वाट चुकलेली…..

दुपारच्या विश्रांतीनंतरची वेळ…….
माझ्या समोरची पेशंटची मम्मी अचानक किंचाळली…… मी दचकलो….
डोळ्यासमोरून काळे काही तरी सरकल्यासारखे झाले. मी उठलो……
शेजारी असलेल्या वजनकाट्याजवळ हालचाल झाली…..
पाहतो तर इटुकली खारूताई 🐿 अंग चोरून लपलेली. मी अलगद पकडले तिला. किती छोटी अन् सुंदर होती. तळहातावर सहज बसली…… नाजुकशी,मऊशार……
वाटले सोडूच नये. पण वाट चुकलेली ती… कुणालाही सहज सापडली असती. कदाचित जीवाला मुकली असती…… तळहातावर घेऊन तसाच बाहेर गेलो….
जीन्यापलीकडे सीताफळाचे झाड होते… अलगद हात मोकळा केला… सरसर शेंड्याशी गेली…… हातावर स्पर्श ठेवून…..🐿
असेच घडावे ना कुणी “वाट चुकलेली” भेटली तरी……. कुणीही…..

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा
'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा