राजकारण

“अशात ती ‘देशभक्ती’ चांगलीच फोफावू लागलीये, आतापर्यंतचं आपलं ‘धर्मनिरपेक्ष’ तेचं हुकुमी आणि जालीम अस्त्रही यावेळी त्यांच्या प्रखर ‘राष्ट्रवादा’समोर फिकं पडतंय,
“काय करावं, निवडणुकीचा बाजार कसा जिंकावा, समजेना झालंय!..”
चिंतातुर स्वरात कार्यकर्त्यांनी साहेबांना विचारले….
“भारतमातेच्या मंदिरात रांग आहे, पण आपल्या मांडवात कोणी खरेदीला येईना, अशाने आपली दुकानदारी कशी चालणार, आणि खर्च कसे भागणार?”
आणखी एकाने साहेबांना विचारणा केली!..
“सोप्प आहे, त्या मंदिरासमोर तीन वेगवेगळी दुकाने थाटा,, ‘सवर्ण’, ‘ओबीसी’ आणि ‘दलित’!,
“जातीची तलवार नीट चालवली की आपोआप धर्माचे तुकडे पडतात!..”
” कामाला लागा!,” जिंकण्याचा मूलमंत्र साहेबांनी दिला होता…… आणि कार्यकर्त्यांत एक नवा जोश भरला होता!.”
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा.

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा
'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा