माहित आहे का आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस केव्हा आणि कसा सुरु झाला?

आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस International mens day

दर वर्षी ८ मार्चला जागतिक महिला दिवस असतो. त्या महिला दिवसाचं कवित्व ८ मार्च संपून दुसरा दिवस येतो तेव्हा हळू हळू कमी व्हायला लागतं.

आता हा भाग वेगळा कि तो महिला दिवस वगैरे काहीही असलं तरी महिलेचं जगणं काही त्याच्याने बदलत नाही.

नोकरी करणाऱ्या महिलांना हा दिवस म्हणजे त्यांच्यासाठी साजरा होणारा सणच असतो.

त्यांच्यासाठी दिवसभर शुभेच्छांचा धो धो पडणारा पाऊस आणि संध्याकाळ होईपर्यंत तो ओसरणारा पूर सावरत घर गाठणं म्हणजे ८ मार्च.

पण जागतिक पुरुष दिनाच्या वाट्याला तर तेही नसतं.

आश्चर्य वाटलं ना जागतिक पुरुष दिन ऐकून!!

हो आज म्हणजे १९ नोव्हेम्बर, हा दिवस दर वर्षी जागतिक पुरुष दिवस म्हणून साजरा केला जातो किंवा मानला जातो.

१९ नोव्हेम्बर हा जगभरातल्या पुरुषांसाठी काही खास दिवस आहे.

भारत किंवा जगातले बहुतांश देश पुरुषप्रधान असल्याने स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीचा दर्जा मिळावा यासाठी जागतिक महिला दिन मोठ्या थाटात साजरा होतो.

पण जागतिक पुरुष दिनाबद्दल काही माहिती आपल्याला नसतेच.

पण हा आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस का साजरा केला जातो??

किंवा मुळात बरेच जणांना तर हा प्रश्न असेल कि खरंच असा काही दिवस आहे का?

कि सोशल मीडियाने काहीतरी नवी टुम काढलीये हि!!

आणि असेलच असा दिवस तर तो केव्हापासून सुरु झाला हा प्रश्न बरेच जणांना पडला आहे.

चला याबद्दलच आज विस्ताराने बोलू.

सर्वात प्रथम ७ फेब्रुवारी १९९२ ला आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस साजरा करण्याची सुरुवात झाली.

अमेरिका, कॅनडा आणि युरोपच्या काही देशांमध्ये हा दिवस साजरा केला गेला. पण १९९५ पासून हा दिवस साजरा होणे बंद होत गेले.

याला कदाचित कारण हेही असू शकते कि महिलांमध्ये कुठल्याही गोष्टीचा उत्सव करण्याचा उत्साह हा उपजतच असतो.

तशी ती पुरुषांमध्ये नसते.

पण तरीही बऱ्याच देशांमध्ये हा ७ फेब्रुवारीचा आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस साजरा होतच राहिला.

पुढे १९९८ साली त्रिनिदाद आणि टोबॅगो मध्ये पुन्हा एकदा पुरुष दिवस साजरा करण्याची सुरुवात झाली.

यावेळी दिवस ठरवला गेला १९ नोव्हेम्बर. डॉ. जीरोम तिलकसिंह यांनी हा दिवस सुरु करण्यासाठी प्रयत्न केले.

पुढे हळू हळू ७० देशांमध्ये हा दिवस पुरुष दिवस म्हणून मानला जाऊ लागला. आणि युनेस्कोने पण या दिवसाला मान्यता दिली.

भारतात या दिवसाची जागृती यायला तसा बराच वेळ गेला.

‘सेव्ह इंडियन फॅमिली’ या फाउंडेशनने २००७ साली सर्वात आधी हा दिवस साजरा करायला सुरुवात केली.

पुढे ऑल इंडिया मेन्स वेल्फेअर फाउंडेशनने महिला विकास मंत्रालया सारखं ‘पुरुष विकास मंत्रालय’ सुरु व्हावं हि सुद्धा मागणी केली.

आणि जागतिक पुरुष दिवस सर्वांना माहित व्हावा यासाठी प्रयत्न सुरु ठेवले.

आणि साधारण गेल्या एक दोन वर्षातच भारतात या दिवसाबद्दल माहिती पोहोचली.

आता या वर्षी पुरुषांनीच महिलांसारखा उत्साह ठेऊन या दिवसाचा इव्हेंट केला तर लवकरच हा पण दिवस फेमस होईल…. काय पटतंय ना राव!!

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!