शब्दांची जादू : गोष्ट एडिसनच्या आईची

जगद्विख्यात शास्त्रज्ञ थॉमस अल्वा एडिसन जेव्हा लहान होते, तेव्हा शाळेत शिक्षकांनी त्याच्याकडे एक चिठ्ठी लिहून दिली आणि त्याला सांगितले फक्त तुझ्या आईला हे वाचायला दे.
घरी येऊन त्याने आईकडे ती चिट्ठी दिली आणि सांगितले, “आई शिक्षकांनी हे फक्त तुला वाचायला सांगितले आहे. काय लिहिले आहे त्यात सांग ना?”
ती चिट्ठी हातात घेतली, तेव्हा ती वाचून आईचे डोळे अश्रूंनी डबडबले आणि ती म्हणाली, “तुमच्या मुलात अलौकिक बुद्धीमत्ता आहे! आमच्या शाळेत त्याला शिकवायला त्या तोडीचे शिक्षक नाहीत म्हणून त्याला तुम्ही स्वतःच घरी शिकवा”
पुढे त्याच्या आईने आजारी पडून मृत्यू येई पर्यंत तेच केले. आणि तो एक महान शास्त्रज्ञ म्हणून नावारूपाला आला.
बरेच वर्ष उलटल्यानंतर असेच एकदा आईच्या आठवणींची जुनी ट्रंक बघत असताना, त्याला ती शाळेतून पाठवलेली चिट्ठी घडी घालून अलगद ठेवलेली दिसली.
आणि त्याने ती उघडून पाहिली, त्यात लिहिले होते…
“तुमचा मुलगा बौद्धिक आणि मानसिक दृष्टीने कमकुवत आहे. आम्ही आमच्या शाळेत त्याला जास्त दिवस ठेऊ शकत नाही. म्हणून त्याला पटावरून कमी करण्यात येत आहे.”
हे वाचून त्याचे डोळे भरून आले आणि त्याने त्याच्या डायरीत लिहिले, “थॉमस अल्वा एडिसन हा, बौद्धिक आणि मानसिक दृष्टीने कमकुवत होता, पण त्याच्या आईने त्याचा कायापालट एक अलौकिक बुद्धिमत्ता असलेला शास्त्रज्ञ म्हणून केले.”
अशीच शब्दांची जादू तुमच्या मुलांच्या आयुष्यात घडवण्यासाठी खास वाढत्या वयातील मुलांसाठी पॉझिटिव्ह अफर्मेशन्स वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा