फिल्म रीव्हीव – स्टुडन्ट ऑफ द इयर: २

अरिंदम चौधरी म्हणून एक मॅनेजमेंट गुरू होते. त्यांचं असं म्हणणं होतं की प्रत्येक दशकात एक फ्रेश, नवी कोरी कॉलेज जीवनावर आधारित अशी फिल्म असली पाहिजे. जशी नव्वदीच्या दशकात एक हिट फिल्म ‘जो जिता वही सिकंदर’ होती. आणि अशीच यांनी पण एक फिल्म बनवली होती जिचं नाव होतं ‘रोक सको तो रोक लो’ पण ही फिल्म कुठून आली आणि कुठे गेली हे कोणालाच नाही कळलं.

फ्रेश च्या नावावर निव्वळ वेडेपणा खपवायला दर्शकांनी नकार दिला. आता तुम्ही म्हणाल हे सगळं मी का सांगते आहे?….

कारण असाच फ्रेशनेस च्या नावावर निव्वळ वेडेपणा घेऊन करण जोहर पुन्हा एकदा आला आहे. आणि त्याच्या बरोबर आहे टायगर श्रॉफ… आणि फिल्म चं नाव आहे ‘स्टुडन्ट ऑफ द इयर : २ ‘

ष्टोरी ऑफ द इयर

गोष्ट एव्हडीच आहे की, एक मध्यम वर्गीय मुलगा असतो ज्याच्या एका हातात गर्लफ्रेंड, एक हातात स्टुडन्ट ऑफ द इयर ची ट्रॉफी आणि डोळ्यासमोर मोठ्या नावाजलेल्या कॉलेजचं स्वप्नं असतं. दोन मुली असतात त्यातली एक गर्विष्ठ आणि दुसरी सदा कन्फ्युज…

आता हिरोला काही जिंकायचं असलं तर कोणी हारणारा पण पेरावा लागेल. मग तो पण आहेच. पण गम्मत अशी आहे की बरेचदा हे बघता बघता आपल्याला असे वाटेल की हिरोच्या जागी हाच जिंकला असता तर बरं झालं असतं🤦 एवढं ऐकून बाकी प्रेडिक्ट करण्यासारखी स्टोरी सांगून आता मी तुम्हाला जास्त त्रास देणार नाही

पिक्चरमध्ये हिरोईन एकदा हिरोला बोलते ‘मुझे तुमसे kind of प्यार हो गया है’ आणि हीच या फिल्म ची समरी आहे. कारण ही फिल्म नाही ‘kind of film’ आहे. ही फिल्म बघताना आपण इथे का येऊन बसलो म्हणून भेजा फ्राय झालाच समजा. कारण यात छोट्या शाळा, कॉलेजांचा निव्वळ बेशर्मिने ठिकठिकाणी मजाक उडवलेला बघून आता या जोकवर हसावं का रडावं असं होऊन जातं.

या फिल्ममध्ये इमोशन्स पासून, सेट, डिझायनर कपडे सगळं काही नकली दिसतं. प्रिन्सिपल हे प्रिन्सिपल पेक्षा ‘डि जे वाले बाबू’ च जास्त दिसतात. संगीताच्या म्हणजे म्युजिकच्या नावावर असे काहीही नाही जे घरी जाईपर्यंत तुमच्या लक्षात राहील.

Acting म्हणाल तर टायगर श्रॉफ एक्सप्रेशन्स देण्याशिवाय बाकी सगळं काही करू शकतो. डान्स, जिम्नॅस्टिक, ऍक्शन, बॉडी शो एवढंच बघायचं असेल तर ही फिल्म चांगला पर्याय आहे. अनन्या पांडे आणि तारा सुतारिया यांना करण्यासारखं विशेष असं काही मुळात स्क्रिप्टमध्येच नाही. राहता राहिली गुल पनागसारखी गुणी अभिनेत्री…. पण व्हलगर दृश्यात घालून तिला पण वाया घालवलं….

एकूण काय तर पिक्चरमध्ये सगळंच अगम्य आहे. कबड्डी ची प्रॅक्टिस अशी होते जशी काही आर्मीची कमांडो ट्रेनिंग!! एक रेस आणि कबड्डी जिंकून कसं कोणी स्टुडन्ट ऑफ द इयर बनू शकतं ते करण जोहर नामक देव बाप्पालाच ठाउक. पण दुर्दैव असं की हे असे चॉकलेटी पिक्चर चांगली स्टोरी असलेल्या कलात्मक फिल्मला मागे सारून गल्ला जमवण्यात यशस्वी ठरतात. हे थांबवणं आता आपल्या दर्शकांच्याच हातात…

मला शक्य असतं तर मी एक केलं असतं… थिएटर च्या बाहेर एक माणूस उभा करून त्याच्या गळ्यात पाटी लावली असती…

अंदर मत जाना…

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीकिंवा तुमचे स्वतःचे लेखन मनाचेTalks वर प्रकाशित करण्याची इच्छा असल्यासयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

2 thoughts on “फिल्म रीव्हीव – स्टुडन्ट ऑफ द इयर: २”

  1. मस्त परीक्षण!

    चटपटीत विनोदी शैली!..

    खुमासेदार वर्णन!..

    पण तेवढं ‘फिल्म रीव्हीव’ आणि ‘ष्टोरी’ ह्यांच्या जागी रीव्ह्यु आणि स्टोरी असं लिव्हा की!…

    Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय