संगमरवरी देव्हारा

दोन वर्षापूर्वी भाड्याच्या घरातून स्वत:च्या घरात राहयला आलो. आता पुर्वी सारखे दिवस नाहीत. म्हणजे संसाराची जमवाजमव वैगेर. किडूकमिडूक वस्तू जमा करा. मला जेव्हढं मोकळे घर असते तेव्हढं आवडते. आता नवीन घर आणि मानगुटीवर बसलेलं इएमआयचे भूत, लवकर घरभर संसार गोळा होऊ देत नाही.
पण नवीन घर आले का माणूस थोडा धार्मिकतेकडे वळतो. जे आयुष्यांत घर घेण्याचे स्वप्न असते. ते आता त्याचे पुर्ण झालेलं असते. मग घरात सर्व संसारोपयोगी सामानाला दुय्यम स्थान दिले जाते. आणि प्रथम स्थानावर असतो देव्हारा. माझ्या घरातपण पहिला देव्हारा आला.
पांढरा शुभ्र दिसायला खूप आकर्षक. संगमरवरी देव्हारा. त्याचे वजन खूप होते म्हणून घरामध्येच त्याची योग्य जागेसाठी शोधाशोध सुरु होती. तो पर्यंत त्या देव्हार्याचा उपयोग माझा छोटा मुलगा वय दिडवर्ष हा करायचा. तो मस्त जाउन बसायचा. त्याला आत बसल्यावर थंडगार लागायचे. मग तो अंगावरचे संपूर्ण कपडे उतरवून देव्हार्यात बसायला लागला. तो त्याचा एक प्रकारचा खेळच व्हायला लागला. बसून दिले नाही का हट्ट करायला लागायचा. नंतर देव्हार्याची जागा घरात निश्चित झाली. मुलाला समजावून त्याला त्यामध्ये बसायचं बंद केले.
पण एक दिवस त्याची आई किचनमध्ये कामात होती. मोठा मुलगा वय सहा वर्ष अभ्यास करत होता. मी घरी पोहचून कपडे बदलत होतो. छोट्या मुलाला संधी मिळाली.
तो सगळ्यांच्या नजरा चुकवून गेला आणि देव्हार्यातील नाराळ पहिला फेकून दिला नंतर देवाचा फोटो उचलून फेकून दिला. आवाज आल्याबरोबर आम्ही बाहेर आलो. त्याने सर्व जागा मोकळी करून स्वत: देव्हार्यात जाऊन बसला होता. त्याच्या आईने त्याला बाहेर काढले.
बोलली देवबाप्पा आहे… अश नाय कलायचं बाप्पा कान कापील.
मोठा मुलगा ते बघून खूप जोरात हसत होता. तो त्याच्या आईला बोलला.
देवबाप्पा फोटोतनं येउन कसा गं कान कापील.
मिसेस मला बोलली.
बघा तुमचं दोन पिढ्या पासूनचे वारकरी घराणे. ही पिढी मला नाही वाटत देव धर्म मानील?
प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे पण नव्हतं. मुलांच वय लहान आहे. दुसरे म्हणजे विज्ञान युगात वाढणारी. डोळ्यांनी दिसते त्यावर विश्वास ठेवणारी. मग मी बोललो.
अगं! लहान आहेत ती. समजेल मोठं झाल्यावर.
मुलाकडे वळून म्हणालो.
बाळा असं नाही बोलायचं. देव दिसत नसला तरी आहे. तो भिंतीवर आपल्या आजीचा फोटो आहे त्याला आपण फेकू का असं.
मला सुध्धा एव्हड्या लहान वयाच्या मुलांना समजावणं शक्य नव्हते. मग लगेच मिसेसने मला प्लास्टिकचा देव्हारा आणायला लावला. जेणेकरून तो वजनाला हलका असतो व भिंतीवर ठोकता येइल. संगमरवरचा वजनदार देव्हारा गावाला पाठवून दिला.
नंतर एक दिवस मित्राच्या घरी जाण्याचा योग आला. दोन्ही मुलं जोडीला होती माझ्या. मित्राच्या घरी त्याचे आईवडिल त्याचा भाऊ सर्व होते. त्या दोघांची लग्न झाली नव्हती. घरात लहान मुलं नव्हती. मिसेस जोडिला नव्हती आमच्या. मित्राच्या घरी सर्वांना आनंद झाला लहान मुलं बघून. नंतर थोड्या वेळात छोटा मुलगा हट्ट करायला लागला की अंगावरचे कपडे काढा.
त्याचा हट्ट का आहे माझ्या लक्षात येइना. पण मित्राची आई बोलली ये बाळा मी कपडे काढते. पण तिला पण समजले नाही हा का कपडे काढायला सांगतोय. अंगावरचे कपडे काढले. ड्रायफर लावलेली काढली. तसा हा छोटा त्यांच्या देव्हार्यापुढे गेला. त्यांचा देव्हारा पण खालीच होता. मग माझ्या लक्षात आले हा आता देव्हार्यातले देव किंवा इतर सामान फेकून देणार आणि देव्हार्यात जाऊन बसणार. मी मित्राच्या आईला लगेच सांगितलं.
मावशी त्याला आवरा आता हा देव्हार्यातले देव फेकून देणार आणि स्वत: जाऊन बसणार.
मित्राची आई बोलली.
फेकू दे. बघू या हा आता काय करतोय ते आपण.
तो देव्हार्यापुढे गेला मित्राची आई त्याच्या बाजूला उभी होती. त्याने वस्तू उचलून फेकायला घेतली का मित्राची आई हात पुढे करायची. मग हा ती वस्तू न फेकता त्यांच्या हातात द्यायचा. असं करून देव्हार्यातील सर्व वस्तू खाली केल्या. आणि देव्हार्यात जाऊन बसला. आम्ही सर्व मजा पाहत होतो. तो देव्हार्यात जाऊन बसला तसा त्याला खूप आनंद झाला.
मी मित्राच्या आईला विचारले.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी किंवा तुमचे स्वतःचे लेखन मनाचेTalks वर प्रकाशित करण्याची इच्छा असल्यास येथे क्लिक करा.

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा
'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा