विश्वासाची शक्ती- भाग १

विश्वासाची शक्ती

एक कमी वस्ती असलेले खेडेगाव असते. छोटे खेडेगाव असल्यामुळे संध्याकाळचे ६ वाजत आले कि गाव सुनसान होवून जाते. गावाच्या वेशीबाहेर एक विहीर असते जिला आजू बाजूला कट्टा नसतो.

एके दिवशी त्या गावातील एक मुलगा उशिरा घरी येत असतो. गावाच्या वेशीबाहेर गडद अंधार असतो. त्या मुलाचा रस्ता चुकतो व तो विहिरीत पडतो. त्या मुलाला पोहता येते हे नशीब होते पण किती वेळ? कारण ते छोटे खेडेगाव, लोक सर्व आटपून उशिरा गावाबाहेर जातात.

तो मुलगा पोहत असतो व जोर जोरात मदतीसाठी ओरडत असतो, पण जवळपास कोणीही नसते.

त्याच्याकडे २ पर्याय असतात

१) मदत येई पर्यंत पोहत राहणे.
२) बुडून मरून जाने.

तुम्हाला माहित आहे तो किती वेळ पोहत राहिला

तब्बल १६ तास…….. हो तब्बल १६ तास…….. विश्वास नाही बसत?

तुम्हाला उदाहरण देतो…..

कुठलाही आंतरराष्ट्रीय सामना खेळणारा खेळाडू घ्या किंवा कमांडो घ्या ह्यांचा दररोजचा, एकही सुट्टी न घेता कमीत कमी ८ तास ते जास्तीत जास्त ला मर्यादा नाही इतका सरावच शारीरिक आणि त्यापलीकडे मानसिक स्तरावरचा असतो.

ह्या लोकांचे आयुष्य हे ९९ % मानसिक तर १ % कृती असते म्हणून ते जे काही करतात त्यांचे नाव हे जगात होते व तितकाच पैसा आणि प्रसिद्धी ते मिळवतात.

मानसिकतेला पर्याय नाही.

जेव्हा २ जगप्रसिद्ध खेळाडू हे समोरासमोर असतात तेव्हा त्यांचे कौशल्य हे एकसारखेच असते फक्त त्यांचा सामना हा एकमेकांच्या मानसिकते विरुद्ध असतो. त्यावेळेस जो हे मनातले युद्ध जिंकतो तोच सामना जिंकून विजेतेपद, पैसा आणि प्रसिद्धी घेवून जातो.

अजून एक उदाहरण म्हणजे आतापर्यंत एव्हरेस्ट हे शिखर पार केलेले (अंदाजे) ७ अपंग गिर्यारोहक. जे शिखर सर करण्यासाठी शारीरिक दृष्ट्या अपंग नसलेल्या गिर्यारोहकांचा जीव जातो तिथे ७ अपंग गिर्यारोहकांनी एव्हरेस्ट शिखर सर केले आहे.

मानसिक दृष्ट्या सक्षम कसे बनायचे?

जर तुम्हाला मानसिक दृष्ट्या सक्षम बनायचे असेल तर तुम्हाला सतत संकटांचा सामना करावा लागेल, धोके पत्कारावे लागतील, तेव्हाच तुम्हाला तुमच्या मर्यादा ह्या दिसून येतील.

जेव्हा जीवावर येते तेव्हा तुमचे मन, अंतर्मन, मेंदू हा वेगळ्या प्रकारे काम करतो. इथे कुठलीही युक्ती वापरू शकत नाही. जर तुम्ही जिवंत राहिलात तरच तुम्हाला तुम्ही मानसिक दृष्ट्या सक्षम आहात हे समजून येईल, येथे दुसरा मार्ग नाही आहे.

तो विहरीत पडलेला म्हणजे तुम्ही आणि विहीर म्हणजे तुमची आजची संकटाची परिस्थिती असे समजा.

उदाहरणार्थ विहीर म्हणजे कुठल्याही शैक्षणिक परीक्षा, यूपीएससी, एमपीएससी किंवा इतर प्रवेश परीक्षा आणि तो मुलगा म्हणजे तुम्ही, उद्योग व्यवसाय आणि गुंतवणूक ह्यामधील अपयश, संकटे म्हणजे विहीर आणि उद्योजक, व्यवसायिक आणि गुंतवणूकदार म्हणजे तुम्ही, खाजगी आयुष्यामधील समस्या, नातेसंबंधा मधील समस्या, प्रेम किंवा वैवाहिक जोडीदार ह्यांच्या मधील समस्या आणि इतर कुठल्याही समस्या ज्याने तुम्ही झुंझत असाल त्या. विहिरीत पडलेला मुलगा म्हणजे तुम्ही, ह्या समस्यांच्या विहरीत तुम्ही पडलात तर चौकटी बाहेर विचार करून किंवा क्षमते बाहेर मानसिक आणि शारीरिक शक्ती वापरून वर या नाही तर कोणीतरी येईपर्यंत त्या विहिरी मध्ये पोहत राहा पण हार माणू नका…..

हो हि तुमची क्षमता आहे, हि ह्या पृथ्वीतलावर जन्म घेतलेल्या प्रत्येक मनुष्य प्राण्याची क्षमता आहे.

जेव्हाही तुम्ही संकटात असाल तेव्हा लक्ष्यात असू द्या कि तुम्ही त्या संकटांपेक्षा मोठे आणि शक्तिशाली आहात, सर्व शारीरिक आणि मानसिक मर्यादे पलीकडे जावून संकटांचा सामना करा, नक्कीच ते संकट तुमच्यासमोर हरून जाईल व पुढील आयुष्यात संकटे येताना हजारदा विचार करतील.

वाचण्यासारखे आणखी काही…

मानसिकरीत्या मजबूत असलेल्या लोकांच्या तेरा सवयी!..
आनंदी जीवनाचे पंचवीस सोपान…..
विचार करा आणि श्रीमंत व्हा! – भाग २ (Think And Grow Rich)


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!