​जागतिक वारसा जपला तरच राहील आपला भारत अतुल्य!!

verul-ajintha

आपण एखाद्या पर्यटन स्थळाला भेट का देतो? ह्याचं उत्तर आपण जाण्याआगोदर आपल्याला माहित असायला हवं. ते मंदिर असो, चर्च असो, किंवा ऐतिहासिक वास्तू, सौदर्यस्थळ किंवा कोणतही नैसर्गिक अथवा मानवनिर्मित वास्तू असो. ते बघण्या मागचा आपला उद्देश आपल्याला कळायला हवा. नुसता पैसा घालवून कुटुंबासमवेत वेळ घालवून एन्जॉय करण्याचा उद्देश असेल तर निदान अश्या ठिकाणी जाउच नये. आपल्या घरापासून लांब कुटुंबा अथवा मित्र मैत्रिणींसोबत जाणं कशासाठी आहे हे ठरवून मगच स्थळांची निवड करावी.

गेल्या आठवड्यात हिंदू, बौद्ध, जैन संस्कृतीच्या परमोच्च क्षणांचे साक्षीदार असलेल्या अजिंठा- वेरूळ इथल्या लेण्यांना आणि तेथील मंदिरांना भेट दिली. वर्षाचा शेवटचा आठवडा आणि शाळेला लागलेली सुट्टी ह्यामुळे ह्या ठिकाणी गर्दीचा महापूर असणं साहजिक होतच. त्यात काही नवल विशेष नाही. पण लोकांची मानसिकता बघून मात्र कीव करावीशी वाटली खरे तर तळपायाची आग मस्तकात गेली. सो कॉल्ड सुशिक्षित लोक ज्या पद्धतीने ह्या सुंदर ठिकाणी वावरत होते. ते बघून त्यांच्या मूर्खपणाचा प्रचंड राग आला.

अजिंठा- वेरूळ ह्या दोन्ही वास्तू जागतिक वारसा आहेत. त्यामुळे इकडे वावरताना काळजी घेणं खूप गरजेच आहे. मुळात जागतिक वारसा म्हणजे काय? इथून आपली सुरवात आहे. त्यामुळे पुढे काय बोलणार. तिन्ही संस्कृतीच्या धार्मिक, विद्वत्ता, अभियांत्रिकी, विज्ञान, कला, स्थापत्यशास्त्राचा अदभूत नमुना असणाऱ्या ह्या वास्तूंचा खरे तर आपण भारतीय म्हणून आपल्याला प्रचंड अभिमान वाटायला हवा. पण अस कुठेच दिसून आल नाही. लोक पिकनिकला रिसोर्ट वर आल्याप्रमाणे वागत होते. सेल्फी हा मोबाईल ने दिलेला सगळ्यात मोठा शाप आहे. कुठेही गेलं कि सेल्फी काढण्याच्या नादात आपण स्वतःला हरवून बसतो. त्या ठिकाणाच महत्व विसरून जातो. अनुभवणं सोडून त्याला कॅमेरात बंदिस्त करायचा वेडेपणा म्हणा किंवा मूर्खपणा करतो. ते काढताना त्या ऐतिहासिक वास्तुच्या, सांस्कृतिक धरोहाराच्या अस्मितेला आपण धक्का लावतो आहोत ह्याच भानही आपल्याला रहात नाही.

Pandavlene

नाशिकच्या पांडवलेण्यामधील एक शिल्प

कैलास लेणी च्या शिल्पांवर चढून आपली सेल्फी काढण्यात कसली मज्जा? कसला मोठेपणा? हे फोटो फेसबुक आणि व्हॉट्सअँप वर शेअर करून त्यात कोणती प्रगल्भता आपण दाखवत आहोत. अजिंठा येथील चित्रकला आपल्या मुर्खपणामुळे नष्ट होत असताना फ्लॅशऑन करून चोरून फोटो काढण्यात कोणता आनंद? ह्या शिवाय तिथल्या सुरक्षा रक्षकांनी काय योग्य हे सांगितल्यावर त्यांना आपल्या माजात आम्ही अमक्याचे तमके आहोत आणि आमचे संबंध वर पर्यंत आहेत हे सांगून उगाच मोठेपणा करण्यात कोणती प्रगल्भता. आपण कुठे आहोत ह्याच भान जर आपल्याला नसेल तर ते येईपर्यंत अश्या ठिकाणी जाव तरी कशाला. जिकडे असीम शांतता, विद्वत्ता अदभूत शक्तींचा निवास आहे तिकडे शांतपणे त्या शक्तीची अनुभूती घ्यायची कि मोठ्या मोठ्याने फोन वर बोलत आणि किंचाळत आपल्या घरतल्या गोष्टींचा पाढा वाचायचा? मूर्ती, शिल्प बघताना त्याला कॅमेरात बंदिस्त करताना निदान त्यातील भावात आपल्या स्वतःला आपण विरघळवतो ह्याचा विचार प्रत्येकाने करायला हवा.

जागतिक वारसा सारख्या ठिकाणी एक साधं शौचालय नसण. गाईड किंवा इतर चौकशी साठी योग्य कक्ष नसण. तसेच त्या वस्तूची माहिती देणार फलक किंवा विक्री करणारे फेरीवाले ह्या सोबत मूर्खपणाचा कळस म्हणून बिगर भारतीय लोकान सोबत फोटो काढण्यासाठी भारतीय लोकांचा चाललेला आटापिटा बघून खरेच आपण जागतिक वारसाला भेट देतो आहोत का हा प्रश्न मला पडला. सरकारी यंत्रणा जितकी दोषी आहे तितकेच एक सामान्य आणि जबाबदार नागरिक म्हणून आपण हि दोषी आहोत. चलता हे ह्या नावाखाली आपल्या संस्कृतीच अभूतपूर्व सौंदर्य हजारो वर्ष टिकवून ठेवलेल्या ह्या ऐतिहासिक स्मारकांच रक्षण हे आपल कर्तव्य आहे. आपण ह्या ठिकाणी जाताना काही नियम तर पाळलेच पाहिजेत त्याशिवाय जे नाही पाळत त्यांना योग्य शब्दात समजावण हे हि तितकच महत्वाच आहे.

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!