जाणीव

realisation

आयुष्यात अनेकदा जाणीव व्हायला आपल्याला उशीर होतो. आयुष्यात जवळ असणारी आपली माणसं जेव्हा आपल्यापासून लांब होतात तेव्हा त्यांचं स्थान आपल्याला कळून येते. कधीतरी आपल्यासाठी आयुष्यात खूप काही केलेली माणसं अगदी आपल्याला जन्म देण्यापासून ते मरेपर्यंत साथ दिलेली माणसं खूप काही करत असतात आपल्यासाठी. त्यांनी आपल्यासाठी केलेल्या त्यागाची, प्रेमाच्या जाणिवेची जाणीव जेव्हा होते न तेव्हा डोळ्यांच्या पापण्या नकळत ओल्या होतात. शब्द तोंडात गोठून जातात. राहते ती फक्त अनुभूती त्या जाणिवेची.

जाणीवेची जाणीव व्हायला कोणी तरी आपल्या आयुष्यातून कमी होईल ह्याची वाट बघण्यापेक्षा आपण त्या जाणीवांना आधीच जगलो तर.

कितीतरी लोक कळत नकळत आपल्या आयुष्याला आकार देत असतात. आपल्या जन्माचं बीज रोवल्यापासून ते शेवटचा श्वास घेईपर्यंत. ओल्या मडक्याला आकार देणारे अनेक हात असतात आणि सुकलेल्या मडक्याची काळजी घेणारे पण. आपण बऱ्याचदा किंबहुना सर्वच वेळा ह्या लोकांना गृहीत धरतो. आई म्हणजे तिने आपल्यावर प्रेम करायला हवं. आपल्याला बर नसताना आपल्या बाजूला बसून आपली काळजी घ्यायला हवी. बाबांनी पैसे कमवायला हवे. भले दोन वेळ उपाशी राहून पण आपले लाड त्यांनी पूर्ण करायला हवेत. बहिण आणि भावांनी आयुष्याच्या चांगल्या वाईट क्षणात आपल्याला साथ द्यायला हवी तर मित्र मैत्रिणीनी खांद्याला खांदा मिळवून सगळ्या आव्हानांचा सामना आपल्यासोबत करायला हवा. जोडीदार तर आपल्या प्रत्येक क्षणात हवा. पण हे सगळ गृहीत धरताना हे काहीतरी स्पेशल आहे ह्याची जाणीव कधीच होत नाही.

असं म्हणतात कि ज्याच्या आयुष्यात काहीतरी कमी असते त्यालाच त्या गोष्टीचं किंवा नात्याचं महत्व कळतं. महत्व कळण्यापेक्षा ती व्यक्ती नसण्याची जाणीव प्रकर्षाने होते. न मिळालेल नातं असो वा आयुष्यात अर्धवट साथ सोडलेल नातं असो. अस अचानक जाणं किंवा आयुष्यात नसण हेच आपल्याला त्या जाणिवेची जाणीव प्रकर्षाने करून देत. कधी ती इतकी तीव्र असते कि आपण आयुष्यात काय कमावल ते एका क्षणात गमावल्या सारखं वाटत. शेवटी राहतात त्या जाणीवा!! आपल्या माणसांनी आपल्याला दिलेल्या.

जाणीवेची जाणीव व्हायला कोणी तरी आपल्या आयुष्यातून कमी होईल ह्याची वाट बघण्यापेक्षा आपण त्या जाणीवांना आधीच जगलो तर. आईने रात्री जागून केलेली सेवा असो, बाबांनी उपाशी राहून आणलेली सायकल असो वा बहिणीने / भावाने दिलेला आशिर्वाद किंवा प्यार कि झप्पी असो. मित्र/ मैत्रिणीने विश्वासाने दिलेला खांदा आणि हात असो. तर जोडीदाराने केलेल निस्वार्थी प्रेम असो. ह्या सगळ्या जाणीवा घड्याळाच्या काट्याकडे बघून जगताना आपण जगूच शकतो कि!!

काय लागते जाणीव व्हायला कधी मिठी तर कधी दोन अश्रू तर कधी स्मितहास्य तर कधी शब्द कधी तर ह्या सगळ्यांपलीकडे असलेली फक्त नजर. त्या डोळ्यांतून शब्द कधी समोरच्या पर्यंत जातात ते कळत पण नाही. त्यातून मिळणारं समाधान हे शब्दात मांडता येत नाही तर फक्त त्याची अनुभूती घ्यायची असते. अनेक लोकांचे अनेक हात आपल्या आयुष्याला घडवत असताना त्या हातांची आपल्याला असलेली जाणीव हि त्या हातांना एक नवीन बळ देते. काळाच्या ओघात उसवलेली आपली नाती पुन्हा नवीन होतात. हरवलेले ती नाती पुन्हा एकदा समोर येतात. आयुष्याच्या प्रत्येक काळात आपल्याला सांभाळणारे ते हात आपण किती वाढवायचे ते ह्या जाणीवेवर अवलंबून असते. कारण देणारा हा फक्त आणि फक्त त्या जाणीवेतून देत असतो. त्या जाणिवेची कदर जर आपण केली तर कदाचित ह्या गृहीत धरलेल्या नात्यांना एक नवीन धुमार फुटेल ह्यात शंका नाही.


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!