भोजनस्थान कसे असावे…..

मित्रहो, जेवणाबरोबरच जेवणाचे ठिकाण कसे असावे याचा सुध्दा विचार करणे तितकेच महत्वाचे असते. चला तर मग आज आपण भोजन स्थान या विषयाबद्दल थोडे जाणून घेऊ!

भोजनस्थान हे खालील गुणांनी युक्त असावे.

विजन

जेथे लोकांची जास्त वर्दळ नसेल असे ठिकाण भोजनासाठि योग्य असते, कारण अन्न🍚🍲 व पाणी🍶 यावर आपल्यावर 😡द्वेष करणाऱ्यांच्या दुष्ट भावनांचाही परिणाम होत असतो. तसेच आपण जेवत असताना कोणीतरी अचानक खाकरुन कफाचा बेडका 🤤काढत असतो असे महाभाग तुम्हालाही हाॅटेलात 🍽दिसले असतील ज्यांना अजिबात सोसायटि 👨‍👨‍👧‍👦मॅनर्स नसतात!

रम्य

निसर्गरम्य 🌳🎋🌾⛅वातावरणात जेवणाची 🍛🍲मजा काही औरच असते. विशेषतः 🌱🌾🎋कष्ट करुन सुर्य🌤 डोक्यावर आल्यावर 🌳झाडाखाली विसावा ⛺घेऊन खाल्लेल्या चटणी, तेल, भाकरीची चव कित्येक वर्षांनी सुध्दा तो प्रसंग आठवताच 😋जिभेवर जशीच्या तशी जाणवते. एखाद्या 🌷🍀☘🌿🌱बागेत जेवताना जेवणाचा स्वाद 😋खुपच रुचकर वाटतो नि एरव्हिपेक्षा चार घास जास्त जेवण सरते.

पण हि बाग म्हणजे माॅडर्न अॅमिनीटीज मधली 🏡नकली प्लॅस्टीकच्या हिरवळीचा गालिचा व शोभेच्या वनस्पती 🌲व झुडुपांपासून बनवलेली नसावी बरं!

नि:सम्पात

जेवणाची जागा वरून झाकलेली⛱ असल्यास उत्तम व 😺मांजर वगैरे अचानक ताटातून काही उचलून नेणार नाही असे नि:शंक असावे.

पवित्र

जेथे कोणतेही कुकर्म होत नाही किंवा यापूर्वी झालेले नाही असे ठिकाण योग्य. कत्तलखाना, स्मशानभूमी, पूर्वी कोणाची हत्या झाली आहे किंवा कोणी आत्महत्या केली आहे अशी ठिकाणे वर्ज्य करावीत.

शुचि

जेवणाची जागा स्वच्छ असल्यास मन प्रसन्न 😊☺राहते व अन्नावर छान रुची 😋ऊत्पन्न होते.

सुगन्धपुष्परचित

दिवाळित🎆 दारात 🎑रांगोळी व सुगन्धिपुष्पांनी🌷💐🌸🌺🌼🌻 सजवलेली आरास नि पणत्या लावलेल्या असताना जेवायला छान वाटते ना!

सम देश

समतल जमिनीवर 🏕न अवघडता व्यवस्थित जेवणाचा आनंद घेता येतो अन्यथा खडकाळ जमिनीवर पोतं/तरटं/सतरंजी इ.अंथरुन पंगतीत जेवणाचा अनुभव एव्हाना तुम्ही घेतला असेलच की!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.