शीळ

नजरेला नजर मिळाली तर ?
गालांवर आली लाली तर ?
भेटायाला हरकत नाही !
पण कोणा शंका आली तर?
रात गेली , बात गेली , पण
दुपार चांदण्यात न्हाली तर ?
माझा मी शब्द कसा देवू ?
अर्थांची गल्लत झाली तर ?
मी जपीन हृदयी गुपित म्हणा
पण ओठी शीळ निघाली तर ?
वाचण्यासारखे आणखी काही…..
भांडण शब्दांचं…..
शेतकरी
माझी म्हातारी

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा
'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा