अमेरिकेकडून घेतली जाणारी नासमास-२ हि मिसाईल प्रणाली काय आहे?

अस्थिर असणारे शेजारी राष्ट्र, सतत होणारी अतिरेकी आक्रमण, आशिया मधलं चीनचं वाढतं सैनिकी सामर्थ्य, सतत धुसमुसणाऱ्या सीमा, जवळपास ७००० किमी पेक्षा जास्त असलेली किनारपट्टी आणि येत्या काळात समोरासमोर युद्ध न करता क्षेपणास्त्र युद्धाचा वाढता धोका अश्या सगळ्या पातळीवर भारताची सुरक्षितता गेल्या काही वर्षात चिंतेचा विषय बनत चालली होती.

पण येत्या काळात भारत सरकारने घेतलेल्या काही पावलांमुळे भारत आता एक सुरक्षित भारत म्हणून उदयास येत आहे. नुकतेच अमेरिकेने भारताला जवळपास १ बिलियन अमेरिकन डॉलर (६००० कोटी रुपये) किमतीची नासमास-२ ही प्रणाली देण्याच मान्य केलं आहे. अमेरिकेची नासमास २, इस्राईल ची बराक, रशियाची एस ४०० ह्यांच्या जोडीला भारताच्या डी.आर.डी.ओ. ची बी.एम.डी. आणि ए.ए.डी. प्रणाली. ह्या सगळ्यांना अवकाशातून गरुडाचे डोळे देणारी इस्रो मिळून २१ व्या शतकातील सुरक्षित भारताच्या उदयाची सुरवात झाली आहे.

पुढल्या काळातील युद्ध ही समोरासमोर क्वचित लढली जातील. कोणत्याही देशावर आक्रमण करायचं झाल्यास क्षेपणास्त्र युद्ध हे पाहिलं पाउल असणार आहे. भारताच्या प्रमुख शहर आणि ठिकाणांवर असा हल्ला जास्तीत जास्त भारताचं नुकसान करू शकतो हे लक्षात घेऊन आपल्या सीमांना तसेच अति महत्वाच्या शहरांना तसेच ठिकाणांना सुरक्षित करण्यासाठी भारताने मल्टी लेअर एअर डिफेंस प्रणाली बनवण्याची सुरवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून अमेरिकेची नासमास २ भारत खरेदी करत आहे. ही प्रणाली दिल्ली मधील अति महत्वाच्या भागांच्या रक्षणेतील सगळ्यात आतलं कवच असणार आहे. तर नक्की काय आहे ह्या वेगवेगळ्या सिस्टीम मध्ये जे भारताला सुरक्षित बनवणार आहेत. ते आपण समजून घ्यायला हवं.

नासमास-२

नासमास २ ही सिस्टीम भारताच्या अति महत्वाच्या भागांच (दिल्ली शहर) रक्षण करण्यासाठी तैनात असणार आहे. ह्यात वेगवेगळे १२ मिसाईल डागणारे प्लाटफॉर्म असून प्रत्येकावर ६ एआयएम १२० एअर तो एअर सरफेस मिसाईल आहेत. ह्यांच्या जोडीला आठ एक्स ब्यांड थ्री डी रडार तसेच गन सिस्टीम, फायर कंट्रोल युनिट असून ह्या सर्वांच नियंत्रण करणारी यंत्रणा ह्यात समाविष्ट आहे. ही सगळी यंत्रणा एखाद्या बिल्डींग मधल्या अतिरेक्याला ते ९/११ सारख्या हल्याला तोंड देण्यास सक्षम आहेत. ह्याच्या भोवती डी.आर.डी.ओ. ने विकसित केलेली आकाश प्रणाली संरक्षण करेल. ह्या पहिल्या लेअर नंतर दुसरी लेअर ची जबाबदारी आहे ती जवळपास ४०,००० कोटी रुपये खर्चून रशिया कडून घेतलेल्या एस ४०० सिस्टीम ची.

एस ४०० ची एक बटालीयन म्हणजे शत्रूच्या चारी मुंड्या चीत. ह्या प्रणाली मध्ये ३ प्रकारची मिसाईल वापरली जातात. सगळ्यात दूरवर मारा करणारी ४० एन ६, दूरवर मारा करणारी ४८ एन ६ तर जवळ मारा करणारी ९ एम ९६ मिसाईल. ही तिन्ही मिसाईल सुपर सॉनिक व हायपर सॉनिक वेगाने म्हणजे तब्बल १४ माख वेगाने ( ध्वनीपेक्षा १४ पट जास्ती वेगाने) १७,००० हजार किमी / तास वेगाने शत्रूकडे झेपावतात.

एक उदाहरण द्यायचं झाल तर हलवारा एअर बेस मध्ये असलेल्या एस ४०० कडून निघालेलं क्षेपणास्त्र पाकिस्तान मधल्या लाहोर वर उडणाऱ्या एफ-१६ विमानाचा फक्त ३४ सेकंदात वेध घेऊ शकते. १२० ते ६०० किमी पर्यंतच्या टप्यात येणार कोणतही विमान, क्षेपणास्त्र किंवा ड्रोन ह्याच्या पासून वाचू शकत नाही. एकाच वेळी ६०० किमितील ३०० वेगवेगळी टार्गेट शोधून तब्बल ८० टार्गेट वर एकाच वेळी खातमा करू शकते. १६० वेगवेगळ्या मिसाईलने एकाच वेळी गाईड करू शकते. ह्यातील स्याम प्रणाली एफ-३५ सारख्या पाचव्या पिढीतील स्टेल्थ (रडार वर न दिसणाऱ्या) फायटर प्लेन ला सुद्धा मारू शकते. एस ४०० ही जरी सिमेवर तैनात असली तरी ही प्रणाली मोबाईल असल्याने देशाच्या संरक्षण सज्जतेत खूप महत्वाचा भाग असणार आहे.

ह्या नंतर तिसऱ्या लेयर मध्ये डी.आर.डी.ओ. ने विकसित केलेली ए.आर.डी. आणि पृथ्वी एअर डिफेन्स प्रणाली संरक्षण करेल. ही प्रणाली २००० -५००० की.मी. च्या टप्यात १५ ते २५ आणि ८० ते १०० की.मी. उंचीवरील कोणत्याही क्षेपणास्त्राला उत्तर देण्यास सक्षम आहे. ह्या नंतर शेवटच्या टप्प्यात इस्राईल आणि भारताच्या डी.आर.डी.ओ. ने विकसित केलेली बराक ८ ही सरफेस टू एअर क्षेपणास्त्र प्रणाली ७५ – १०० किमी. उंचीवरील कोणत्याही क्षेपणास्त्राला हवेत गारद करण्यासाठी ही कार्यान्वित केली गेली आहे.

जमिनीवरील अभेद्य रचनेला अवकाशातून लक्ष आणि माहिती देण्याच काम इस्रो चे आरआयसॅट आणि क्राट्रोसॅट उपग्रह देत आहेत. इस्रो चा आरआयसॅट अवकाशातून ढगांच्या मधून पण जमिनीवर काय चालू आहे ते बघण्यात सक्षम असून क्राट्रोस्याट तर २० सेंटीमीटर पर्यंतचा भाग अवकाशातून दाखवण्यात सक्षम आहे. त्यांच्या जोडीला येत्या नोव्हेंबरमध्ये इस्रो नेक्स्ट जनरेशन मल्टी स्पेक्ट्रल, मल्टी रिझोल्यूशन असणारे सैनिकी उपग्रह अवकाशात सोडत आहे. ह्या उपग्रहांच्या नजरेमुळे युद्ध सुरु होण्याआधीच युद्ध कुठे ते शत्रूची तयारी काय ह्याची खडानखडा माहिती भारताला असणार आहे. ह्या उपग्रहांना संरक्षण देण्यासाठी भारताने आधीच ए- सॅट मिसाईल ची चाचणी घेऊन तैनात केलं आहे.

एकाच वेळी वेगवेगळ्या बनावटीच्या, वेगवेगळ्या क्षमतेच्या अभेद्य अश्या आवरणामुळे भारताच्या अभेद्य तटबंदीला खिंडार पाडणे शत्रूला जवळपास अशक्य होणार आहे. एके काळी कोणीही याव टपली मारून जावं आणि आम्ही निषेध करणार ह्या पोतडी मधून बाहेर पडत भारत आता अभेद्य अश्या सुरक्षित भारताकडे पावलं टाकत आहे.

एस ४०० असो वा नासमास २ ह्या सगळ्या प्रणाली महाग असल्या तरी येत्या ४ ते ५ वर्षात त्या काम करू लागल्यावर त्यांच्या सोबतीला ब्राह्मोस हे स्वनातीत क्षेपणास्त्र बसवलेली सुखोई ३०, राफेल सारखी अत्याधुनिक लढाऊ विमाने, पृथ्वी , अग्नी ५, अग्नी ६ सारखी आंतरखंडीय क्षेपणास्त्र , त्याच्या जोडीला इस्रो चे सैनिकी उपग्रह मिळून एका सुरक्षित भारताचा उदय जागतिक पटलावर करतील ह्याची माझ्या मनात शंका नाही.


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीकिंवा तुमचे स्वतःचे लेखन मनाचेTalks वर प्रकाशित करण्याची इच्छा असल्यासयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय