या सोप्या ट्रिक्स वापरा आणि जाल तिथे सुगंधाची बरसात करा.

घाईच्या वेळी काय करावे म्हणून हा लेख पूर्ण वाचा पण, दररोज स्वच्छ आंघोळ करणे हे आरोग्यासाठी बेस्ट आहे. त्यामुळे या ब्युटी हॅक्स माहीत आहेत म्हणून आंघोळीला सुट्टी देऊ नका बरंका!!

रुममधले सर्व जण माझ्याकडेच पहातायत का? माझ्यापासून अंतर ठेवून उभे आहेत का? आज कलिग्ज मला टाळतायत का? हे असे प्रश्न एखाद्या दिवशी तुम्हाला पडत असतीलच. आणि त्याचं कारण तुम्हाला चांगलंच माहीत असतं. म्हणतात ना खाई त्याला खवखवे. आणि चोराच्या मनात चांदणं !!!

पण स्पष्टपणे तुमच्या शंका इतरांना विचारायची पण सोय नसते. कारण त्या दिवशी तुम्ही चक्क आंघोळ न करताच बाहेर पडलेले असता. आणि मग दिवसभर तोंड लपवून वावरावं असं वाटतं की नाही?

मग आजचा लेख जरूर वाचा. आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी काही सोप्या ट्रिक्स. आंघोळ न करता सुद्धा दिवसभर कसं फ्रेश आणि सुगंधी रहायचं हे आम्ही सांगणार आहोत.

मित्रांनो, एखाद्या दिवशी इतकी गडबड असते ना की आपण आकंठ कामात बुडालेले असतो.

आणि अचानकच एवढी इमर्जन्सी येते की आहे तसं बाहेर पडावं लागतं.

व्यवस्थित आंघोळ करून, नीट आवरुन मग निघावं अशी परिस्थिती नसतेच. नाईलाजाने मग आपण अगदी अवतारात बाहेर पडतो आणि दिवसभर आपल्याला ऑकवर्ड वाटत रहातं.

या अवघड प्रसंगापासून बचाव करायचा असेल तर वापरा या ब्युटी हॅक्स !!!

१. घामाच्या दुर्गंधी पासून बचाव करण्यासाठी आपण डिओड्रंट वापरतो. आंघोळ झाल्यावर डिओ फवारला की दिवसभर त्याचा सुगंध मन प्रसन्न ठेवतो.

पण रात्री झोपी जाण्यापूर्वी जर डिऒड्रंट वापरला तर जास्त फायदा होतो. रात्रीच्या वेळी आपण आराम करतो. शरीराला विश्रांती मिळत असल्यामुळे घाम जास्त येत नाही.

त्यामुळे डिओचा इफेक्ट जास्त चांगल्या प्रकारे होतो. सकाळी उठल्यावर परत एकदा डिओ स्प्रे वापरला की तुम्ही बाहेर जाण्यासाठी एकदम रेडी!!! ज्या दिवशी आंघोळ करायला वेळच नसेल तेव्हा ही ट्रिक तुमच्या उपयोगी पडेल.

२. जर तुमचे केस तेलकट झाले असतील आणि शाम्पू लावून आंघोळ करण्याएवढा वेळ नसेल‌ तर‌ ड्राय शाम्पू वापरुन केस सेट करा.

मोकळ्या केसांवर हा ड्राय शाम्पू लावा आणि ब्रशने केस नीट विंचरुन घ्या. केसांचा सर्व चिकटपणा व तेलकटपणा हा शाम्पू शोषून घेईल आणि केस छान मोकळे होतील.

जर‌ ड्राय शाम्पू नसेल तरी काही हरकत नाही. वापरा ही दुसरी सोपी ट्रिक!!!

बेकिंग सोडा तर आपल्या घरात असतोच. झोपण्यापूर्वी यातला थोडा बेकिंग सोडा केसांच्या मुळाशी चोळून लावा.

रात्रभरात केसांचा तेलकटपणा गायब होईल. सकाळी तुम्हाला जाग येईल तेव्हा केस अगदी छान सळसळीत झालेले असतील.

३. जरी आंघोळीला एखाद्या दिवशी गडबडीत बुट्टी मिळाली तरी न विसरता पावलांची काळजी घ्या. साबण व पाण्याने पावलं स्वच्छ धुवून घ्या.

दिवसभर‌ आपल्या पायांवर‌ धूळ बसते. घाम आला की ही माती, धूळ बोटांच्या पेरांमध्ये साचून रहाते. विशेषतः पायाचा अंगठा आणि त्याच्या बाजूचं बोट यांच्या मध्ये घाण साचून जंतुसंसर्ग होऊ शकतो.

त्याचप्रमाणे बोटांचा पावलांना जोडणारा भाग नेहमी स्वच्छ आणि कोरडा ठेवावा. अन्यथा पावलांना दुर्गंधी येते.

बेबी टाल्कम पावडर वापरुन‌ तुम्ही पावलांची काळजी घेऊ शकता. तसेच शूज मध्ये ही पावडर टाकून ठेवलीत तर उग्र दर्प येणार नाही.

४. कुठेही बाहेर जाताना आपले केस सुगंधी आणि रेशमी असावेत असं सर्वांनाच वाटतं. त्यासाठी तुम्ही हेयर मिस्ट किंवा हेयर परफ्यूम वापरु शकता.

यामुळे केस कोरडे होण्याचा पण धोका नाही. दिवसभर मनमोहक, मंद सुगंध केसांमध्ये दरवळत राहील.

जणू काही तुम्ही आताच शॉवर घेऊन बाहेर आलाय असं तुम्हाला वाटेल. ताजेपणा आणि सुगंधी दरवळ अनुभवण्यासाठी हे करुन पहाच.

५. परफ्यूम तर आपण सर्वच वापरतो. पण काही विशिष्ट पॉईंट्सवर परफ्यूम लावला तर त्याचा सुगंध अधिक काळ टिकून रहातो. यांनाच पल्स पॉइंट असे म्हणतात.

मनगटावर, कोपराच्या सांध्यांच्या आतील बाजूस, मानेवर, कानामागे तसेच गुडघ्यांच्या मागील बाजूस परफ्यूम लावावा.

आधी या भागावर पेट्रोलियम जेली लावून घ्यावी. त्यामुळे परफ्यूम लवकर उडून न जाता अधिक काळ सुगंध देतो.

ज्यादिवशी आपण आंघोळ न करता बाहेर पडतो त्यादिवशी स्कीन टाइट जीन्स वापरणे टाळावे.

त्याऐवजी हलके व कॉटनचे कपडे वापरावेत. यात घाम जास्त येत नाही. त्यामुळे बॉडी ओडर अर्थात उग्र वास येत नाही.

घट्ट फिटिंगचे व जाड कापडाचे ड्रेस वापरू नयेत. ज्याठिकाणी हे कपडे शरीराला चिकटून बसतात तिथे दमटपणामुळे जास्त घाम येतो.

मानेला तसेच काखेत घट्ट कपड्यांमुळे त्रास होतो. म्हणून सुती, पातळ व हलके कपडे आरामदायक असतात. स्त्रीयांकरीता घोळदार स्कर्ट किंवा प्लाझो तसेच पुरुषांसाठी कॉटन शर्ट सर्वात चांगले.

आणि हो, या सर्व ट्रिक्स नाईलाज असेल तेव्हाच वापरायच्या.

दररोज स्वच्छ आंघोळ करणे हे आरोग्यासाठी बेस्ट आहे. त्यामुळे या ब्युटी हॅक्स माहीत आहेत म्हणून आंघोळीला सुट्टी देऊ नका बरं का.

मग कसा वाटला हा लेख? कमेंट्स करुन जरुर सांगा. लेख आवडला तर लाईक व शेअर करा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय