समोरच्या व्यक्तीच्या मनाचा अभ्यास करून आपलं इप्सित साध्य करण्याच्या ७ पद्धती

मित्रांनो सायकॉलॉजी म्हणजे अगदी गहन आणि कंटाळवाणा विषय असं तुमच्यापैकी बऱ्याच जणांना वाटत असेल. पण असं काहीच नाहीय. उलट मानसशास्त्र आपलं जगणं सोपं, आनंदी करण्यासाठी उपयोगी आहे.

या लेखातून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, अशी काही मानसशास्त्रीय सूत्रं जी वापरून तुम्ही नक्कीच विजेता होऊ शकता.

आणि ही सूत्रं म्हणजे कोणतेही अवजड सिद्धांत नाहीत बरं. आम्हाला खात्री आहे की अगदी सहजपणे तुम्ही रोजच्या आयुष्यात यांचा वापर करु शकता.

मग पाहूया तर कोणती आहेत ही सूत्रे.

१. कोणतीही नवीन गोष्ट लोकांसमोर पहिल्यांदा सादर करताना हे लक्षात ठेवा.

जर का तुम्ही प्रथमच गायन, नृत्य किंवा इतर कोणतीही कला लोकांसमोर सादर करणार असाल तर तुम्हाला दडपण जाणवतेच.

विशेषतः तुम्ही त्यातलं शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलं नसेल तर लोकं आपल्याला नावं तर ठेवणार नाहीत ना अशी शंका मनात येतेच. अशावेळी न विसरता एक गोष्ट करायची.

स्टेजवर गेल्यावर सर्वात आधी लोकांना सांगायचं की मी काही व्यावसायिक कलाकार नाही. ही कला हा माझा छंद आहे. आणि त्याचा आनंद मी सर्वांसोबत शेयर करु इच्छितो/इच्छिते.

जर काही चूक झाली तर तुम्ही समजून घ्याल व माझ्या पहिल्याच प्रयत्नाला शाबासकीची थाप द्याल अशी मी आशा करतो.

बस, ही दोन वाक्यं बोलण्याने खूप फरक पडतो. लोकांना तुमच्या चुका दिसल्या तरीही ते टीका करण्याऐवजी तुम्हाला उत्तेजन देण्याची जास्त शक्यता असते. आणि तुमचा फायदा असा की जर पहिल्याच वेळी लोकांनी तुम्हाला नाकारलं तर कदाचित तुमचा आत्मविश्वास कमी होईल. कदाचित पुन्हा कधी तुम्ही स्टेजवर जाऊ शकणार नाही. पण प्रामाणिकपणे खरं सांगितलेलं सर्वांनाच आवडतं.

जर का ही दोन वाक्यं तुम्ही सुरुवातीला बोललाच नाहीत तर मात्र तुम्हाला टीका, चेष्टा, निगेटिव्ह कमेंट्सना सामोरे जावे लागेल. आजकाल ऑनलाईन कार्यक्रम होत असतात.

त्यावेळी सुद्धा पहिल्यांदा ही दोन वाक्यं बोलून तुमच्या कार्यक्रमाची सुरुवात करा आणि बघा तरी किती फरक पडतो…!!!

२. काम करणाऱ्याला जग आपलेसे करते.

तुम्ही कोणतेही काम करत असाल तर ते सर्वांना सांगा. खेळ असो कोणतीही कला असो किंवा नोकरी धंदा.

जो माणूस धडपड करतो त्याला समाजातून बहुतांश वेळेला पाठिंबा दिला जातो. तुम्ही कोणतीही सक्सेस स्टोरी ऐका. तुमच्या लक्षात येईल की शून्यातून सुरुवात करणाऱ्या माणसाची स्टोरी सर्वांना आवडते.

सिनेमात सुद्धा हीच सायकॉलॉजी वापरली जाते. तिथे हिरो गरीब, अन्यायाविरुद्ध लढणारा दाखवला जातो. तो सर्वांना का आपलासा वाटतो? कारण तो परिस्थिती विरुद्ध संघर्ष करत असतो.

न थांबता सतत लढा देत असतो. हेच उदाहरण क्रिकेट मॅच बाबत पण पहाता येईल. दोन टीम मधल्या दुर्बल टीम ला आपण चीअर अप करतो, उत्तेजन देतो. कारण बलाढ्य टीम समोर लढताना ते प्रयत्नांची शर्थ करत असतात.

आणि मानवी मनाचा एक गुणधर्म आहे की त्याला तुलनेने कमजोर, कोणाचेही पाठबळ नसलेली व्यक्ती जिंकताना बघायला आवडते. म्हणून तुम्ही कितीही लहान काम करत असाल, कोणतीही गोष्ट प्रथमच करत असाल तर जरुर सर्वांना सांगा.

म्हणजे तुमच्यावर अपेक्षांचे ओझे लादले जाणार नाही. आणि तुम्ही मनापासून प्रयत्न करताय हे समजल्यावर लोक तुमचे कौतुक करतील.

३. विनंती करण्यापेक्षा आव्हान द्या!!!

हे सूत्र विशेषतः लहान मुलांना लागू पडते. जर वारंवार सांगूनही मुलं ऐकत नसतील तर त्यांना सतत समजावत बसू नका. त्यांना चॅलेंज द्या.

बघूया याचं एक सोपं उदाहरण. समजा तुमचा मुलगा अभ्यास करत नाही. तुम्ही रोज त्याला समजावून सांगता, ओरडता, शिक्षा करता पण काही फरक पडतच नाही.

अशावेळी एक काम करा. त्याला सांगा की तुझ्या अमुक एका मित्रापेक्षा तुला नक्कीच जास्त मार्क मिळतील. अशावेळी तो ही गोष्ट चॅलेंज म्हणून स्विकारेल. अधिकाधिक प्रयत्न करेल.

याचं कारण तुम्हाला माहीत आहे का? प्रत्येक माणसामध्ये एक विनिंग ऍटिट्यूड असतो. भलेही कमी जास्त प्रमाणात असेल. पण कोणतेही आव्हान हे माणसाच्या इगोशी संबंधित असते. इगो दुखावला तर असाध्य काम सुद्धा तो करतो.

अर्थात याला देखील अपवाद आहेत. काही माणसांचे व्यक्तीमत्त्व असे असते की त्यांना कोणालाही हरवण्यात रस नसतो. त्यांच्यावर कोणत्याही आव्हानाचा परीणाम होत नाही. पण ९०% लोकांना इतरांना हरवणे, पहिला नंबर मिळवणे, दुसऱ्याला मागे टाकून पुढे जाणे यात आनंद मिळतो. कारण स्पर्धा जिंकणे म्हणजे इगो सुखावणे.

म्हणून बरेच लोक ईर्ष्या, हार जीत, नंबर पटकावणे या गोष्टींना खूपच महत्त्व देतात. याच स्वभावाचा उपयोग करून आपण मुलांमध्ये सुधारणा व्हावी म्हणून प्रयत्न करु शकतो.

४. मैत्री करायचीय? तर आधी मदत मागा

आश्चर्य वाटलं ना? पण हे शंभर टक्के सत्य आहे. जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीशी मैत्री करायची असेल तर आधी त्यांच्याकडे मदत मागा. आणि ही मदत म्हणजे अगदी सहजपणे कोणीही करु शकेल अशीच असली पाहिजे. लक्षात ठेवा मदत कधीही मोठी मागू नका. सहज साध्य होईल अशीच ती असली पाहिजे.

पाहूया याचं पण एक उदाहरण. समजा तुम्ही एका ग्रुपमध्ये काम करताय. यातल्या एका विशिष्ट व्यक्तीने आपल्याशी मैत्री करावी असं तुम्हाला वाटतं. मग तुम्ही अगदी लहानशी मदत मागा.

एखादी ग्रुप ऍक्टिव्हिटी करताना समजा तुम्हाला चित्र काढणं जमत नाही आणि त्या व्यक्तीची चित्रकला चांगली आहे, तर त्यांना मदत करण्याची विनंती करा. आणि त्यांची भरभरून स्तुती करा. अगदी लहानशी मदत त्यांनी केली तरी तुम्ही तारीफ करा. पटकन ते तुमच्याशी मैत्रीपूर्ण व्यवहार करतील.

मित्रांनो यामागचे कारण जाणून घ्या. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीची तारीफ करता तेव्हा तुम्ही तिच्यातील चांगुलपणा, कलागुण, एखादे वैशिष्ट्य याची त्या व्यक्तीला जाणीव करून देत असता. त्यामुळे आपण खास आहोत असा फील त्या व्यक्तीला येतो.

आणि असा फील निर्माण करुन देणारी व्यक्ती नेहमीच जवळची वाटते. म्हणून एक साधी, सोपी मदत मागून तुम्ही मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करु शकता.

५. निगोसिएशन पॉवर वाढवा या गोष्टी करुन

तुम्ही एखादी महागडी वस्तू खरेदी करणार असाल किंवा सॅलरी पॅकेज बद्दल चर्चा करताना आपल्याला जास्तीत जास्त फायदा मिळावा असं वाटतं. पण त्यासाठी तुम्हाला समोरच्या व्यक्तीच्या मनात काय चाललंय याचा अंदाज बांधता आला पाहिजे.

तरच तुम्ही योग्य प्रकारे वाटाघाटी करु शकता. सर्वप्रथम त्यांनी दिलेली ऑफर किंवा त्यांच्याकडची वस्तू तुम्हाला आवडली आहे याची जाणीव त्यांना करून द्या. याचंही एक उदाहरण पाहूया.

समजा तुम्ही एखाद्या शोरूममध्ये गेलात. तुम्हाला ब्लेझर खरेदी करायचा आहे. एक ब्लेझर तुम्हाला पसंत पडलाय पण त्याची किंमत आहे वीस हजार. तुम्हाला तो त्यापेक्षा कमी किंमतीत हवाय.

अशावेळी तुम्ही सेल्स पर्सनला काय सांगाल????

याची किंमत मला परवडणार नाही असं म्हणालात तर व्यवहार तिथेच संपला म्हणून समजा. पण निगोसिएशन करताना मात्र थोडं चातुर्य वापरावं लागतं.

सर्वप्रथम तुम्ही त्याला सांगाल की हा ब्लेझर खूपच सुंदर आहे. पण दहा हजार रुपये किंमत असली असती तर मी नक्कीच खरेदी केली असती. यातून त्यांना एक गोष्ट नक्की कळेल की तुम्ही ही वस्तू घेऊ इच्छिता. मग त्यांना सुद्धा ती वस्तू खपवायची असते. त्यामुळे कदाचित ते तुम्हाला असेही सांगतील की आम्ही पाच हजार रुपये डिस्काउंट देतो. पंधरा हजारला तुम्ही हा ब्लेझर घ्या. आणि अशाप्रकारे बऱ्यापैकी पैसे वाचवून तुम्ही पाहिजे ती वस्तू खरेदी कराल.

निगोसिएशन करणे म्हणजे फक्त पैसा वाचवणे नव्हे. तर हे संभाषण कौशल्य आहे. व्यवहारीपणा, आपले नुकसान होऊ न देणे, सुवर्णमध्य काढणे अशी नावे आपण देऊ शकतो.

६. कोणत्याही गोष्टीची सुरुवात आणि शेवट दमदार असला पाहिजे.

ही गोष्ट तर सर्वमान्य आहे. एखादे भाषण असेल, नृत्य असो किंवा अगदी पेपरमध्ये तुम्ही प्रश्नाचे उत्तर किंवा निबंध जरी लिहीत असाल तर सुरुवात छान करा आणि शेवट पण मुद्देसूद आणि आकर्षक असला पाहिजे. कारण मानवी स्वभावाचे वैशिष्ट्य आहे.

कोणतीही गोष्ट सुरुवातीला लक्षपूर्वक ऐकली जाते. हळूहळू एकाग्रता कमी होते व पुन्हा शेवटाकडे आल्यावर नीट लक्ष दिले जाते.

याला यू टर्न असेही म्हणतात. इंग्रजी यू आकाराप्रमाणे एकाग्रता सुरुवातीला जास्त मग कमी कमी होत पुन्हा वाढते. ही साधी गोष्ट जर तुम्ही लक्षात ठेवलीत तर तुम्ही नक्कीच यशस्वी होऊ शकता.

७. वादविवाद नको तारीफ करा

जर एखाद्या विषयावरुन समोरची व्यक्ती तुमच्याशी भांडण, वादावादी करत असेल तर वाद वाढवू नका. तुम्ही उलट उत्तर दिलंत तर शब्दाने शब्द वाढत जाईल.

कदाचित परिस्थिती हाताबाहेर जाऊन तुमचे संबंध कायमचे बिघडतील. त्याऐवजी समोरच्या व्यक्तीला त्या विषयापासून विचलित करा. आणि यासाठी सर्वात उत्तम उपाय म्हणजे त्यांची प्रशंसा करणे.

त्यांचे लक्ष मूळ विषयापासून हटवण्यासाठी दुसरा विषय काढा. त्यांचा ड्रेस, एखादी चांगली सवय किंवा यापूर्वी त्यांनी तुम्हाला मदत केली असेल त्याची आठवण काढून तुम्ही त्यांची स्तुती करा. आपली वाहवा ऐकायला कोणाला आवडत नाही? साहजिकच हळूहळू त्यांचा तुमच्याशी भांडण करण्याचा विचार बाजूला पडेल.

हे सायकॉलॉजीकल हॅक्स जरुर वापरून बघा. तुम्हाला कोणते अनुभव आले हे कमेंट्स करुन आम्हाला सांगा.

हळूहळू ही सूत्रे आपल्या रोजच्या जीवनात वापरुन आपण अवघड प्रसंगी विजेता होऊ शकतो. पण वेळ काळ पाहूनच यांचा वापर करा बरं. अर्थात आपला कॉमन सेन्स नेहमी जागृत ठेवा.

हा लेख तुम्हाला आवडला तर लाईक व शेअर करा.

असेच मनाचेTalks चे विविध लेख तुम्ही ऍमेझॉन किंडल वर जाहिरातींविना वाचू शकाल.

रहस्य जगण्याचे : समाधानी आयुष्याचे पुस्तक अमेझॉनवर खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय