इस्रायलला जगातला सर्वात सुरक्षित देश बनवणारा हेरगिरीचा सुपरमॅन ‘मिर डगन’

मिर डगन हे नाव भारतीयांसाठी अपरिचित असेल पण जगातील अनेक देशांनी ह्या नावाचा धसका घेतला होता.

हा धसका घेण्यामागे कारण ही तसचं होतं. हेरगिरी आणि गुप्त मिशन तसेच गनिमी काव्या प्रमाणे हल्ला करून शत्रूला नमोहरम करता येऊ शकते हे ज्या संस्थेने पूर्ण जगाला दाखवलं आणि शिकवलं त्या संस्थेच्या जडणघडणीत मिर डगन ची भुमिका महत्वाची होती.

कोण होता हा मिर डगन?

ज्याच्या नावाने भल्या भल्या देशांना घाम फुटत असे अश्या मोसाद ह्या इस्राईलच्या गुप्तचर संस्थेचा अध्यक्ष तो होता. मिर डगन हा इस्रायली गुप्तचर संघटना ‘मोसाद’ चा २००२ ते २०११ पर्यंत अध्यक्ष होता. मोसाद हे नाव ऐकताच पुर्ण जगातील सगळ्यांच्या भुवया उंचावतात आणि ह्याला कारण ही तसेच आहे.

मोसाद ने पुर्ण जगात केलेल्या मिशन चा अभ्यास केला तर मोसाद चं नाव ऐकताच सगळे देश ह्याचा धसका का घेतात हे आपल्याला कळून येईल.

‘मोसाद’ आजही जगातील सर्वोत्तम गुप्तचर संघटना आहे. मोसाद ला सर्वोत्तम बनवण्यात मिर डगन चा सिंहाचा वाटा आहे.

मिर डगन चा जन्म ३० जानेवारी १९४५ ला आत्ताच्या युक्रेन मध्ये झाला. १९५० ला त्याच्या कुटुंबाने इस्राईल ला स्थलांतर केलं. १९६३ ला मिर डगन ने इस्राईल आर्मी मध्ये प्रवेश केला.

१९६७ मध्ये अरब – इस्राईल युद्धात मिर डगन ने कंपनी कमांडर म्हणून आपल्या देशाचं प्रतिनिधित्व केलं. आपल्या बहादुरीने इस्राईल च्या आर्मी मध्ये वर वर जात मिर डगन १९९५ ला इस्राईल आर्मी मधून मेजर जनरल ह्या पदावरून निवृत्त झाला.

मिर डगन ला हातात ग्रेनेड असलेल्या एका मोस्ट वॉन्टेड अतिरेक्याशी निडरतेने दोन हात करण्यासाठी प्रतिष्ठित अश्या मेडल ऑफ ऑनर ने १९७१ ला सन्मानित करण्यात आलं.

मिर डगन ला नंतर इस्राईल पंतप्रधान एरिअल शेरॉन ह्यांनी त्यांची नियुक्ती देशाचे सुरक्षा सल्लागार म्हणून केली व नंतर त्यांची नियुक्ती मोसाद चे अध्यक्ष म्हणून केली गेली.

मिर डगन नी मोसाद ची सुत्रे हातात घेताच संघटने मध्ये अभुतपुर्व बदल केले. मोसाद ला फक्त देशा पुरती मर्यादित न ठेवता त्यांनी त्याची व्याप्ती जगात वाढवली.

इस्राईलसाठी धोकायदाक असणाऱ्या प्रत्येक अतिरेक्याला ते जिथे असतील तिकडे ठेचून मारण्याची रणनिती मोसाद ने आखली. साम, दाम, दंड, भेद अश्या सगळ्या गोष्टींचा वापर करत अश्या अतिरेक्यांना मारण्याच्या अनेक गुप्त मिशनला मोसाद ने मुर्त रूप दिलं.

मिर डगन ह्यांनी मोसाद चं अध्यक्षपद सांभाळल्यावर अवघ्या २ वर्षात ४ परदेशी अतिरेक्यांना मारलं गेलं तसेच इस्राईल वर होणाऱ्या तीन अतिरेकी कारवायांना मोसाद ने आधीच ओळखून त्यांना वेळीच रोखलं.

मिर डगनचं सगळ्यात मोठं क्रेडिट म्हणजे इराण च्या अणुबॉम्ब बनवण्याच्या प्रयत्नांना बसलेली खिळ. मिर डगन च्या नेतृत्वाखाली मोसाद ने इराण च्या अणुबॉम्ब बनवण्याच्या स्वप्नांना खिंडार पाडलं.

असं म्हंटल जातं की मिर डगन जर नसता तर कदाचित २० वर्षांपूर्वी इराण अणवस्त्रधारी राष्ट्र झालं असतं. मिर डगन च्या नेतृत्वाखाली मोसाद ने गुप्ततेने इराण च्या अतिशय महत्वाच्या अश्या पाच अणुसंशोधकांची हत्या घडवून आणली.

तसेच इराण च्या अनेक प्रकल्पात अनेक विघ्न उभी केली. मोसाद ने इराण च्या अणुप्रकल्पाच्या कॉम्प्युटर सिस्टीम मध्ये व्हायरस सोडून पूर्ण प्रकल्प बंद केला.

ह्या सगळ्यामुळे इराण ला एनरिच युरेनियम तयार करण्यात अपयश आलं जे अणुबॉम्बसाठी गरजेचं होतं. मोसाद ने ह्या सगळ्या हमल्याची जबाबदारी घेतली नसली तरी ह्या सगळ्यामागे मोसाद चे अध्यक्ष मिर डगन च डोकं असल्याचं म्हंटल जातं.

२००८ ला मिर डगन च्या नेतृत्वाखाली सिरिया च्या डिफेन्स चे नेतृत्व करणारे इमाद मोर्निना आणि मोहम्मद सुलेमान ह्यांची हत्या करण्यात आली.

ह्या नंतर हमास चा कमांडर मोह्हमद अल मेहमूदची दुबई मध्ये हत्या करण्यात आली. ह्या हत्यामागे मोसादचा हात असल्याचं चौकशीत पुढे आलं पण कुठेच मोसाद चा एकही गुप्तहेर पकडला गेला नाही.

चारही बाजूने अरब राष्ट्रांनी वेढलेला आणि सतत धार्मिक अतिरेक्यांच्या रडारवर असलेला इस्राईल सारखा देश आज ह्या सगळ्यांना पुरून उरला आहे तो त्याच्या मजबूत असलेल्या गुप्तहेर संघटनेमुळे.

मोसाद ह्या इस्राईल च्या गुप्तचर संघटनेने आपली ताकद पूर्ण जगाला दाखवून दिली. आपली ताकद फक्त अतिरेकी कारवाईपुरती मर्यादित न ठेवता सायबर क्राईम, तसेच शत्रु राष्टांची चुकीच्या दिशेने होणाऱ्या वाटचालीवर पण आपण प्रतिबंध करू शकतो हे मिर डगन च्या नेतृत्वाखाली मोसाद ने दाखवून दिलं.

मोसाद मध्ये ७००० पेक्षा जास्त लोकं काम करत असून मोसाद चे गुप्तहेर पुर्ण जगात पसरलेले असुन सतत अश्या देशविरोधी कारवाईवर लक्ष ठेवुन असतात.

मिर डगन ने २००२ ते २०११ पर्यंत मोसादचं नेतृत्व केलं ह्या पूर्ण काळात मोसाद ने अनेक मोहिमा आखल्या.

आपली क्षमता इस्राईल पुरती मर्यादित न ठेवता मिर डगन ने मोसाद ला पूर्ण जगात एक मानाचं स्थान आणि अतिरेक्यांच्या मनात एक भिती निर्माण केली.

मिर डगन ने हेरगिरीचे अनेक संदर्भ आपल्या कर्तृत्वाने बदलवून टाकले. इस्राईल आणि मोसाद ला एका वेगळ्या उंचीवर नेणारा हेरगिरीचा सुपरमॅन मिर डगन १७ मार्च २०१६ ला काळाच्या पडद्याआड गेला.

इस्राईल च्या ह्या हेरगिरीच्या सुपरमॅन मिर डगन ला माझा कुर्निसात.

वाचण्यासारखे आणखी काही..

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीकिंवा तुमचे स्वतःचे लेखन मनाचेTalks वर प्रकाशित करण्याची इच्छा असल्यासयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय