकास पुस्तक pdf Free

 

मित्रांनो, हे जग स्मार्ट माणसांची जास्त कदर करतं. व्यवहारात थोडं चातुर्य दाखवलं तर आपली फसवणूक होत नाही. आणि कोणीही आपल्याला गृहीत धरत नाही.

चतुर माणूस म्हणजे कावेबाज किंवा कपटी नव्हे. आजकालच्या जगात स्ट्रीट स्मार्ट असणं खूप गरजेचं आहे. तुम्ही अगदी साधे भोळे असाल तर पावलोपावली त्रास देणारी माणसे भेटतील. म्हणून थोडा चतुरपणा अंगात हवाच.

फक्त त्याचा वापर करून आपण इतरांना फसवायचं नाही किंवा त्यांचं नुकसान करायचं नाही. आपला स्मार्टनेस वापरून स्वतःचं रक्षण मात्र तुम्ही करु शकता.

या लेखातून आम्ही सांगणार आहोत पाच फंडे!!! हे वापरलेत तर तुम्ही एक चतुर व्यक्ती म्हणून ओळखले जाल.

चातुर्य जपण्यासाठी मन आणि बुद्धीची सांगड घाला.

चातुर्य जपण्यासाठी मन आणि बुद्धीची सांगड घाला.

१. थोडं बावळटपणे वागण्याचं धोरण ठेवा

तुम्ही भलेही खूप हुशार असाल, पण आपल्या बुद्धीचं प्रदर्शन करु नका. त्यापेक्षा आपल्याला जास्त काही कळत नाही असंच भासवणं फायद्याचं आहे.

कारण त्यामुळे समोरच्या व्यक्तीला तुमच्या हुशारीचा अंदाज येत नाही. तुमचे छंद, वाचन, वागणे यातून तुमची बुद्धिमत्ता दिसून येते. म्हणून इतरांना याबाबत माहिती देऊ नका.

उलट त्यांचे छंद, आवडनिवड कशी बेस्ट आहे याबद्दल बोलत रहा. त्यांना थोडं अंधारात ठेवणं तुमच्यासाठी चांगलं आहे. कारण यामुळे त्यांना आपणच स्मार्ट आणि तुम्ही थोडे वेंधळे आहात असं वाटतं राहील.

त्यांचा तुमच्यावर विश्वास बसेल. तुमची संगत त्यांना आवडेल. मनुष्य स्वभाव असा आहे की आपल्यापेक्षा हुशार, चतुर, स्मार्ट माणूस बरोबर असेल तर स्वतः बद्दल साहजिकच थोडा कमीपणा वाटतो.

मीच कसा हुशार असं मिरवायला सगळ्यांनाच आवडतं आणि नेमका याच गोष्टीचा फायदा तुम्ही करुन घेऊ शकता. आपल्या मराठी भाषेत एक सुंदर म्हण आहे. वेष बावळा परी अंगी नाना कळा!!!

हेच तर करायचंय तुम्हाला. आपली हुशारी झाकून ठेवायची आणि बावळटपणा जगाला दाखवून द्यायचा.

२. मित्रांवर आंधळा विश्वास ठेवू नका आणि शत्रूंकडून कामं करुन घ्या.

हे वाचून तुम्हाला वाटेल की असं कसं शक्य आहे? पण तुमच्यापैकी ज्यांनी याचा अनुभव घेतला असेल त्यांना ही गोष्ट तंतोतंत पटेल.

कारण टीका केली तर नाते दुरावेल असे त्यांना वाटते. पण यामुळे आपले नुकसान होते. काही वेळा तर मित्रमंडळी आपली खोटी स्तुती करतात. त्यामुळे आपण शेफारुन जातो.

स्वतःला अतिहुशार समजतो. आणि मग चांगलेच तोंडावर पडतो. त्यावेळी आपल्या लक्षात येते की, जर वेळीच मित्रांनी आपली चूक स्पष्टपणे दाखवून दिली असती तर ही वेळ आली नसती. अर्थात यात तुमचं नुकसान व्हावं अशी त्यांची इच्छा नसते.

तर तुमच्याशी असलेलं नातं त्यांना महत्त्वाचं वाटतं. त्यात कोणतीही कटूता त्यांना नको असते. म्हणून मित्रांवर डोळे मिटून विश्वास ठेवू नका.

आणि एखादं महत्त्वाचं काम तुम्हाला करून घ्यायचं असेल तर जवळच्या व्यक्तीला ती जबाबदारी कधीच देऊ नका. त्यापेक्षा अनोळखी माणूस या कामासाठी निवडा.

किंवा ज्यांच्याशी पूर्वी तुमचे काही मतभेद झाले असतील अशा व्यक्तींना हे काम करायला सांगा.

का माहित आहे ?

जवळच्या व्यक्तीने कामात टाळाटाळ केली, काही चूक केली तर तुम्ही त्यांना ओरडू शकत नाही. त्यांच्याकडे मोकळेपणाने पैशाचा हिशोब मागणेही तुम्हाला जड जाईल. याउलट अनोळखी माणसाबाबत तुम्ही अधिक सावधानी बाळगाल.

त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवाल. आणि ही माणसे देखील तुमचा विश्वास जिंकून घेण्याचा पूर्ण प्रयत्न करतील. तुमच्या शत्रूंना काम द्या असं म्हणण्यामागे पण हाच उद्देश आहे.

इथे शत्रू शब्दाचा वैरी असा अर्थ नाही. तर जास्त जवळीक नसलेला, आप्तसंबंध नसलेली व्यक्ती हे लक्षात घ्या. व्यावसायिक संबंधात थोडी दूरी असणे कधीही चांगले.

कारण इथे तुमच्या भावना मध्ये येऊन चालणार नाही. काम उत्तम प्रकारे होणे हीच प्रायोरिटी असली पाहिजे.

३. आपला इरादा उघड करु नका.

तुम्ही कोणतेही काम करत असताना आपला हेतू उघडपणे सर्वांना सांगू नका. यामुळे तुमचे स्पर्धक थोडेसे गाफील रहातील.

या जगात अनेक व्यक्ती अशा आहेत की, ज्या तोंडावर गोड बोलतात पण त्यांच्या मनात तुमच्याविषयी चांगल्या भावना असतीलच असे नाही.

म्हणून आपणही थोडं चातुर्य दाखवण्यातच शहाणपण आहे. या जगात सरळसोट झाडांवर पहिल्यांदा करवत चालवली जाते. कारण त्यांना कापणे अगदी सोपे असते. पण जे झाड थोडं काटेरी किंवा वेडंवाकडं असतं ते मात्र वाचतं. म्हणून अगदी भोळसट, सरळमार्गी राहिलात तर या स्वार्थी दुनियेत निभाव लागणे कठीण आहे.

म्हणून आपल्या योजना बोलून दाखवू नका. यामुळे तुमच्या हितशत्रूंना तुम्ही गोंधळात टाकू शकता.

बहुतेक माणसांना सर्व गोष्टी उघडपणे बोलणे, इमानदारीने वागणे हे चांगुलपणाचे वाटते. पण सर्वच ठिकाणी एकच पॉलिसी उपयोगाची नसते.

म्हणूनच काही वेळा आपले हुकुमाचे पत्ते लपवून ठेवले तरच डाव जिंकता येतो. यासाठी मात्र काही कौशल्ये तुम्हाला शिकून घेतली पाहिजेत. सर्वात महत्वाचे म्हणजे आवश्यक तेवढीच माहिती इतरांना देणे.

त्यांना ज्या गोष्टी ऐकायला आवडतात त्या बोलत रहा. म्हणजे ते तुमच्या मार्गात आडवे येणार नाहीत. शिवाय जी माणसे अगदी उघड्या स्वभावाची असतात त्यांच्याविषयी सर्वांनाच सर्व काही माहीत असते.

त्यामुळे अशा व्यक्तींना कोणीही घाबरत नाही. त्यांचा आदरही केला जात नाही. पण जर का तुमच्याविषयी लोकांना जास्त काही माहीत नसेल तर ते तुम्हाला गृहीत धरत नाहीत. तुमच्याशी वागताना थोडे जपूनच रहातात. जर एक पॉवरफुल व्यक्ती म्हणून जगायचं असेल तर गुप्तता पाळा. थोडक्यात काय तर अतिपरीचयात अवज्ञा असं होऊ देऊ नका.

४. स्वतंत्र ओळख निर्माण करा.

जर गर्दीचा एक भाग बनून राहिलात तर कोणीही तुम्हाला लक्षात ठेवणार नाही. म्हणून चारचौघांपेक्षा वेगळी अशी स्वतःची ओळख निर्माण करा.

जे काम करत असाल ते अगदी नाविन्यपूर्ण मार्गाने करा. आपल्या कामाविषयी सतत बोलत रहा. जमाना जाहिरातीचा आहे.

जर तुमचं काम इतरांच्या नजरेसमोर आलंच नाही तर ते तुम्हाला कसे ओळखतील? म्हणून आपलं व्यक्तिमत्त्व आकर्षक बनवा.

आपलं रहाणीमान, बोलणं यामुळे आजूबाजूच्या घोळक्यापेक्षा आपण वेगळे दिसलो पाहिजे. करिअरच्या सुरुवातीलाच असं स्वतंत्र अस्तित्व दाखवून दिलंत तर तुमची प्रगती भराभर होईल.

म्हणून एक अनोखा असा पर्सनल ब्रॅण्ड बनवा. मग ती तुमची विशिष्ट अशी कपड्यांची स्टाईल असू शकते. किंवा तुमच्या व्यक्तीमत्त्वातील काही खासियत!!! असं करताना आजूबाजूला असणारी माणसं तुमच्यावर टीका करतील, चेष्टा सुद्धा करतील.

पण अजिबात घाबरु नका. लोकांनी तुमच्याकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा टीका केलेली परवडली. याचाच दुसरा अर्थ असा की ते तुमच्याकडे लक्षपूर्वक बघतात. म्हणजेच तुमच्यात काहीतरी खास बात आहे हे नक्की!!!

आपल्यावर होणाऱ्या टीकेचा योग्य उपयोग करून घेता आला पाहिजे. एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीच्या विरोधात बोलूनही तुम्ही लाइमलाइट मध्ये येऊ शकता.

पण अशी प्रसिद्धी फार काळ टिकत नाही. म्हणून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली तर लोक तुम्हाला विसरणार नाहीत.

५. इतरांकडून काम करुन घेणे शिका

एखादं अवघड काम करण्यासाठी त्या कामात एक्स्पर्ट असलेल्या व्यक्तीची निवड करा. त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवून तुम्ही तुमचा वेळ व एनर्जी वाचवू शकता.

जगात सर्व कौशल्यं एकाच माणसामध्ये असूच शकत नाहीत. म्हणून ज्या कामात तुम्ही तरबेज नाही त्यावर डोकेफोड करत बसू नका.

त्यापेक्षा दुसऱ्यांची बुद्धिमत्ता वापरून स्वतःचा फायदा करून घ्या. क्रिएटिव्ह, हुशार माणसे शोधून त्यांच्याकडून काम करुन घ्या. मात्र त्यावर मोहोर तुमच्या नावाची लागली पाहिजे. म्हणजे व्यवसाया बद्दल बोलायचं झाल्यास तुमच्या ब्रॅण्डच्या नावाने इतरांचे प्रॉडक्ट्स विकत घ्या.

किंवा बुद्धीमान माणसांना तुमच्या हाताखाली नोकरीला ठेवा. त्यांच्या कामाचं मोल त्यांना मिळेल आणि तुम्हाला प्रसिद्धी मिळेल.

यामुळे मार्केट मध्ये तुमचे नाव होईल. याला स्मार्ट वर्क म्हणतात. हा फंडा ज्याला जमला तो जिनीयस म्हणून ओळखला जातो.

तर मग चतुराईने वागण्याच्या या ट्रिक्स तुम्हाला आवडल्या का? यातील कोणती गोष्ट तुम्हाला पटली हे कमेंट्स करुन नक्की सांगा.

लेख लाईक व शेअर करुन स्मार्टपणाचे हे फंडे सर्वांपर्यंत पोहोचवा.

Image Credit : pixabay

Manachetalks

रहस्य जगण्याचे : समाधानी आयुष्याचे पुस्तक अमेझॉनवर खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे या पुस्तकाची अनुक्रमणिका खाली दिलेली आहे.

Manachetalks

 

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!