‘गुगल पे’ च्या या सुविधांबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

सरकारच्या चलन बंदीच्या (demonetization) निर्णयानंतर देशात डिजिटल पेमेंट स्वीकारण्यात वाढ झाली. क्रेडिट आणि डेबिट कार्ड्सबरोबरच पेटीएम सारख्या मोबाइल वॉलेट आणि पेमेंट् लोक वापरू लागली.

‘तेझ’ चा बोलबाला गेल्या वर्षात याच मुळे वाढला. पण डिजिटल पेमेंट च्या या स्पर्धेत टिकण्यासाठी वेगवेगळ्या कंपन्या आपलं काहीतरी वैशिष्ट प्रस्तापित करण्याचा प्रयत्न करत आहेत. तेझ म्हणजेच सध्याच्या गुगल पे ने देखील आपल्या अॅपची खासियत म्हणून काही वैशिष्ट जाहीर केले आहेत. तुम्हाला त्याबद्दल माहित आहे? नाही? मग जाणून घ्या.

गुगल पे आणि तत्काळ कर्ज

  • भारताच्या आर्थिक बाजारपेठेतील सहभाग वाढविण्यासाठी, गुगलने नवीन वैशिष्ट्ये सादर करत ‘तेझ’ एका नवीन रुपात भारतासमोर आणले.
  • या नवीन गूगल पे ने आपले क्षेत्र ‘पेमेंट’ पुरते मर्यादित न ठेवता त्याचा विस्तार वाढवला आहे. खाजगी बँकांसोबत भागीदारी करत, गुगल पे च्या ग्राहकांना त्वरित कर्जाची सुविधा देण्याची ग्वाही गुगल पे ने दिली.
  • या अॅप वापरुन ग्राहक एचडीएफसी, आयसीआयसीआय, फेडरल बँक आणि कोटक महिंद्रा बँकेकडून कमीत कमी पेपरवर्क करून त्वरित कर्ज मिळवू शकतील. गूगल चे नवीन कर्ज वैशिष्ट्य काही आठवड्यांमध्ये योग्य वापरकर्त्यांकडे आणले जाईल, असा दावा गुगल च्या पदाधिकार्यांनी केला होता.
  • ही सेवा सुरु झाल्यावर पात्र वापरकर्त्यांना एक सूचना प्राप्त होईल, ज्यामध्ये तुमचे कर्ज पूर्व-मंजूर(pre-approved) आहे किंवा नाही हे कळेल.
  • कर्जाची रक्कम आणि परतफेड कालावधी किती असावी हे वापरकर्त्यांनी ठरवावे.
  • कर्जाच्या अटींचे पुनरावलोकन केल्यानंतर, कोणत्याही अतिरिक्त कागदाची गरज न भासता अपेक्षित कर्जाची रक्कम ग्राहकाच्या बँक खात्यात पैसे जमा होईल, असे आय.ए.एन.एस.ने सांगितले.

देशातील नैसर्गिक आपत्तींसाठी मदत निधी

  • गुगल पे वापरून नैसर्गिक आपत्तीग्रस्त प्रदेशात निधी पोहचविण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली होती. या मान्सूनमध्ये केरळ किंवा नागालँड मधील पूरग्रस्ताना मदत निधी पोचविण्याची सुविधाही गूगल पे वर उपलब्ध होती.
  • तुमची मदत देशातील कोणत्याही कोपऱ्यापर्यंत पोचवायची असेल तर आता गूगल पे चा वापर करून तुमची मदत आपत्तीग्रस्तांपर्यंत सुरक्षित आणि खात्रीशीर पोहचेल याची जबाबदारी गुगल पे घेते.

विविध प्रकारची बुकिंग

  • गुगल पे आता आपल्याला मोबाइल मधेच आपल्या विमान प्रवासाचे बोर्डिंग पास आणि अॅप मधील इतर समारंभांची तिकिटे संग्रहित करते.
  • सध्या साउथवेस्ट एयरलाईन, सिंगापूर एअरलाइन्स, साउथवेस्ट, इव्हेंटब्राईट, टिकेटमास्टर आणि फोर्टेस जीबी यासारख्या काही कंपन्यांनी पुढाकार घेतला आहे, परंतु येत्या काही महिन्यांमध्ये आणखी अनेक कंपन्या या वैशिष्ट्यात सामील होतील.
  • या मध्ये पास किंवा तिकिटे मागविण्याकरता वेबसाइट्समधून “माझ्या फोनवर तिकीट पाठवा” पर्याय निवडू शकता किंवा गुगल पे तिकिटास समर्थन देणाऱ्या कंपन्यांमधून ईमेलद्वारे तसा पर्याय निवडू शकता.
  • आपण आपल्या तिकिटांवर प्रवेश करू इच्छित असल्यास फक्त ‘पास’ टॅबवर टॅप करा.

तंत्रज्ञानाने काही गोष्टी केवळ सोप्या नाहीत तर सहजही केल्या आहेत. मात्र तंत्रज्ञानाचा वापर करताना योग्य ती सावधानता बाळगणे आवश्यक आहे. तसे न केल्यास विनाकारण नुकसान होऊन मनस्ताप होऊ शकतो.

सौजन्य :www.arthasakshar.com

वाचण्यासारखे आणखी काही…

शेअरबाजार: कधीही धोका न पत्करणे हेच खरे धोकादायक
शेअर-बाजार : वेळ साधणे (timing) नव्हे, वेळ देणे (time) महत्वाचे

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय