कोण म्हणतं आयुर्वेदात उशीरा गुण येतो?

कोण म्हणतं आयुर्वेदात उशीरा गुण येतो?

एक 25 वर्षाची विवाहित रुग्णा जुलाब होतात म्हणून दवाखान्यात आली.

आयुर्वेदिक पद्धतीने संपूर्ण केस आधी तपासली होती. मुद्दामहून फ्लॅशबॅक म्हणून आधी नोंद केलेले केस डिटेल्स सांगत आहे.

जन्म :- जून महिन्यातील आहे.

शिक्षण :- कंप्युटर इंजिनीयर

जन्मस्थान :- बरोडा – गुजरात

वर्तमान व्याधी वृत्त :-

गेल्या 5 वर्षापासून डोकेदुखीचा त्रास आहे, सुर्य प्रखर होऊ लागला कि डोकेदुखी वाढते. तारुण्यपिटिका 7 महिन्यापासून येतात.

पौष्टिक खाल्ल्यास लगेच वजन वाढते. म्हणून काही काळ पथ्यकर खातात व पुन्हा संयम सुटला कि ताळतंत्र सोडून काहीही खातात, नि पुन्हा येरे माझ्या मागल्या असे चक्र चालु आहे.

जिभ :- मागील बाजूस थोडा पिवळसर थर

भूक :- ठिक

तहान :- ठिक

मल :- ठिक

मूत्र :- ठिक

नेत्र :- अविशेष

नख :- अविशेष

पूर्व व्याधी वृत्त :-

कांजण्या – लहानपणी

आई – डायबिटिज वू मूळव्याध

आजी – हायपरटेन्शन (उच्चरक्तदाब)

पितृकुल :-

आजी – डायबिटिज

रजोवृत्त :-

पाळीची सुरूवात वयाच्या 14 व्या वर्षी झाली.

साधारण 25 दिवसाच्या अंतराने पाळी येऊन 5 दिवस अंगावरुन स्राव जात असे.

पहिले 2 दिवस काळसर व गाठीयुक्त स्राव होणे, ओटीपोट व मांड्या दुखणे अशी लक्षणे असतात.

७.५ वर्षे anti spasmodic म्हणून meftal spas घेतली.

सध्या 2 वर्षापासून combiflam घेत आहेत.

पित्त, कफ, वात हे दोष बिघडून त्यांनी रस, रक्त, मांस, मेद व आर्तव यांमध्ये बिघाड निर्माण केल्याने हि परिस्थिती निर्माण झाली आहे असे निदर्शनास आले.

ॠतुनुसार वमन,विरेचन,नस्य,रक्तमोक्षण व बस्ति करण्याचा सल्ला दिला होता. रुग्णेला अजून मुहुर्त सापडत नसल्याने तिने अजून पंचकर्मे केलेली नाहित.

आता सध्याची स्थिती पाहू.

पनीर इ. खाल्ले. गॅसेस झाले. पोटात दुखू लागले व जुलाब सुरु झाले. मलाला दुर्गंध येऊ लागला. जिभेवर पांढरट थर होता. पोट तपासल्यावर बेंबीच्या उजव्या व डाव्या बाजू जवळील भागात दुखावा होता.

आतडे व मूत्रपिंडाच्या भागात अजीर्णामुळे तयार झालेल्या अपाचित आहाररसाचे सेंद्रिय विष साचल्यामुळे या भागात दुखावा होता.

हे सेंद्रिय विष नष्ट करुन जुलाब क्रमशः बंद करणारी व पचन सुधारणारी औषधी योजना केली.

फक्त एकच रसकल्प वापरला.

2-2 गोळ्या दुपारी व रात्री 1 तास जेवण्यापुर्वी आल्याचा रस व खडीसाखरेसोबत चाटण्यासाठी दिल्या.* एकाच दिवसात जुलाब कमी यायला सुरुवात झाली.

4 दिवसानंतरच्या तपासणीवेळी पोटदुखी नव्हती. जुलाब बंद झालेले होते. गॅसेस अजुन होते. मल दुर्गंधी व हिरवट होता. पोट तपासल्यावर बेंबीच्या उजव्या व डाव्या बाजूस पूर्वीपेक्षा कमी दुखावा होता.

यावेळी पूर्वीच्या औषधासोबत तापातील पाचन औषधी सिद्ध पाणी दिले. नि गॅसेस नाहिसे झाले व मलाची दुर्गंधी नाहिशी होऊन मलाचा हिरवटपणा नाहिसा झाला.

खूप जुनाट व खोलवर बिघाड असल्याने दाबल्यावर जाणवणारा पोटातील दुखावा पूर्णपणे गेला नाही. त्यासाठी चिकित्सा घ्यायला मध्येच रुग्ण उत्साह दाखवतो पण तहान लागल्यावर विहिर शोधण्याच्या सवयीमुळे अजून त्यांना मुहूर्त सापडलेला नाही.

असो परंतु सांगायचा मुद्दा असा कि अचुक निदान व औषधी निवड, औषधी प्रमाण व अनुपान (औषधीसोबत घ्यावयाचे द्रव्य) यांच्यामुळे कमीत कमी औषधात अगदि फास्ट रीझल्ट सुद्धा आयुर्वेदात अनुभवायला मिळतो.*

सर्दि, खोकला, जुलाब, ताप यांसारख्या आजारांसाठी सुद्धा रोगी जेव्हा वैद्याकडे विश्वासाने किंवा आशेने येतात. तेव्हा खरच त्यांचा गौरव करावासा वाटतो.

कारण अशा रुग्णांमुळे आयुर्वेद केवळ जुनाट आजारांवर व स्लो परिणाम देणारे शास्त्र आहे, हा धब्बा पुसण्यासाठी आम्हा वैद्यांना एक सुवर्णसंधी लाभते.

अशाने लवकरच आयुर्वेदिक डाॅक्टर्स केवळ आर.एम.ओ. पदासाठि रुजु करुन घेणारी रुग्णालये स्वतंत्र आयुर्वेदिक विभाग सुरु करण्यात पुढाकार घेतील व अनेक स्वतंत्र आयुर्वेदिक रुग्णालयेही मोठ्या संख्येने सुरु होतील यात शंका नाही.

रसिकहो आजवर माझ्या लेखांना दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल आपला आभारी आहे. पुन्हा येईन लवकरच नविन लेखासह. तोवर आपली रजा घेतो. धन्यवाद!

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!