पार्टी

पार्टी सुरु होती.

धांगडधिंगा, गप्पा, आवाज, गाणी असलं बरंच काही चाललं होतं.

मधूनच कोणालातरी नाचण्याची लहर आली.

आणि पाहता-पाहता सगळेजण सामील झाले. फक्त एक सोडून.

तो तसाही शांत-शांत असायचा.

हुशार होता, कुणाशी फारसं बोलायचा नाही.

“अरे चल ना, मजा येते नाचायला..” ती म्हणाली.

“मला नाच येत नाही, force करू नकोस”, तो भीती वाटावी एवढ्या ठाम आवाजात बोलला.

सगळे पार्टीत मश्गुल असताना तो केव्हातरी तिथून निघाला, कोणालाही न सांगता.

घरी येताना, त्याच्या डोक्यात विचार चालले होते, ‘काय ते फिदीफिदी हसतात, फालतू जोक्स मारतात आणि नाचतात. मला नाही आवडत, it’s of no use…’

तो असं म्हणत गेला, ज्याने त्याच्याशिवाय कुणालाही फरक पडला नाही.

तो तुटत गेला, इतरांपासून.

एकटा होत गेला.

पुस्तक, लेखन ह्यांत रमत गेला. व्यासंग वाढवत गेला. पण कुणालाही easily reachable तो नव्हता म्हणून ती मैत्री, जुनी नाती, sharing आणि मजा मात्र हरवत गेली.

कधीकधी त्याला मित्र आठवतात, जुने दिवस आठवतात आणि आता तसं नाही म्हणून तो हळहळतोही….

पण मित्रांच्यात गेल्यावर हे जाणवत राहतं कि आपण त्यांच्यापासून तुटलोय…..

असे अनेकजण असतात. लोक येणार, मस्ती होणार म्हटलं कि ह्यांच्या कपाळावर रेषा जमू लागतात.

खूप कमी जणांशी त्यांचं जमतं. मग ते कामात झोकून देतात, चिडचिडे होतात, प्रत्येक गोष्टीला नावं ठेऊ लागतात. त्यांना काहीतरी सिद्ध करायचं असतं. काय, हे बहुदा. त्यांचं त्यांना सुद्धा कळलेलं नसतं.

का कुणास ठाऊक, पण असं वाटतं कि त्यांनी त्यांच्याच भोवती मोठ्या-मोठ्या भिंती बांधून घेतल्या आहेत……

त्याच्या आत त्यांच्याशिवाय कुणालाच प्रवेश नाही.

त्यांना लोक नको असतात असं नाही; पण मित्र-नातेवाईक सगळे एका अंतरावर.

दु:खाने कोसळणं नाही तसं खूप आनंदून जाणं आणि खळखळून हसणंपण नाही……

अशा लोकांच्या बाबतीत वाटत राहतं, काय हरकत आहे, एक दिवस वय सोडून वागायला?

आपल्या भिंतीना एक खिडकी करून बाहेर पाहायला?

सगळे नसतात व्यासंगी, तुमच्याएवढे…..

हुशारही नसतात… perfect तर अजिबातच नसतात…

पण आनंदात राहण्यासाठी व्यासंग आणि हुशारीची गरज नसतेच मुळी…

जरा, आजूबाजूला पाहिलं तर लक्षात येतं, कि आनंदाला तर शोधण्याची पण गरज नसते,

तो कुठेही असतोच…अगदी दु:खात सुद्धा असतो…..

जसा मोठ्या-मोठ्या पुस्तकांत आणि चांगल्या कलाकृतीत असतो,

तसाच फालतू जोक्स आणि नाचण्यातपण असतो.

जसा चर्चासत्रामध्ये असतो, तसाच तो पार्ट्यांमध्ये असतो.

तसाच एखाद्या परक्या माणसासाठी पटकन डोळे भरून येण्यात सुद्धा असतो.

आपण मोकळे झालो कि, तो असा कुठेही भेटू शकतो,

पण बांधून ठेवलं तर फक्त काही ठराविक गोष्टींत.

आपल्या आजूबाजूच्या आवडीनिवडींच्या भिंती पाडून मोकळे झालो कि, आपण आनंदात राहण्याचे चान्सेस वाढवतो. सजीव होतो.

आता नेमकं काय करायचंय हा शेवटी ज्याचा-त्याचा प्रश्न…

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी किंवा तुमचे स्वतःचे लेखन मनाचेTalks वर प्रकाशित करण्याची इच्छा असल्यासयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय