स्व-प्रतिमा, सेल्फ रिस्पेक्ट वाढवणाऱ्या पाच सवयी

स्व-प्रतिमा सेल्फ रिस्पेक्ट वाढवणाऱ्या पाच सवयी

तुम्ही अशा परिस्थितीत सापडले असाल तर वेळीच सावध व्हा. गरीब, बिचारं असणं हे तुमच्या अंगी भिनण्याआधी स्वतःवर जाणीवपूर्वक काम करायला सुरु करा. या लेखात मी तुम्हाला पाच सध्या सवयी सांगणार आहे. या सवयी हळूहळू आपल्या अंगी आणा आणि स्व-प्रतिमा सुधारायला, सेल्फ रिस्पेक्ट ने राहायला सुरुवात करा.

एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व्ह केली आहे का? जेव्हा तुमच्यात आत्मविश्वास संचारलेला असतो तेव्हा-तेव्हा तुम्ही जास्त आनंदी असता. थोडं मागे जाऊन आठवून बघा पटेल तुम्हाला.

जेव्हा तुम्ही एखादं काम करायसाठी निघालेले असाल आणि काम होईल अशी आशा किंवा पक्की खात्री वाटते तेव्हा खुश होऊन गाणं गुणगुणत निघाल्याचं आठवत असेल ना!!

खरंतर सद्ध्याचा स्ट्रेसफुल आणि तणावपूर्ण जगण्यात उच्च स्व-प्रतिमा म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट घेऊन जगणं कठीण होऊन जातं.

कामाच्या ठिकाणचं वर्क प्रेशर पेलता पेलता सेल्फ रिस्पेक्ट ला तर गुंडाळून ठेवायची सवयच बरेच जणांनी लावून घेतलेली असते.

गृहिणींनाच विषय घेतला तरी खूप कमी स्त्रिया या त्यांच्या आयुष्यात, कुटुंबात सेल्फ रिस्पेक्ट सांभाळून राहू शकतात.

बरेचदा असा समज किंवा परिस्थिती असते कि जर तुम्ही सेल्फ रिस्पेक्ट बाळगला तर गर्विष्ठ समजून नातेसंबंध खराब होतील किंवा कामाच्या ठिकाणी कामं होणार नाहीत.

आणि आपसूकच तुम्ही सेल्फ एस्टीमने वागणं स्वतःच कमी कमी करत जाता. तुमचं असं वागणं हीच तुमची ओळख होऊन जाते. आणि लोक तुम्हाला अंडरएस्टिमेट करायला लागतात.

तुम्ही अशा परिस्थितीत सापडले असाल तर वेळीच सावध व्हा. गरीब, बिचारं असणं हे तुमच्या अंगी भिनण्याआधी स्वतःवर जाणीवपूर्वक काम करायला सुरु करा.

या लेखात मी तुम्हाला पाच साध्या सवयी सांगणार आहे. या सवयी हळूहळू आपल्या अंगी आणा आणि स्व-प्रतिमा सुधारायला, सेल्फ रिस्पेक्ट ने राहायला सुरुवात करा.

स्व-प्रतिमा, सेल्फ रिस्पेक्ट वाढवणाऱ्या पाच सवयी

१) स्वतःच्या अंगी शिस्त आणा: स्वप्रतिमा उंचावण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या अंगी शिस्त असली पाहिजे. आपण स्वतःच स्वतःला दिलेलं वचन पाळणं म्हणजे शिस्त.

याचं एक छोटंसं उदाहरण तुम्ही नेहमी पाहिलं असेल. जे लोक वर्षानुवर्षे नियमाने नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करतात ते अगदी गरीब असो नाहीतर श्रीमंत, सुशिक्षित असो नाहीतर अशिक्षित जेव्हा ते सांगतात कि ‘मी नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करतो/करते’ तेव्हा ते सांगतानाचा त्यांचा सेल्फ रिस्पेक्ट अनुभवलंय कधी? याचं कारण असतं स्वतःला लावून घेतलेली शिस्त पाळल्याचं समाधान.

मी उद्या सकाळी लवकर उठेल, उद्यापासून मी व्यायामाला नियमितपणे सुरुवात करेल वगैरे वगैरे…

याने काय मिळतं माहितीये??…. समाधान

आपण योग्य काय तसे ठरवून वागतो याचं समाधान तुम्हाला मिळतं. स्वयंशिस्त आणि आनंदी, समाधानी राहण्यात सुद्धा एक लिंक आहे बरंका.

स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीने केलेल्या एका सर्वेक्षणात असं सिद्ध झालं आहे कि जी मुलं लहानपणापासून शिस्तीत वाढलेली असतात ती पुढच्या आयुष्यात चांगले करियर करून सर्व अंगांनी यशस्वी आणि आनंदी जीवन जगतात.

म्हणूनच तुम्ही जर पालक असाल तर लहानपणा पासूनच आपल्या मुलांना अभ्यास कर, होमवर्क कम्प्लिट कर या सवयी लावण्यापेक्षा सेल्फ डिसिप्लिन त्यांच्यात रुजवायला सुरु करा.

तर आता अचानक स्वयंशिस्त अंगी लावणं तुम्हाला कठीण वाटत असेल. बरोबर ना!!

मग उद्या पासूनच एक छोटी आणि चांगली सवय लावण्यापासून सुरुवात करा. अशी सवय जी खूप दिवसांपासून असावी असं वाटतंय पण ते राहूनच जातं.

२) उगाचचं सारखं खोटं बोलणं बंद करा: एक गोष्ट तुम्ही नोटीस केली असेल ज्या लोकांमध्ये सेल्फ रिस्पेक्ट असतो इतकंच नाही तर दुसरेही त्यांचा रिस्पेक्ट करतात ते लोक खरं बोलणारे असतात. त्यांच्या शब्दाला किंमत असते.

कधी कधी असं होऊ शकतं कि एखादी गोष्ट योग्य पद्धतीने करण्यासाठी खोटं बोलणं कुठेतरी गरजेचं होऊन जातं. पण उच्च स्वप्रतिमा असणारे लोक यातूनही अर्धसत्याचा मार्ग निवडतात.

सेल्फ रिस्पेक्ट वाढवून आपली पर्सनॅलिटी डेव्हलप करायचे असेल तर वारंवार खोटं बोलण्याची सवय सोडणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे.

३) स्वतःवर प्रेम करा: स्वप्रतिमा उंचावण्याच्या मार्गातला महत्त्वाचा टप्पा म्हणजे स्वतःवर प्रेम करणं. आपण जसे असू, आपले शरीर जसे असेल तसे स्वतःला स्वीकारा.

चुकीच्या सवयी नक्कीच बदलायच्या पण आपले शरीर, परिस्थिती हे जर तुम्ही बदलू शकणार नसाल तर ते आहे तसे स्वीकारून स्वतः स्वतःचे बेस्ट फ्रेंड बना.

तुमचा चेहेरा, रंग, जाड असणं, बारीक असणं, बेढब असणं हे आधी स्वतः स्वीकारा त्याशिवाय जग ते स्वीकारणार नाही.

तुम्हाला विनाकारण छळणाऱ्या लोकांसमोर त्यांच्या वागण्यामुळे आपण त्यांच्या पेक्षा कमी आहोत असे वाटून स्वतःची लाज वाटली तरी ते दिलदारपणे स्वीकारा.

कारण आपण माणूस आहोत. आज हि व्यक्ती आपल्या समोर वरचढ असली तरी काही लोकांसमोर आपणही वरचढ असतोच कि…

याने होईल असं कि तुम्हाला बुली (Bully) करणाऱ्या लोकांसमोर सुद्धा तुम्ही खंबीर राहू शकाल.

जेव्हा तुम्हाला वाईट वाटेल अशी एखादी गोष्ट घडेल तेव्हा त्यावर मिश्किल टिप्पणी करून सडेतोड उत्तर देण्याची सवय करा.

हळूहळू तुमच्यातला स्वमान आपोआपच तुमच्या वागण्यात बदल घडवेल.

४) जिंकण्याची सवय करवून घ्या: छोटी छोटी ध्येय पूर्ण झाल्याचं समाधान खूप मोठं असतं. आपली प्रत्येकाची सुप्त इच्छा असतेच नेहमी जिंकण्याची.

मग त्या इच्छा पूर्ण करा. आपसूकच स्वतःच्या नजरेत तुमचा मान वाढेल.

आता एक छोटीशी एक्झरसाईझ करून बघा. कागद, पेन घ्या आणि तुमच्या आत्तापर्यंतच्या सर्व उपलब्धी लिहून काढा छोट्या पासून मोठ्या पर्यंत, आठवून.

कदाचित काही अकम्प्लिशमेंटवर तुम्हाला हसू पण येईल. स्वतःची ओळख होत जाईल आणि स्वमान पण वाढेल.

५) स्वतःच स्वतःला गिफ्ट द्या: जेव्हा तुमच्याकडून एखादं चांगलं काम होइल, एखादं ध्येय पूर्ण होइल, कुठलीही प्रयत्नपूर्वक केलेली पॉझिटिव्ह गोष्ट पूर्ण होइल तेव्हा स्वतःच स्वतःला काहीतरी गिफ्ट द्या.

ठरवून हॉटेलमध्ये जा, एखादा आवडलेला ड्रेस, शर्ट विकत घ्या.

स्वतःसाठी एखादं परफ्युम घ्या. हि गोष्ट छोटी आहे. पण लॉन्ग टर्मला तुमच्या खूप फायद्याची ठरणारी आहे.

तर या पाच सवयी तुम्हाला तुमचा सेल्फ रिस्पेक्ट वाढवायला नक्की मदत करतील.

या पाच सवयी मी आज तुम्हाला सांगितल्या पण याशिवाय सुद्धा खूप छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला अनुभवातून सापडतील.

पुढे एखाद्या लेखात आपण त्याबद्दल बोलूच. याशिवाय तुम्ही यासाठी केलेल्या काही गोष्टी असतील तर ते कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका.

धन्यवाद आणि शुभेच्छा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

6 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.