हट जाएंगे तो बिखर जाएंगे पर डट जाएंगे तो निखर जाएंगे (प्रेरणादायी)

प्रेरणादायी

जेव्हा कधीतरी हिम्मत कच खाऊ लागेल तेव्हा एवढंच लक्षात ठेवा की चालत राहणं गरजेचं आहे… चालत राहीलं तर शिखर दिसेलंच …..जेव्हा कधी हिम्मत कच खाऊ लागेल तेव्हा मनाला समजवा कि आजचा दिवस हा येणाऱ्या यशाची एक पायरी आहे…. सोनीयाचे दिन यायला वेळ लागेल पण जेव्हा ते येतील तेव्हा वेळच बदलेल.

जेव्हा आपण पाणी गरम करतो तेव्हा हळूहळू तापमान वाढू लागतं. आणि २११℃ ला आलं की पाणी पूर्णपणे गरम होतं पण अगदी २१२℃ झाले की ते लगेच उकळायला लागतं.

आणि या उकळलेल्या पाण्याची वाफ होते. पूर्वी वाफेची इंजिनं चालायची…. आणि हीच मजल दरमजल करत शेवटी बनलेली वाफ या इंजिनांना चालवायची.

फरक फक्त या एका डिग्री चा असतो पण एवढ्या एका फरकाने बनलेली वाफ शक्तिशाली होतेच की नाही!!!

आपल्या आयुष्यात हे नेहमीच होतं की आपण दररोज आपल्या स्वप्नांसाठी मेहेनत करत असतो कष्ट करत असतो. कधीतरी कष्टाचं चीज होईल म्हणून माणूस प्रयत्नांची पराकाष्ठा करतो.

पण जेव्हा यश हाती लागत नाही तेव्हा कुठेतरी वाटायला लागतं की, राहू देत… यापुढे माझ्याकडून नाही होणार.

आणि माणूस स्वतःला समजावू लागतो की खूप प्रयत्न करून झाले.

आतापर्यंत तर काम तडीस जायलाच हवे होते. आतातर मला थांबलंच पाहिजे. एवढ्या जीवापाड केलेल्या कष्टाचं चीज काही होत नाहीये……

म्हणतो आपण, “माझ्या हाताला ना यशच नाही!!”
काहीही करा शेवटी, पहिले पाढे पंचावन्न…

पण मित्रांनो यशाचा २१२° पण आपल्याला समजायला हवा. आपल्या मेहेनतीचं फळ आपल्याला रोज नाही मिळणार. पण आपली रोज केलेली मेहेनत आपल्याला त्या शिखरापर्यंत नक्की घेऊन जाईल.

तुम्ही जे-जे करताय, जे तुम्हाला साध्य करायचंय, जे तुमचं स्वप्न आहे त्यापर्यंत पाहोचण्यासाठी नक्कीच प्रवास सोपा असणार नाहीये.

पण त्यासाठी तुमची रोजची मेहेनत, हिम्मत हेच तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जाईल. या मधल्या काळात तुम्हाला तुमच्या काही ईच्छा, आवडी निवडी यांचा त्यागही करावा लागेल.

यात रोज स्वतःला तुटण्यापासून सांभाळावे लागेल. नीट विचाराअंती कुठलाही निर्णय घ्यावा लागेल. आणि मग कुठे तुम्ही तुमच्या २१२° पर्यंत जाऊन पोहोचाल!

पण एकदाका या विनिंग पॉईंटला तुम्ही पोहोचलात की मग मात्र सगळं बदलून जाईल. यश त्यांनाच मिळतं जे त्या एका रात्रीसाठी कित्येक रात्री जागतात.

ऑलम्पिकच्या गोल्ड मेडलिस्टला ते मेडल जिंकण्यासाठी जीवापाड मेहनत घ्यावी लागते, कलाकार सुपरस्टार होतो तरी तो काही सगळेच हिट सिनेमे देत नाही.

कुठल्याही क्षेत्रात जिंकतो तोच, जो त्या दिवसासाठी कित्येक दिवस मेहेनत घेतो तपस्या करतो. या यशाच्या मागे २१२° चा खडतर प्रवास प्रत्येक यशस्वी माणसाला करावाच लागतो.

पण हा प्रवास न थांबता, न डगमगता आणि न हरता करावा लागतो यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी!

जेव्हा कधीतरी हिम्मत कच खाऊ लागेल तेव्हा एवढंच लक्षात ठेवा की चालत राहणं गरजेचं आहे… चालत राहीलं तर शिखर दिसेलंच…..

जेव्हा कधीतरी हिम्मत कच खाऊ लागेल तेव्हा मनाला समजवा कि आजचा दिवस हा येणाऱ्या यशाची एक पायरी आहे….. सोनीयाचे दिन यायला वेळ लागेल पण जेव्हा ते येतील तेव्हा वेळच बदलेल….

एवढंच मनात असू द्या कि, ‘हट जायेंगे तो बिखर जायेंगे पर डट जायेंगे तो निखर जायेंगे’

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!