Falcon Heavy Rocket नेत आहे मंगळाच्या कक्षेत टेस्लाची गाडी!

या रॉकेटच्या यशस्वी उड्डाणाने, टेस्ला कंपनीची रोडस्टेर हि तब्बल १००,००० डॉलर किमतीची गाडी “Falcon Heavy “मंगळ आणि सूर्याच्या फिरणाच्या कक्षेत स्थापन करणार आहे. आणि यातून मंगळाच्या दिशेने मानवाचं एक पाऊल पुढे जाण्याची आशा नक्कीच वाढणार आहे..

आजच्या काळातील सगळ्यात शक्तिशाली रॉकेट असा विक्रम आपल्या पाठीवर मिरवणारं Falcon Heavy rocket आज अवकाशात उड्डाणासाठी सज्ज होत आहे. प्रत्येकाला अवकाशात नेण्याच्या दिशेने हे एक महत्वाचे पाऊल असल्याचे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री साधारण ११:३० नंतर फाल्कन हेवीचं उड्डाण अपेक्षित आहे. मंगळावर जाण्यासाठी आखलेली ही पहिली खासगी मोहीम आहे. Billionaire Elon Musk ची कंपनी SpaceX ने ह्या रॉकेटच निर्माण केल आहे. फाल्कन हेवी हे फाल्कन ९ च अद्यावत वर्जन असून त्याचं उड्डाण अनेक गोष्टींनी स्पेशल असणार आहे. मानवाला चंद्रावर नेणाऱ्या Saturn five रॉकेट नंतर इतकी ताकद असणारं हे एकमेव रॉकेट असणार आहे. फाल्कन हेवी मध्ये असं काय आहे ज्यामुळे ते इतक स्पेशल आहे हे जाणून घेणं खूप महत्वाच आहे. कारण येत्या काळातील रॉकेट उड्डाणाची पूर्ण प्रक्रिया बदलवण्याची ताकद ह्या रॉकेट मध्ये आहे.

फाल्कन हेवी हे २३० फुट ( ७० मीटर ) उंच असून ह्याची सगळ्यात मोठी जमेची बाजू म्हणजे ह्याचे तीनही बुस्टर हे परत वापरता येणारे आहेत. आजवरच्या रॉकेट प्रणाली मध्ये आपण बघितल असेल कि रॉकेट ने हवेत अपेक्षित उंची गाठली कि त्याच्या बाजूचे बुस्टर ज्यात इंधन साठवलेल असते. ज्यात इंजिन असते. ते जळून झाल्यावर समुद्रात पडतात. म्हणजे त्याचं कार्य संपून ते नष्ट होतात किंवा त्याचा पुन्हा वापर केला जात नाही. पण या बाबतीत Falcon Heavy वेगळे आहे. फाल्कन हेवी चे तिन्ही बुस्टर हे अपेक्षित उंची गाठल्यावर रॉकेट पासून वेगळे होऊन पुन्हा पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करणार. तसेच जसे वर जाताना ठराविक पद्धतीने गेले होते तसेच तिन्ही बुस्टर जमिनीवर पुन्हा विरुद्ध दिशेने उतरणार. म्हणजे हे बुस्टर पुन्हा एकदा वापरता येणार आहेत. फाल्कन हेवी मधील तिन्ही स्टेज ह्या पृथ्वीवर परतणार असून हा तंत्रज्ञानामधील एक मैलाचा दगड समजला जाणार आहे. ह्या तिन्ही स्टेज पुन्हा वापरण्यात आल्याने रॉकेट उड्डाणाचा खर्च ९० मिलियन डॉलर वर येणार आहे. जो कि सध्याच्या किमतीच्या १/३ आहे. डेल्टा ४ या रॉकेटच्या एका उड्डाणाचा खर्च हा ४३५ मिलियन डॉलर च्या घरात जातो. त्या तुलनेत फाल्कन हेवी खूपच स्वस्त किमतीत चंद्र आणि मंगळाची यात्रा घडवून आणू शकणार आहे.

फाल्कन हेवी इतकं प्रचंड आहे कि ते आपल्यासोबत एक पूर्ण क्षमतेच बोईंग ७३७ विमान सोबत घेऊन त्याला अंतराळात घेऊन जाऊ शकते. नासाने स्पेस शटल प्रोग्राम बंद केल्यावर एस.एल.एस. स्पेस लोंच सिस्टीम बनवत आहे. या सिस्टीममुळे खूप वजनदार गोष्टी अंतराळात घेऊन जाता येऊ शकेल. पण अनेक अडचणीमुळे ह्याचं उड्डाण २०२० च्या आगोदर शक्य नाही. अश्या वेळेस फाल्कन हेवी च यशस्वी उड्डाण खूप महत्वपूर्ण आहे. १८ यशस्वी उड्डाणा नंतर हि “एलन मस्क” ह्यांनी आपल्या मेसेज मध्ये ह्या उड्डाणात काहीही होऊ शकते अस आधीच सांगितल आहे. कारण उड्डाण यशस्वी न होता जर रॉकेट जमिनीवर फुटलं तर ४ मिलियन पौंड टी.एन.टी. इतका शक्तिशाली स्फोट होऊ शकतो. त्यात ह्या उड्डाणाच्या ठिकाणचं काहीच उरणार नाही. इतक हे भयानक असणार आहे.

पण जर यशस्वी झाल तर हे रॉकेट आपल्यासोबत घेऊन जाणार आहे एलन मस्क ह्यांच्या टेस्ला कंपनीची रोडस्टेर हि तब्बल १००,००० डॉलर किमतीची गाडी. ह्या गाडीला हे रॉकेट मंगळ आणि सूर्याच्या फिरणाच्या कक्षेत स्थापन करणार आहे. एलन मस्क ह्यांच्या मते आता टेस्ला ची हि कार बिलियन वर्ष सूर्य आणि मंगळाच्या भोवती प्रदक्षिणा करत राहणार आहे.

फाल्कन हेवी लो अर्थ ओर्बिट मध्ये ६३,८०० किलोग्राम वजन तर जी.टी.ओ. मध्ये २६,७०० किलोग्राम वजन प्रक्षेपित करू शकते. जास्तीत जास्त वजन कमीत कमी पैश्यात प्रक्षेपित करताना “स्पेस एक्स” ने एका नवीन शर्यतीला अंतराळात प्रारंभ केला आहे. फाल्कन हेवी जर यशस्वी झाल तर हा क्षण माणसाच्या रॉकेट विज्ञानात सोनेरी अक्षराने लिहिला जाईल ह्यात शंका नाही. फाल्कन हेवी च्या सर्व वैज्ञानिक, अभियंते आणि खास करून “एलन मस्क” ह्यांना खूप खूप शुभेच्छा.

खालील व्हीडीओ मध्ये फाल्कन हेवी रॉकेट च उड्डाण दाखवणारी अप्रतिम क्लिप. ह्या क्लिप मधील “Booster” खाली परत येण्याचं ग्राफिक मिस करू नका. तंत्रज्ञानातील एक मैलाचा दगड ठरणारं हे तंत्रज्ञान SpaceX चं  वेगळेपण आहे.

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!