हरवलेल्या भावना – एक मनोचिंतन

फेसबुक मध्ये एक स्त्री म्हणून एक अकाउंट काढावं आणि एक छानसा फोटो टाकावा कि आपला इनबॉक्स भरायला वेळ लागत नाही.

कोणीही येतं गुड मॉर्निंग करतं.. कोणीही येतं मला तू आवडते सांगतं.. कोणीही येतं माझं तुझ्यावर डिव्हाईन प्रेम आहे सांगतं..

कोणीही येतं तुझ्याशिवाय माझ जग नाही सांगतं.. कोणीही येतं तूच माझी राणी म्हणतं.. काही महाभाग तर ती काहीही उत्तर देत नसेल तरी आपली चिकाटी सोडायला काही तयार नसतात.

women-on-facebookबरं एखादी स्त्री एकटी असेल तर तू एकटी आहेस आणि मीच तुला खांदा देऊ शकतो असा अनाहूत सल्ला सुद्धा देऊन टाकतात.

माझ्याशिवाय मी तुला कोणाचीही होऊ देणार नाही हेही सांगतात. बरं हे सगळं कोणी एकटा माणूस नाही तर रोज असे १०-२० मेसजेस तरी इनबॉक्स मध्ये धडकत असतात. आपणंच कोणाला इग्नोर करावं आणि कोणाला ब्लॉक?

कोणतीही स्त्री दिसली कि ना ओळख, ना पाळख, ना तिच्या आयुष्याविषयी काही माहिती, कि ना तिच्या मनाची अवस्था माहित….

थोडं छान बोलणं झालं कि लगेच ती अव्हेलेबल आहे. ती कुठेतरी झुरते आहे आणि मीच काय तो हिरो जन्माला आलो आहे, जो तिच्या सगळ्या माहित नाही पण निदान “त्या” गरजा पूर्ण करू शकतो अश्या आविर्भावात आज प्रत्येक पुरुष बिनधास्तपणे स्त्री च्या समोर पहिल्या काही तासात उभा रहातो….

तू एकटी आहेस आणि तू मला आवडतेस असं म्हणत तुझ्यासाठी माझ्या कुटुंबाला बाजूला टाकून मी सगळं काही करू शकतो. नाहीतर माझ्याकडे हे आहे ते आहे.

माझं समाजात हे स्टेटस आहे. तूच माझी गरज भागवू शकते हे सांगत गोष्टी कुठूनही सुरु झाल्या तरी संबंधांपर्यंत येऊन थांबतात. हे मी नाही तर फेसबुक वापरणारी प्रत्येक स्त्री तुम्हाला सांगू शकेल…

ह्या सर्वात वयाचं काहीच अंतर नाही. नुकतीच मिसरूड फुटलेला २० वर्षाचा तरुण ५० वर्षाच्या स्त्री ला, तर साठीला पोचलेला एक पुरुष एका १८ वर्षाच्या स्त्री शी बोलताना फक्त तिकडेच येऊन थांबतो.

तिथंवर येण्याची पद्धत प्रत्येक पुरुषाची वेगळी असेल पण शेवटचं स्थानक मात्र तेच. ना ओळख… ना पाळख पण प्रेम व्हायला आणि आवड निर्माण व्हायला एक फोटो किंवा एक चॅट किंवा एक भेट पुरेशी असते आजकाल सगळ्यांना.

समोरच्याला काय वाटेल, काय वाटते ह्याचा काहीच विचार नाही. आपण आपल्या भावना फक्त व्यक्त करायच्या.

समोरच्याने काही विचार करण्याअगोदर आपण गादीवर जाऊन पोचलेले असतो. इतका उतावीळपणा?? कॉलेज ला जाणारे किंवा नुकतच तारुण्यात प्रवेश केलेल्या तरुणांकडून हे व्हावं हे एकवेळ समजू शकतो.

त्या वयात येणाऱ्या भावनांना मोकळीक मिळण्यासाठी वेळ असताना किंवा मिळत नसताना त्या अश्या रीतीने बाहेर येणं कदाचित एकवेळ समर्थनीय पण आयुष्य कोळून प्यायलेल्या आयुष्याच्या सगळ्या गोष्टींची चव चाखलेल्या पुरुषांकडून पण त्याच तर्हेचे वर्तन होत असेल तर आपल्या भावना हरवलेल्या आहेत हे नक्की!!

पूर्वी स्त्री आवडली तरी स्वतःच्या भावना तिच्या पर्यंत पोचवायला अनामिक भीती असायची….

किंबहुना स्त्री काय प्रतिक्रिया देईल ह्यातच आयुष्याची अनेक वर्ष वाया जात.

आज उलट झालं आहे. तिला काय वाटेल हा विचार करण्याची गरजच पुरुषाला वाटत नाही.

मला काय वाटते ते तिने ऐकावं आणि तसंच करावं. नाही ऐकलं तर तिला सोडणार नाही अश्या आविर्भावात अनेक पुरुष असतात.

ती काय जागा, जमीन आणि वस्तू आहे का? हक्क गाजवायला. एखादी स्त्री आवडणं ह्यात चुकीचं काय? अगदी पहिल्या भेटीत तिने मनाचा ठाव घेणं ह्यात हि चुकीचं काहीच नाही.

पण त्या भावना त्याच तरलतेने, त्याच हळुवार पद्धतीने आपण मांडतो आहोत का?

ह्याचा विचार प्रत्येक पुरुषाने करावा. आपली आवड हि नक्की काय आहे, खरंच एक व्यक्ती म्हणून ती आपल्याला आवडते ह्याचा हि त्यात विचार असावा.

पोर्न बघून बघून आपले विचार ज्या वेगाने मशीन होत आहेत ते खूपच धक्कादायक आहे. एकेकाळी हळुवार उमलणाऱ्या आपल्या भावना आता कुस्करून आपण बाहेर आणत आहोत.

एक एक पाकळी हळुवार उमलण्याची मज्जा न घेता आपल्याला फक्त फुलाला चाखायचे असते. कारण आपल्या भावनाच संपल्या आहेत.

एक फुल झालं का दुसरं ह्याच्या शोधात अनेक जण भटकत असतात. हेच अनेकजण एकाचवेळी एकाच फुलाच्या आंगावर धडकत असतात.

कधीतरी फुल होऊन विचार केला तर हे सगळ बघून त्या सगळ्यांचा किती तिटकारा वाटत असेल ह्याचा अंदाज पण आपण लावू शकत नाही. आपला self respect पायदळी तुडवला जात असेल. तर शांत तरी किती वेळ राहायचं आणि कोणासाठी?

Feeling-womenआपण आपल्या आत डोकावून बघायला हवं. आपण जर उठून रोज १० स्त्रियांना ज्यांच्याशी आपला किंवा त्यांचा आपल्याशी जास्ती काही संबंध नसताना, त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया येत नसताना नुसतंच जर आयुष्यात डोकावणं होत असेल तर आपण कुठेतरी आपल्या भावना शोधायला हव्यात…

ज्या कधीच आपल्यातून हरवल्या आहेत. रिस्पेक्ट, डिग्निटी जपणं आणि त्याचा सन्मान करणं हे कोणत्या शाळेत शिकवलं जात नाही. तर ते शिकावे लागते. फेसबुक असो वा खरं आयुष्य. समोर येणारी कोणतीही स्त्री हि Available नसते.

तिला सहानभुतीची गरज नसते, तिला कोणाची तरी अजून गरज नसते. हे बाजूला ठेवून आपण जेव्हा संवाद साधू तेव्हा हरवलेल्या भावनांचा शोध आपण पुन्हा घ्यायला सुरवात करू अस मी म्हणेन.

Manachetalks

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय