माझं हरवलेलं गांव

आज पुन्हा वाटल गावी जावं,
हरवलेलं गांव डोळ्यात साठवावं…
बघावं म्हणलं भेटतात का ते जुने मित्र,
हरवलेलं पोष्ट आणि ते मामाच पत्रं….
बघुन यावं म्हणलं बारकी पोरं नेमका कोणता खेळ खेळताहेत…
वीटी दांडू, गोट्या की सुर पारंब्या…
मारत आहेत का आंब्याला दगडं अणि खात आहेत का चिंचा आणि बोरं….
पहावं म्हणलं आहेत का ती म्हातारी चालती बोलती विद्यापीठे
की त्याचं ही बंद करुण टाकलय या अतिशहाण्या लोकांनी ज्ञान घेणं….
पहावं वाटलं आहे का ओढ़ अजुन पाहुण्या रावळ्यांची
आपुलकीची आणि प्रेमाची…
वाटलचं एकदा बघुन यावं गाव आपलं बदललेलंं…
म्हणून आलो गावी …
म्हणून आलो गावी पण अपेक्षा केली होती त्यापेक्षा गाव निघालंं हरवलेलंं…
कुठेच दिसले नाहीत ते मस्ती अणि टवाळक्या करणारे मित्र…
गावातुन पोष्टच हद्दपार झालयं तर येणार कुठून पत्रं???
कौलारु घरं तर गेलीच….. त्याच बरोबर गेली वडाची अणि पिंपळाची झाडं…
अणि सगळ्यात महत्वाची म्हणजे गावची संपन्नता गेलेली दिसली…
बारकी पोरंं तर दिसतच न्हवती मग आंबे, चिंचा आणि बोरं चोरून आणाायची गोष्ट लांबचीच…
पाहुणेच येत नाहीत आता… तर आपुलकी कुठून येणार???
या हायटेक जगात माणुसकी कुठं टिकणार….
माणुस झालाय फॉरवर्ड या इंटरनेटच्या जगात…
मग प्रेम आणि आपुलकी कुठं येणार माणसांच्या हृदयात???
दिसला बदललेला गाव..
बदललेली माणसं..
बदललेला समाज आणि बदललेली मनं…
उदास झाल मन आलं पानी डोळ्यात…
गांव तर आधीच सुटल होत पण मन मागं रेंगाळत होतं…
तेही आता कंटाळलय गावाला…
तेही निघालय माझ्याबरोबर शहराच्या प्रवासाला…
शेवटी मन घट्ट करुण निरोप घेतला माझ्या हरवलेल्या गावाचा
आणि पाठीमागे राहिला एक हळवा कोपरा मनाचा