स्मृतिभ्रंश आणि त्याचे लैंगिक जीवनावर होणारे परिणाम

स्मृतिभ्रंश म्हणजेच डिमेंशिया आणि त्याचे रुग्णाच्या लैंगिक जीवनावर होणारे परिणाम जाणून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.

वीस बावीस वर्षाची सुगंधा एका उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या कुटुंबात घरकाम करण्यासाठी येत असे. तिथे घरात पती-पत्नी, त्यांचे 82 वर्षाचे वडील आणि शाळा आणि कॉलेजमध्ये जाणारी दोन मुले असे कुटुंब राहत होते.

सर्व काही सुरळीत चाललेले असताना एके दिवशी अचानक 82 वर्षाच्या आजोबांनी हॉल मध्ये काम करत असलेल्या सुगंधाचा हात धरला, तिला मिठी मारण्याचा प्रयत्न केला. सुगंधा एकदम बावचळून गेली. मोठ्याने ओरडली.

ते ऐकून घरातील इतर सदस्य धावत हॉलमध्ये आले. जे घडले ते सुगंधा कडून ऐकल्यावर सगळे अगदी हातबुद्ध झाले. अगदी घाबरून गेले. काय करावे ते त्यांना सुचेना. मात्र आजोबांना आपण नेमके काय वागलो हे काहीच आठवत नव्हते. त्यामुळे ते शांत बसलेले होते. सर्वांनी अनेक वेळा विचारूनही आपण नेमके काय वागलो आणि असे का केले हे आजोबांना सांगता येईना.

त्यानंतर सर्व कुटुंबीयांनी सुगंधाची माफी मागितली. तिने देखील एकदाच हे असे घडले आहे असे लक्षात घेऊन काम करणे सुरू ठेवले.

संध्याकाळी आजोबांना घेऊन डॉक्टरांकडे नेले आणि झालेला प्रसंग सांगितला तेव्हा डॉक्टरांनी समजावून सांगितले की आजोबांना असणाऱ्या स्मृतिभ्रंशाच्या आजाराचा हा परिणाम आहे. अशा प्रकारच्या आजारामध्ये माणसाची लैंगिक वागणूक बदलून आपण नेमके कसे वागत आहोत हे त्यांना समजत नाही.

(या उदाहरणात वापरलेले नाव काल्पनिक असून हे प्रातिनिधिक स्वरूपाचे उदाहरण आहे हे वाचकांनी लक्षात घ्यावे.)

सध्याच्या काळात डिमेन्शिया किंवा स्मृतिभ्रंश हा आजार बऱ्याच वयस्कर अथवा वृद्ध लोकांमध्ये बळावताना दिसून येत आहे. मात्र या आजाराची म्हणावी तशी माहिती अजून आपल्या समाजातील लोकांना मिळालेली नाही. त्यामुळे असा आजार झालेल्या रुग्णांच्या वागणुकीबद्दल परिवारातील आणि समाजातील लोकांचा गैरसमज होताना दिसतो. वरील उदाहरणातील आजोबांच्या बाबतीत देखील असेच घडले आहे.

आज या निमित्ताने आपण स्मृतीभ्रंश आणि त्याचे व्यक्तीच्या लैंगिक जीवनावर होणारे परिणाम नेमके कसे आहेत हे जाणून घेणार आहोत.

डिमेन्शिया म्हणजेच स्मृतीभ्रंश या आजाराचे व्यक्तीच्या लैंगिक जीवनावर बरेच परिणाम होतात.

१. आक्रमकता

स्मृतिभ्रंशाचा सामना करणारी व्यक्ती अचानकपणे लैंगिक दृष्ट्या आक्रमक झालेली आढळून येऊ शकते. आधी फारशी सक्रिय नसणारी व्यक्ति सुद्धा आक्रमक वागताना दिसते.

२. लैंगिकतेचा पूर्ण अभाव

काही वेळा स्मृतीभ्रंशाचा सामना करणारी व्यक्ती लैंगिक संबंधा बाबत पूर्णतः निरुत्साही झालेली देखील दिसून येऊ शकते. याचाच अर्थ डिमेन्शिया या आजारामुळे काही व्यक्ती लैंगिक संबंधाबाबत आक्रमक तर काही पूर्णतः निरुत्साही होऊ शकतात. त्यांची कामेच्छा जणू नष्ट होते.

३. सार्वजनिक ठिकाणी आक्षेपार्ह वागणूक

डिमेन्शियाचा सामना करणारे रुग्ण काही वेळा सार्वजनिक ठिकाणी आपण नेमके कसे वागत आहोत याचे भान विसरून जाऊन आक्षेपार्ह पद्धतीने वागू शकतात. जसे की विशिष्ट प्रकारचे लैंगिक चाळे करणे, इतर व्यक्तींकडे पाहून विचित्र, कामूक हावभाव करणे इत्यादी. गर्दीच्या ठिकाणी असे रुग्ण अचानकपणे विचित्र वागू लागतात.

४. दुसरीच व्यक्ती आहे असे समजून एखाद्याशी गैरवर्तन करणे.

वर दिलेल्या उदाहरणातील आजोबांच्या बाबतीत असे घडले असण्याची शक्यता आहे. समोर असणारी व्यक्ती ही आपली पत्नी/ पतीच आहे असे वाटून रुग्ण त्यांच्याशी लैंगिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करू शकतात.

समोरची व्यक्ती नीट ओळखू न आल्याने ती कोणीतरी वेगळी आहे असे समजून रुग्णाकडून असे वागले जाते. अशावेळी त्या व्यक्तीने एकदम गांगरून न जाता थोडे समजून घेण्याची आवश्यकता असते. अशा रुग्णांची नीट काळजी घेणे आवश्यक असते.

यावरून आपल्या असे लक्षात येते की ज्या रुग्णांना बऱ्याच काळापासून या आजाराचा त्रास होत आहे त्यांच्या बाबतीत लैंगिक वर्तणुकीच्या समस्या उद्भवू शकतात.

अशा रुग्णांच्या नातेवाईकांनी, त्यांची काळजी घेणाऱ्या लोकांनी त्यांच्यापासून इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.

स्मृतिभ्रंश हा आजार झालेल्या लोकांना वाळीत न टाकता त्यांची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यांना भेडसावणाऱ्या इतर अनेक समस्या बरोबरच ही लैंगिक वर्तणुकीची समस्या देखील महत्त्वाची आहे.

या आजाराबाबत अजूनही आपल्या समाजात अनेक गैरसमज आहेत. पुरेशी जनजागृती झालेली नाही. हल्ली अनेक सेवाभावी संस्था याबाबतची माहिती देण्यास उत्सुक असतात. अशा प्रकारची माहिती देणारे कार्यक्रम जागोजागी आयोजित केले पाहिजेत जेणेकरून असा त्रास होणाऱ्या लोकांना मदत मिळू शकेल.

अर्थातच आपल्याला हा आजार आहे असे भासवून गैरफायदा घेण्याचा प्रयत्न कोणी करत नाही ना हे देखील पाहणे गरजेचे आहे.

तर मित्र-मैत्रिणींनो तुमच्या आजूबाजूला कोणी वृद्ध व्यक्ती या आजाराचा सामना करत असतील तर त्यांना नक्की मदत करा. याबाबतचा अवेअरनेस समाजात वाढावा म्हणून आपण सगळे मिळून प्रयत्न करूया.

तुमचे याबाबतचे विचार आणि अनुभव आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा.

Manachetalks

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय