आपल्याच जवळ असलेल्या सुखाचा शोध आपण का घेतो?

माणसाला सुख हवं असतं, म्हणजे नेमकं काय हवं असतं?

समजा उद्या त्या ‘अलाउद्दीन’ चा चिरागातील जिन अचानक आपल्या समोर उभा झाला आणि विचारू लागला, ‘बोलो मेरे आका क्या हुकूम है !’ तर काय मागणार आपण त्याला?

ज्याला नोकरी हवी आहे असा एखादा बेरोजगार तरुण नोकरी मागणार, ज्या बापाच्या उपवर मूलीचं लग्न होत नाही, तो म्हणेल लग्न होऊ दे एकदाच मग बस, सुख आहे आणि मी आहे.

कोणी जुनाट आजाराने ग्रस्त असेल तर म्हणेल बस एकदा हा आजार पळाला की जमलं बुवा आपलं, मग मी सुखाला मस्त मिठी मारणार.

अशी एक ना अनेक सुखाच्या गोष्टींची यादी प्रत्येकाजवळ आहे, अगदी किराण्याची यादी असते तशी.

समजा उद्या या सर्व गोष्टी पूर्ण झाल्या तर, मग आपण सुखी होणार आहोत का?

त्या आजाराने ग्रस्त माणसाचीच गोष्ट घेऊ, समजा आपल्या जिन महोदयांनी त्याला त्या आजारातुन मुक्ती दिलीच की तो होणार आहे का सुखी?

नाही लगेच दुसरी कुठली तरी गोष्ट वर उफाळून येईल व त्याच्या व सुखाच्या मधोमध ठाम उभी राहील. थोडक्यात काय ‘ये प्यास है बडी!!’

मला आठवते मी ज्यावेळी पीएच. डी. चे काम करत होतो, मला वाटायचं एकदा का ही पीएच. डी. झाली की बस, आपण सुखाला सुखाने अजमावणार, पण कसलं काय.

पीएच. डी. झाली, पण ते रितेपण ती पोकळी काही संपली नव्हती, ती तशीच होती जशी पूर्वी होती तशी.

लहानपणी आजी गोष्ट सांगायची एक राक्षस होता त्याला एकदाच भूक लागायची म्हणे पण ती भूक मात्र कधीच सरत नव्हती घरातलं सर्व अन्न, धान्य, वस्तू काही द्या त्याची भूक तेवढीच.

नोकरी, लग्न, मूलबाळं सर्व गोष्टी बरोबर असल्या तरी देखील आपण सुखी होऊ शकत नाही. म्हणजे सुख हे काल्पनिक असावं का ?

सुख शोधत फिरणाऱ्या माणसाला दुःख मात्र स्वतः शोधत येते. म्हणजे देवाच्या आळंदीला निघावे व चोराच्या आळंदीला पोहचावे तसे.

“सुख शोधाया जाती आणि रडती परोपरी!” अशी आपली अवस्था होते. एखाद्या प्रापंचिकाला सहज विचारावे, ‘काय सुरू आहे हल्ली?’

उत्तर तेच ठरलेलं ‘नाही, तसं काही नाही, ठीक सुरू आहे सर्व’ या ‘ठीक’ शब्दाच्या खाली अनेक विवंचना दबल्या असतात. कोर्ट कचेरीच्या लटकलेल्या कामापासून, तर न ऐकणाऱ्या तरुण मुलापर्यंत.

सुख असंच कुठल्या तरी खुंटीला आपण टांगून ठेवलेलं असतं, अश्या एक ना अनेक खुंट्या प्रत्येकाच्या मनात खोल रुतलेल्या असतात.

आज आता या वेळी मी खरोखर सुखी आहे, आनंदी आहे, असे आपण खरंच खात्रीने सांगू शकू का?

सुखी माणसाचा सदरा सापडत नाही, कारण संपूर्ण सुखी माणूस कुठे गवसत नाही.

‘जगी सर्व सुखी असा कोण आहे?’ असे समर्थांनी म्हटले, पण जगी सर्व दुःखी तरी कोण आहे?

न-कळत आपल्याला सवय लागते, जगातील सर्व दुःख शोधत शोधत माझ्याच घरी येतात, असे वाटत राहते.

असे माझ्याच सोबत का होते ? असे प्रश्न पडू लागतात. एकदा असे ठाम मत झाले की मग मात्र साक्षात ब्रम्हदेवही कोणाला सुखी करू शकत नाही.

भूतकाळ व भविष्य यांच्या दोन ध्रुवांवर गटांगळ्या खाणाऱ्या मनाचे वर्तमानात, स्थिरावल्या शिवाय सुख काही घरात उतरू शकत नाही.

आपल्याला सुख हवं असत म्हणजे नेमकं काय हवं असतं?

ज्या अटी व शर्तीवर आपण सुखी व्हायचे ठरवले असते त्या प्राप्त झाल्यानंतर देखील आपण सुखी होतो का ?

वाळवंटातील ओऍसिस सारखं परत परत आपल्या हातून निसटून जाणारं हे सुख, आपल्याला वाकवल्या दाखवत दूर पडून जाते.

विक्रमाने उत्तर दिल्यावर त्याच्या पाठीवरचा वेताळ पडून जातो तसा, हा खेळ असाच सुरू राहतो. दिवसा मागून दिवस जातात, महिन्या मागून महिने, वर्ष सरत जातात, पण आपला सुखाचा शोध मात्र काही सरत नाही.

हे असं धावत असतांना स्वतःला क्षणभर थांबवावे, खदखद हलवावे, व विचारावे अरे किती धावशील?

काय हवं तरी काय तुला? या प्रश्नाचे उत्तर बऱ्याच वेळा स्पष्ट मिळत नाही.

का? कारण आपलीच गरज आपल्याला कळालेली नसते.

मग नाहीच काही कळत असेल तर काय करावं ? मस्त शांत बसावं.

कधी लवकर उठून सूर्योदय पाहावा, एखादे फुलफाखरू निरखून पाहावे, फुलांचा सुगन्ध घ्यावा, थंड हवेचा स्पर्श अनुभवावा क्षुल्लक वाटणाऱ्या या गोष्टी अनेक दिवसांपासून आपण केलेल्या नसतात.

बाजरीची भाकर व हिरव्या मिरचीचा ठेचा या सारखं सुख नाही म्हणणाराही असतोच.

मन क्षणात या आताच्या क्षणात स्थिरावले की आपण क्षणस्थ होतो मागचा पुढचा विचार फारसा त्यावेळी येत नाही.

पुढे तर भविष्यात अमुक तमूक गोष्टी झाल्या की आपण सर्व सुखी होणार आहोतच, पण आज आता याक्षणी थोडे का होईना पण सुखी होण्यास काय हरकत आहे ?

नवीन वर्षात एवढे करून पाहण्यास काय हरकत आहे?

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “आपल्याच जवळ असलेल्या सुखाचा शोध आपण का घेतो?”

  1. खुप छान,सुख कुठेही इतरत्र नसते ते आपल्या जवळचं असते फक्त आपल्याला ते दिसत नसते.

    Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय