‘या’ ही नात्यांना गरज आहे व्हॅलेंटाईन डे ची

व्हॅलेंटाईन डे

कालच व्हॅलेंटाईन डे झाला. ‘व्हॅलेंटाईन डे’ हो… प्रेमदिन. प्रेमदिनाचे खास औचित्य साधून अनेक तरुण-तरुणींनी आपल्या प्रेमाची कबुली दिली. त्यांनाही अपेक्षित अशी उत्तर नक्कीच मिळाली असतील. कारण व्हॅलेंटाईन डे म्हणजे तरुणांसाठी पर्वणीच आहे. कॉलेज शाळा क्लास आजच्या दिवशी बंक करून या दिवसाचं सेलिब्रेशन केलं जातं. आपल्या आवडत्या व्यक्तीची आवड जपण्याचा प्रयत्न केला जातो. या दिवसाला जशी ही एक बाजू आहे तशीच हा दिवस साजरा करू नका असे म्हणणारेही अनेक आहेत. म्हणजेच या दिवसाला विरोध करणारेही अनेक लोक आहेत. अनेक सामाजिक संघटनांना व्हॅलेंटाईन डे म्हणजे केवळ पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण वाटते. असो आपण यात पडायला नको. या दिवसासाठी मला एक मुद्दा उपस्थित करायचा आहे. ज्यावर तुम्ही नक्कीच विचार करावा अशी अपेक्षा आहे.

रोजचा दिवस सारखाच म्हणून इथे प्रत्येक व्यक्ती आपली लाइफस्टाइल जगत आहे. रोज काम करणं. महिन्याला येणाऱ्या पगारातून घर चालवणं. पण हा ‘रोज’ घालवताना तो जगताना एक ‘रोज’ आपल्या माणसाला देण्याचीही नितांत गरज आहे. होय…. लोक म्हणतात की व्हॅलेंटाईन डे ची गरज नाही. पण खरंच जगात अशी अनेक नाती आहेत ज्यांना या एका दिवसाची गरज आहे. मग ती बायकोच्या मायेत असो. वा बाबाने केलेल्या विचारपुसीत असो. आईच्या मांडीवर डोकं ठेऊन झोपण्यात असो वा मुलांसोबत वेळ घालवण्यात असो. पण खरंच या नात्यांना एका व्हॅलेंटाईन डे ची खूप गरज आहे.

रोज सकाळी उठून कामाला जाणार पती आणि त्याच्यासाठी जेवण बनवणारी त्याचा संसार सांभाळणारी त्याची पत्नी. यांच्यातील संवाद केवळ गरजेपुरता उरला आहे. ‘ऑफिस वरून येताना हे घेऊन, ते घेऊन या’ या ऐवजी कधीतरी तिने, ‘काळजी घ्या, वेळेवर जेवून घ्या म्हणणं त्या love u च्या पुढे फिके पडेल राव.

तर पतीनेही पत्नी जितके सांगेल तितकेच न आणता कधीतरी तिच्यासाठी तिची आवडती पाणीपुरी आणावी. कधी गजरा तर कधी चॉकलेट. महागड्या रेस्टॉरंट मध्ये जाऊन जेवण्यातही जी मजा नाही ती एकत्र पाणीपुरी खाण्यात आहे .

पुढील नातं आहे. आई आणि मुलाचं. घरी आजाराने ग्रासलेली, औषधांवर जगणारी आई. सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत काम करणारा मुलगा. हे ही एकमेकांना वेळ देऊ शकत नाहीत. मुलाने कधीतरी स्वतःहून आईसाठी गोळी घेऊन जावी. तिच्या केसातून हात फिवरत. ‘आई मी जागा आहे, काही लागलं तर सांग’ हे शब्द त्या वयस्कर आईला खूप आधार देणारे वाटतात.

तसेच सेम मुलं आणि पालकांच्या बाबतीत. मूल आणि आई-वडील पूर्ण आठवडा शाळा आणि जॉब करतात. पण रविवार हा एक दिवस त्यांनी कोणतंही काम न करता. ऑनलाईन न येता एकत्र वेळ घालवावा. सतत कम्प्युटर कडे पाहणाऱ्या बाबाने मुलांची स्माईल ही एखाद्या दिवशी पहावी.

समाजात अशी काही लोकं आहेत जे रस्त्यावर राहून आपला उदरनिर्वाह चालवतात. आशा लोकांना एक दिवस व्हॅलेंटाईन डे साजरा करायला मिळाला तर ते मिळालेल्या पैशातून अन्न खरेदी करतील आणि काही अन्न साठवून ठेवतील. कारण आज आहे उद्या असेलच कशावरून? आशा लोकांसाठीही एक व्हॅलेंटाईन डे खरच गरजेचा आहे.

खरंच व्हॅलेंटाईन डे का साजरा केला जातो याची एक स्टोरी तुम्ही ऐकली असेलच. पण त्या काळात तो गरजेचा होता म्हणून साजरा केला गेला. त्यावेळी रोम साम्राज्याच्या काही कडक नियमांमुळे तो साजरा करण्याची गरज पडली. मात्र आता तो आपल्यातील संवाद कमी पडल्याने साजरा करायची गरज पडली आहे. म्हणूनच म्हणतेय. खरच एक व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याची गरज आहे. मग वर्षभरात तो कधीही साजरा करावा!


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!