शिक्षणसम्राटांच्या नाही तर लोकांच्या सहभागातून चालणारी अमेरिकेची शिक्षणपद्धती

आधुनिक शिक्षण पद्धती

अमेरिकन शिक्षण पद्धती आणि भारतातील शिक्षण पध्दती मध्ये काय फरक आहे?

शिक्षण हा सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यातून शालेय शिक्षण म्हणजे तर भावी जीवनाचा पाया.

म्हणूनच शाळांचं व्यवस्थापन जितकं उत्तम प्रकारे केलं जाईल तितकंच शैक्षणिक दृष्ट्या मुलं सुजाण होतील. आणि मुलांना त्यांच्या मनाप्रमाणे आनंदाने शिकता येईल.

आपण सर्वांनी इंटरनेटवर अमेरिकेतील शाळांचे फोटो पाहिलेच असतील.

प्रशस्त आणि स्वच्छ वास्तू पाहूनच मन प्रसन्न होतं. साहजिकच मनात विचार येतो की इतक्या सुंदर प्रकारे इथल्या शाळांचं व्यवस्थापन कसं काय करत असतील?

या शाळांमधून कोणते विषय शिकवतात?

अभ्यासा व्यतिरिक्त मुलांना इतर कोणत्या सोयीसुविधा दिल्या जातात?

या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या लेखातून मिळतील.

अमेरिकेत पहिली ते बारावी पर्यंतचे शिक्षण मोफत आहे.

साहजिकच तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग, जर विद्यार्थ्यांकडून फी घेतलीच जात नाही तर या शाळांचा खर्च चालतो तरी कसा?

तर इथल्या प्रत्येक विभागातील सर्व रहिवासी प्रॉपर्टी टॅक्स भरतात.

या कराचा काही भाग व सरकारकडून मिळणारे आर्थिक सहाय्य यातूनच या शाळांचा सर्व खर्च केला जातो.

शाळांचं व्यवस्थापन संपूर्णपणे लोकसहभागातून केलं जातं. प्रत्येक विभागातील जे नागरिक कर भरतात ते ही सर्व जबाबदारी उचलतात.

काही नागरिक स्वेच्छेने उमेदवारी अर्ज भरतात. यांच्यातूनच मतदान प्रक्रिया राबवून बोर्ड ऑफ मेंबर्स निवडले जातात.

ज्या लोकांना शालेय व्यवस्थापन करण्याची इच्छा असते ते बोर्ड ऑफ मेंबर्सच्या निवडणुकीत सहभागी होतात. मताधिक्यानुसार ही निवड केली जाते.

शाळेसाठी कोणता खर्च करायचा, पैसे कोणत्या कामासाठी वापरले जात आहेत त्याची नोंद ठेवायची, विद्यार्थी व शिक्षकांचे प्रश्न सोडवायचे अशा विविध स्वरूपाची कामे हे मेंबर्स करतात.

एकमेकांच्या सहकार्याने उत्तम रितीने शालेय व्यवस्थापन पार पाडलं जातं.

आता जाणून घेऊया अमेरिकेतील शाळांमध्ये काय काय शिकवतात.

इथे शालेय अभ्यासक्रमात चारच विषय शिकवले जातात.

गणित, विज्ञान, इंग्लिश आणि समाजशास्त्र. पण याखेरीज अनेक वेगवेगळ्या कला, क्रीडा, भाषा यांचा अभ्यासही केला जातो.

दर आठवड्याला एक कलावर्ग भरतो. यात चित्रकला, पेंटिंग किंवा विविध कलात्मक वस्तू बनवायला शिकवतात.

त्याचप्रमाणे आठवड्यातून कमीतकमी दोन वेळा जिम क्लास असतो. यात विविध प्रकारचे शारीरिक क्रीडाप्रकार शिकवले जातात. सर्वांगीण व्यायाम होण्यासाठी हे फार महत्वाचे आहे.

अमेरिकेत शाळांमध्ये संगीत या विषयाला खूप महत्त्व दिले जाते.

अगदी लहान वयात म्हणजे पहिलीपासून मुले संगीत शिकतात.

यानंतर चौथीपासून पुढच्या विद्यार्थ्यांना एकतरी म्युझिकल इन्स्ट्रुमेंट वाजवता येणे आवश्यक आहे. विद्यार्थी त्यांच्या आवडीनुसार वाद्य निवडतात.

ते एकतर हे वाद्य विकत घेऊ शकतात किंवा शाळेकडून भाडेतत्त्वावर वाद्ये पुरविण्यात येतात. परंतु शिक्षण संपूर्णतः मोफत असते. कोणत्याही प्रकारची फी आकारली जात नाही.

मिडलस्कूल व हायस्कूल मध्ये कोणतीही एक परदेशी भाषा शिकण्याचा पर्याय मुलांना दिला जातो.‌

यात फ्रेंच, स्पॅनिश किंवा जर्मन यापैकी त्यांना आवडणारी कोणतीही भाषा ते निवडू शकतात.

यावरुन तुमच्या लक्षात आले असेल की अमेरिकेत शालेय शिक्षण प्रगत स्वरुपाचे आहे.

फक्त प्रश्नोत्तरे, घोकंपट्टी किंवा भाराभर विषय शिकवण्यापेक्षा सर्वांगीण विकास होईल हे पाहिले जाते.

इथले शिक्षण मुलांची वैचारिक क्षमता वाढवणारे आहे. तसेच एक व्यक्ती म्हणून समृद्ध होण्यासाठी फक्त पुस्तकी किडा असून चालत नाही.

तर शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकास समानतेने होणे गरजेचे असते. इथल्या शिक्षणपद्धतीत या सर्व घटकांचा खोलवर विचार केला जातो.

संगीत, भाषा व कला यांचे अध्ययन करणारी व्यक्ती रसिकतेने जीवनाचा आस्वाद घेऊ शकते. आणि अमेरिकेत शाळांमध्ये कोवळ्या वयातच मुलांना या सर्व विषयांची तोंडओळख करून दिली जाते.

त्यामुळे व्यक्तिमत्त्व विकासाचा पाया इथे खऱ्या अर्थाने घातला जातो.

त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे या शाळा लोकसहभागातून आणि शासनाच्या मदतीने चालतात. ज्यामुळे शक्षणाचा बाजार मांडला जाऊन, सामान्य माणसासाठी आवाक्याच्या बाहेर जात नाही.

अमेरिकीतली शिक्षण पद्धती तुम्हाला कशी वाटली, अमेरिकन शिक्षण पद्धती आणि भारतातील शिक्षण पध्दती यातील कोणता भाग तुम्हाला चांगला वाटतो? ते कमेंट करून नक्की सांगा.

भारतीय शिक्षण व्यवस्थेतील दोष काय आहेत आणि त्यांच्यावर कोणती उपाययोजना असायला हवी? यावरही चर्चा करा.

लेख आवडला तर नक्की लाईक व शेअर करायला विसरू नका.

बघा जपानमध्ये शाळा कशा असतात

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!