मार्च एंड – थकना मना है

march-end-thakana-mana-hai

रात्रीच्या आठ वाजता कुणाल ऑफिस बिल्डिंग च्या पायऱ्या भरभर उतरत खाली आला आणि पार्किंग लॉट मध्ये उभ्या असलेल्या आपल्या ‘बॅलेनो’ मध्ये जाऊन बसला. कार चे दार बंद करून जोरात ओरडला…

“आईचा भो** या बॉस च्या…!! भे*** समजतो काय स्वतःला..!!”

कुणाल चे डोळे अपमानाने लाल झाले होते. स्टेरिंग वर ठेवलेले त्याचे हाथ रागाने थरथरत होते.

“साला बॉस आहे म्हणून काय झालं, गुलाम आहे का मी त्याचा.” कुणाल स्वतःच्या मनाशीच बोलला.

मोबाईल काढून त्याने वॉट्स अँप वर त्याच्या टीम च्या ग्रुप वर मेसेज पाठवला..

“आय डोन्ट वॉन्ट एनी फाकिंग रीजन्स. आय वॉन्ट रिजल्ट्स. डू द हेल व्हॉट यु वॉन्ट टू डू बट इच अँड एव्हरीवन शुड कम्प्लिट देर टार्गेट्स टिल मार्च एन्ड. इफ यु वॉन्ट एनी सपोर्ट देन कॉल मी. आय विल बी देर फॉर यु गाईस.”

२९ वर्षांचा “कुणाल” गेल्या पाच वर्षांपासून एका नामांकित कंपनी मध्ये एरिया सेल्स मॅनेजर म्हणून काम करत होता. त्याने त्याच्या हार्डवर्क आणि डेडिकेशन च्या जोरावर स्वतःची एक वेगळीच छाप कंपनीमध्ये पडली होती. कंपनीकडून मिळणारा बक्कळ पगार आणि सेल्स च्या जोरावर मिळणारा दाबून इन्सेन्टिव्ह, त्यामुळॆ कुणाल ची लाईफ एकदम व्यवस्थित चालली होती. मागच्या वर्षी तर त्याला ‘मॅनेजर ऑफ द इयर’ अवॉर्ड पण मिळाला होता. त्याच्या टीमशी त्याची ट्युनिंग पण व्यवस्थित होती.

पण यावर्षी कुठे पाल चुकचुकली कोणास ठाऊक. यावर्षी मार्केट मध्ये एकदम मंदी आली होती. मार्केट एकदम शांत झाले होते. दरवर्षी मार्च महिना येईपर्यंत १००% टार्गेट पूर्ण करणारी कुणालची टीम यावर्षी साधी ५०% वर पण पोहचली नव्हती. त्यामुळे यावर्षी कुणालवर खूप प्रेशर आले होते. असंही नाही कि कुणालला अंडर प्रेशर काम करण्याची सवय नव्हती, त्याने यापूर्वी पण खूप वेळा अंडर प्रेशर काम केले होते आणि सेल्स म्हटल्यावर प्रेशर असतंच हे सगळ्यांनाच माहिती असतं. पण यावेळेसची कंडिशन खूपच क्रिटिकल होती.

दिवसेंदिवस कुणालच्या डोक्यावरचं प्रेशर वाढू लागल होतं. एरवी दिवसातून एकदा होणारे कॉन कॉल (कॉन्फरन्स कॉल) एप्रिल महिन्यापासून वाढू लागले होते. सकाळी ७ वाजता, दुपारी एक वाजता आणि रात्री ११ वाजता डेली कॉन कॉल होऊ लागले. टार्गेट्स, रिपोर्ट्स, डेटा, कंमिटमेंट्स सगळ्या गोष्टींची देवाण-घेवाण सुरु झाली. लिव्हच तर कोणी नाव च काढायचं नाही अशी सक्त ताकीद कुणाल आणि त्याच्या टीम ला मिळाली होती.

मार्च महिन्यामध्ये तर कहरच झाला होता. रविवारी मिळणारी थोडीफार विश्रांती पण आता संपली होती, कारण दर रविवारी बॉसने ऑफिसमध्ये रिव्यू मिटिंग ठेवली होती आणि मार्च एन्डला लागून आलेल्या ‘महावीर जयंती’ आणि गुडफ्रायडे’च्या पण सुट्ट्या कॅन्सल केल्या होत्या.

आजच्या रिव्यू मीट ला तर हद्दच झाली होती. बॉसने कुणालची पार आई-बहीण एक केली होती. खूप भोसडाला होता त्याला. खूप अपमान केला होता त्याचा. या अपमानाच्या रागामध्ये कुणाल आपल्या गाडीमध्ये धुमसत बसला होता.

“असंही नाही यार कि फक्त माझंच टार्गेट पूर्ण नाही, कुठल्याच टीमचं टार्गेट पूर्ण नाही. मलाच कायम का पॉईंट आऊट करावं बॉसने. त्या मंदारचा तर माझ्यापेक्षा कमी सेल झाला आहे, बॉस त्याला एका शब्दाने काही बोलला नाही. हम्म…. मी त्याच्यासारखी बॉसची चाटत नाही ना त्यामुळे तो माझ्यावर चढतोय…”

कुणाल गाडीत बसल्या बसल्या स्वतःशीच बोलत होता.

कुणाल आता या मार्च एन्डच्या प्रेशर खाली खूप दबला होता. त्याचं स्वतःच्या खाण्यापिण्याकडे पण अजिबात लक्ष नव्हता. आज सकाळपासून तो फक्त दोन कप कॉफीवर होता, पण त्याला या गोष्टीचं अजिबात भान नव्हत. त्याच्या अंडर चा एरिया पण बराच मोठा होता त्यामुळे त्याचा प्रवास कायम होत राहायचा. रात्र-रात्र प्रवास करणे, दिवसभर फिल्डवर काम करणे आणि रात्री डेटा-रिपोर्ट तयार करून पाठवणे, असं एकंदरीत कुणालचं शेड्युल बनलं होता. सकाळी लवकर उठून डेली कॉन कॉल व्हायचे त्यामुळे कुणालची झोप पण पूर्ण होत नव्हती.

कुणालने त्याचं घड्याळ चेक केलं, रात्रीचे साडे आठ वाजले होते.

कुणालच्या मनामध्ये विचारांचं काहूर माजलं होतं. जसं जसं त्याच्या डोक्यावरचं प्रेशर वाढत होतं तसं तसं त्याच्या पायाचं प्रेशर एक्सएलरेटरवर वाढत होतं.

“कधी कधी तर वाटतं द्यावी हि कंपनी सोडून आणि स्वतःचं काहीतरी सुरु करावं, पण छे…!! हे फ्लॅटचे ई.आम.आई. गाडीचे हफ्ते कसे भरणार मग, त्यात आता सुनैनाने पण लग्न करण्यासाठी यावर्षीचाच अल्टिमेटम दिला आहे. आता या कंपनी मध्ये मी व्यवस्थित सेटल आहे. एरिया सेट झाला आहे. पण आता हे कुत्र्यासारखा जगणं नाही सहन होत, कसं करू…!!”

कुणालची गाडी आता वेग पकडत होती. गाडीने ११० चं स्पीड कधीच पकडला होतं पण कुणालला याचं भानच नव्हतं.

“साला मोरॉन बॉस, सहा महिने झाले मी अजून एकदा पण घरी गेलो नाही, कि घरदार फक्त तुला एकट्यालाच आहे आणि आम्ही काय वाऱ्यावर सोडून दिलेले आहोत काय..!!”

कुणालचे डोळे आता ओले होऊ लागले होते आणि गाडीचं स्पीड वाढू लागलं होतं. तेवढ्यात कुणालचा मोबाईल वाजू लागतो. कुणाल मोबाईलकडे पाहतो तर स्क्रीनवर ‘बॉस’ असं नाव झळकत असतं. तो काही क्षण तसाच मोबाईल कडे पाहत राहतो. फोन उचलू कि नको याचा विचार करत असतो.

तर त्याचं लक्ष एकदम समोर जातं आणि तो कचकन ब्रेक दाबतो. गाडी कर्रर्रर्रर्रर्रर्र असं आवाज करत टायर घासत पुढे जाते आणि टायर किंचितसा डिव्हायडरला घासून जातो. कुणाल रस्त्याच्या कडेला गाडी उभी करतो.

गाडीमध्ये ए.सी. सुरु असतानापण कुणालला दरारून घाम फुटलेला असतो. तो गाडीच्या काचा खाली करतो आणि वाऱ्याची थंड झुळूक त्याच्या अंगाला स्पर्श करून जाते.

कुणाल सिगारेट पेटवतो आणि थोडा रिलॅक्स होतो. काहीसा विचार करून तो त्याच्या लॅपटॉप बॅग मधून लॅपटॉप उघडतो आणि रेसिग्नेशन लेटर टाईप करू लागतो, तेव्हा गाडीमध्ये सुरु असलेल्या रेडिओ मधल्या रॉकस्टार गाण्याचे शब्द त्याच्या कानी पडतात…

“इन गद्दारों मे या उद्धरोन मे,

तुम मेरे जिने कि आदत का क्यूँ घोट रहे दम,

बेसलिका मैं, उस गली का मैं ना जिसमे हया ना जिसमे शरम,

मन बोले के रस मे जिने का हर्जाना दुनिया दुश्मन,

सब बेगाना इन्हे आग लगाना,

मन बोले, मन बोले, मन से जिना या मर जाना है.”

याही कथा तुम्हाला खूप आवडतील ….🎁🎁

कट ‘नियतीचा’
बॅरिकेड्स – भयकथा
सांत्वन

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

2 Responses

  1. Mahesh Arun Sukase says:

    Barobar ahe aplich lok apli martat mg he another state ch job krta ani ky mi tr kanatslo asl jobla

    • Rajaram shinde says:

      स्वतःचे उद्योग सुरू करा असले जॉब कधीच करू नका, मी पण 10 वर्षे असले काम केले आहे आता 1 वर्षे पूर्ण झाले जॉब सोडून आता स्वतःची ओळख प्रयोगशील शेतकरी म्हणून करायची आहे…..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!