‘ह्युमन कम्प्युटर’ असलेल्या शकुंतलादेवींचा बायोपिक साकारणार आहे ‘विद्या बालन’

विद्या बालन

बॉलिवूड मध्ये सध्या बायोपिक बनवण्याची लाट आली आहे. कुणी क्रिकेटर असो, एथलीट असो, कलाकार असो नाहीतर दस्तुरखुद्द पंतप्रधान…. कुणावरही बायोपिक बनत आहेत.

आता विद्या बालन सुद्धा एका बायोपिक मध्ये लवकरच झळकणार आहे. पण हा बायोपिक कोणा कलाकार किंवा राजकारण्यांच्या नाही.

तर ‘ह्युमन कम्प्युटर’ आणि ‘मेंटल कॅल्क्युलेटर’ म्हणून जगभर ओळखल्या जाणाऱ्या शकुंतला देवींवर हा बायोपिक असणार आहे. यामध्ये शकुंतला देवींची भूमिका विद्या साकारणार आहे.

सिनेमाबद्दल उत्सुकता दाखवणारे विद्या बालन चे ट्विट

कोण आहेत शकुंतला देवी?

शकुंतला देवींचे वडील सर्कसमधले कलाकार होते. एकदा ते शकुन्तलेला पत्त्यांच्या करामती शिकवत होते. तेव्हा त्यांना समजलं कि आकडे लक्षात ठेवणे, आकडेमोड करणे यात शकुंतला चांगलीच तरबेज होती. त्यावेळी तीचं वय होतं तीन वर्षांचं.

शकुंतलेच्या वडिलांनी तिच्या कॅल्क्युलेशन दाखवणाऱ्या करामतींचे रॉड शो सुद्धा केले. शकुंतलाने एकदा मैसूर युनिव्हर्सिटी मध्ये मॅथ्स क्विझ मध्ये भाग घेतला होता. आणि तेव्हापासून तिची गणितातली बुद्धिमत्ता चर्चेचा विषय बनली.

१९७७ मध्ये अमेरिकेतील एका युनिव्हर्सिटीमध्ये शकुंतलाला बोलावले होते. तिथे त्यांच्या गणिती प्रश्नांची उत्तरे चटकीसरशी देऊन तिने सर्वांना चकित केले. १९८२ मध्ये गिनीच बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये तिच्या नावाची नोंद झाली.

याशिवाय तिने बऱ्याच कादंबऱ्या, गणिताविषयीची पुस्तके एवढेच नाही तर पाककलेची पुस्तकेसुद्धा लिहिली. या विषयांव्यतिक्त काहीसा न बोलला जाणारा विषय होता ज्याला शकुंतला देवींनी वाचा फोडली. काहीसा नाही त्या काळात असे विषय बंद दरवाजांच्या बाहेर बोलणे हे मोठे साहस होते. तो विषय होता होमोसेक्शुएलिटी.

Shakuntla devi
हा विषय शकुंतला देवींच्या आयुष्यात कसा आला.

१९६० च्या दशकात परितोष बॅनर्जी नामक एका बंगाली गृहस्था बरोबर शकुंतला देवींचे लग्न झाले. काही वर्षांच्या सहजीवनानंन्तर दोघे वेगळे झाले. कारणही तसेच होते…

परितोष होमोसेक्शुअल होते…

होमोसेक्शुएलिटीचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी १९७७ साली ‘वर्ल्ड ऑफ होमोसेक्शुल्स’ नावाचे पुस्तक लिहिले. यात त्यांनी काही होमोसेक्शुअल जोडप्यांचे इंटरव्यू सुद्धा घेतले.

याच काळात होमोसेक्शुएलिटीला अपराधाच्या सूचीतून काढण्याची मागणी व्हायला सुरुवात झाली. या पुस्तकाला भारतातील होमोसेक्शुएलिटी वर अभ्यासपूर्ण चर्चा करणारे पहिले पुस्तक मानले जाते.

याशिवायही शकुंतला देवींना एका गोष्टीसाठी ओळखले जाते. आणि ती म्हणजे शकुंतला देवींनी इंदिरा गांधींना हरवण्यासाठी लोकसभेची निवडणूक लढवली होती.

१९८० साली तेलंगणाच्या मेडक लोकसभा सिटहून इंदिरा गांधींना हरवण्यासाठी शकुंतलादेवींनी लोकसभा निवडणूक सुद्धा लढवली होती.

यामध्ये नवव्या नम्बरवर समाधान मानावे लागल्याने त्यांनी राजकारणापासून दूर राहणेच पसन्त केले. आणि त्या बंगलोरला राहू लागल्या.

तेथे ज्योतिषशास्त्रात त्यांनी आपले काम पुढे चालू ठेवले. २०१३ मध्ये श्वास घेण्याच्या त्रासामुळे त्या बंगलोरच्या दवाखान्यात भरती झाल्या. हृदय विकार आणि किडनीच्या त्रासामुळे वयाच्या ८३ व्य्या वर्षी २१ एप्रिल २०१३ ला त्यांचे निधन झाले.

शकुंतला देवींचा हा जीवनप्रवास विद्या बालन पडद्यावर कसा साकारते आणि पुन्हा एक बायोपिक कुठल्या चर्चा, वाद विवाद घेऊन येतो हे आता येणाऱ्या दिवसात उलगडेलच.

मनाचेTalks च्या लेखांबद्दल वाचकांच्या प्रतिक्रिया

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीकिंवा तुमचे स्वतःचे लेखन मनाचेTalks वर प्रकाशित करण्याची इच्छा असल्यासयेथे क्लिक करा.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!