अमेरिकेनंतर पहिली लिगो लॅब उभारली जाते आहे आपल्या महाराष्ट्रातील हिंगोलीमध्ये…

लिगो

लिगो म्हणजेच Laser Interferometer Gravitational – Wave Observatory. जगातील तिसरी लिगो अमेरिकेनंतर नासा भारतात उभारत आहे. अमेरिकेबाहेर पहिल्यांदा अशी अद्यावत लिगो भारतात आपल्या महाराष्ट्रात बनणार आहे. महाराष्ट्राच्या हिंगोली तालुक्याच्या औंधनागनाथ इकडे लिगो आकाराला येत आहे. जवळपास १३०० कोटी रुपयांची जगातली महाग अशी प्रयोगशाळा आपल्या महाराष्ट्रात आकाराला येत असताना सो कॉल्ड मराठी आणि महाराष्ट्राचा अभिमान बाळगणाऱ्या लोकांना त्याची पुसटशी कल्पनाही नाही. नासाचे वैज्ञानिक आणि भारतातून डी.ए.ई. चे अधिकारी ह्यांची वर्दळ गेल्या काही वर्षापासून ह्या भागात सुरु आहे. इथल्या जवळपासच्या लोकांना नासा काहीतरी मोठ्ठ प्रोजेक्ट करत आहे इतकीच जुजबी माहिती आहे. पण वैश्विक संशोधनाला कलाटणी देणारी ही अत्याधुनिक प्रयोगशाळा आपल्या माजघरात आकार घेत असताना त्याची उत्सुकता आणि त्याबद्दल जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे.

लिगो म्हणजे नक्की काय?

लिगो

लिगो म्हणजे नक्की काय? हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी ग्रॅव्हिटेशनल व्हेव (गुरुत्वीय लहरी) समजून घ्याव्या लागतील. विश्वात अश्या अनेक घटना घडत असतात की ज्या माणसाच्या कल्पनेच्या पलीकडल्या आहेत. एकूणच विश्वाची निर्मिती आणि त्यात असलेल्या अनेक गूढ गोष्टी ह्याबद्दल अजूनही बरेच संभ्रम आणि तिकडं ज्ञान आहे. २१ व्या शतकातील तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे शोधाची अनेक नवीन दालनं उघडी झाली आहेत. त्यातलं एक दालन म्हणजेच लिगो. गेल्या शतकात विख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन ह्यांनी भाकीत केलं होतं कि जेव्हा वैश्विक घटना म्हणजे कृष्णविवरांच (Black Holes) मिलन किंवा न्युट्रॉन ताऱ्यांची टक्कर अश्या घटना घडतील तेव्हा स्पेस – टाईम मध्ये त्यांच्या प्रचंड वस्तुमानामुळे आणि त्यांच्याकडे असलेल्या प्रचंड गुरूत्वीय बलामुळे लहरी तयार होतील. नदीच्या पाण्यात दगड टाकल्यावर जसे पाण्यात तरंग निर्माण होतात त्याच पद्धतीने ह्या लहरी तयार होऊन विश्वाच्या पोकळीत प्रवास करतील. जेव्हा ह्या लहरी ग्रह तारे ह्यांना आदळतील तेव्हा स्पेस – टाईम मध्ये विश्व जेली च्या बॉल सारख आकुंचन आणि प्रसरण पावेल. ते ज्या लहरींनी होईल त्यांना गुरुत्वीय लहरी अस म्हंटल गेलं.

पूर्ण विश्वात तरंग उमटवायला विश्वात होणारी उलथापालथ ही तितकी प्रचंड असली पाहिजे. गुरूत्वीय लहरी त्यामुळे ओळखणं कठीण आहे. कारण ह्या तरंगामुळे पृथ्वीचं होणार आकुंचन आणि प्रसरण हे अवघ एका फोटोन च्या आकाराचं असू शकतं. तसेच ह्या तरंगाची क्षमता ही त्या उलथापालथी वर अवलंबून आहे. तर अश्या घटना जेव्हा विश्वाच्या पटलावर घडतात तेव्हा त्याचे तरंग गुरुत्वीय लहरींच्या स्वरूपात प्रकाशाच्या वेगाने प्रवास करतात. आधी म्हंटल तसे पृथ्वीवरही हे तरंग सतत आदळत असतात पण ते ओळखणं आधी तंत्रज्ञानाला शक्य नव्हतं. कारण एका फोटोन च्या आकारात होणारा फरक मोजणारी यंत्रणा आपल्याकडे नव्हती. पण विज्ञान जसं पुढे जात आहे त्यामुळे आत्ता आपण तशी यंत्रणा निर्माण करू शकत आहोत. त्यामुळे ह्या लहरी जेव्हा जेव्हा पृथ्वीवर आदळतील तेव्हा तेव्हा पृथ्वीच्या होणाऱ्या आकुंचन आणि प्रसरण ह्यावरून त्या लहरींचा स्त्रोत ते नक्की केव्हा ही लहर अस्तित्वात आली ह्याबद्दल सांगू शकतो.

२०१५ साली जेव्हा लिगो तयार होऊन काम करायला लागल तेव्हा पहिल्यांदा आपल्याला हि व्हेव पृथ्वीवर कळाली. हि गुरुत्वीय लहर १.३ अब्ज वर्षांपूर्वी दोन कृष्णविवरांच्या मिलनातून तयार झाली होती. म्हणजे १.३ अब्ज वर्षापूर्वी निघालेली हि व्हेव तब्बल ३ लाख किलोमीटर प्रती सेकंद ह्या वेगाने पृथ्वीवर यायला इतकी वर्ष लागली. आत्तापर्यंत प्रकाश हे एकच माध्यम घेऊन आपण विश्वाकडे बघत आलो आहोत. पण जेव्हा ह्या वेव्ह ने १.३ अब्ज वर्षापूर्वीची माहिती पृथ्वीवर पोचवली त्या वेळेस आपण एका नवीन दरवाजातून विश्वाकडे बघू लागलो. आईनस्टाईन ने ते स्वप्न बघितल आणि लिगो ने तो दरवाजा शोधला. ४ जानेवारी २०१७ ला जेव्हा तिसरी वेव्ह लिगो ने शोधली ती तब्बल ३ अब्ज वर्षापूर्वी तयार झाली होती. म्हणजे त्यावेळेचा पूर्ण इतिहास हि वेव्ह आपल्या सोबत घेऊन प्रवास करत होती. ह्या वेव्ह च्या अभ्यासातून अनेक गोष्टी आपल्याला समजणार आहेत ज्याबद्दल आपण अजून अनभिज्ञ आहोत. गुरूत्वाकर्षणाकडे बघण्याचा आपला दृष्टीकोनच पूर्ण बदलून जाणार आहे.

भारतासाठी अभिमानाची गोष्ट हि कि लिगो तयार करण्यात भारतीय वैज्ञानिक अग्रेसर आहेत. आईनस्टाईन च्या ज्या थेअरी ऑफ रीलेटीवीटी वर आपण आज हे शोधू शकलो आहेत. ते लिगो उपकरण बनवण्यात भारतीय वैज्ञानिकांचं योगदान प्रचंड आहे. जगातील १००० हून अधिक वैज्ञानिकात भारताच्या अनेक संशोधकांनी आपलं योगदान दिलं आहे. लिगो मध्ये दोन आर्म काटकोनात चार किलोमीटर चे असतात. जेव्हा ग्रेव्हीटेशनल वेव्ह पृथ्वीवर आदळते. तेव्हा तिच्या आदळण्याने ह्या आर्म च्या लांबी मध्ये फरक होतो. हाच फरक लेझर, मिरर आणि अतिसूक्ष्म बदल नोंदवणाऱ्या उपकरणांनी बंदिस्त केला जातो. आनंदाची बातमी अशी कि असं लिगो भारतात बांधण्यासाठी युनियन केबिनेट ने फेब्रुवारी २०१६ मध्ये मंजुरी दिली आहे. ६७ वैज्ञानिक १३ प्रयोगशाळा जश्या ( DAE,TIFR, IIT Bombay, IIT Madras, IUCAA Pune, RRCAT Indore, UAIR Gandhinagar, IIT Gandhinagar, IIT Hydreabad etc.) ह्यात सहभागी आहेत. २०२२ मध्ये लिगो तयार झाल्यावर अश्या वेव्ह चा अभ्यास भारतीय वैज्ञानिकांना भारतात आणि महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रात करता येणार आहे.

आईनस्टाईन ने बघितलेलं आणि अभ्यासलेल स्वप्न आता प्रत्यक्षात आपण अनुभवतो आहोत. ह्या विश्वाच्या पसाऱ्यात आपल्याला माहित असलेल्या गोष्टी खूप कमी आहेत. आजवर प्रकाश ह्या एकाच दरवाज्याने आपण विश्व बघत आलो. पण आता ग्रेव्हीटेशनल व्हेव मुळे अजून एक दरवाजा उघडला गेला आहे. ह्यातून विश्व समजून घेणे मोठे रंजक असणार आहे. ह्यात भारतीय वैज्ञानिक आणि संशोधक तितकाच समतोल वाटा उचलत आहेत हे बघून खूप छान वाटले. विश्वाच्या ह्या नव्या दरवाज्याचं स्वप्न बघणारा आईनस्टाईन आणि ते प्रत्यक्षात उतरवणारे लिगोचे सर्वच भारतीय संशोधक ह्यांना सलाम.

वाचण्यासारखे आणखी काही…

खगोल / अंतराळ
ललित
आरोग्यरहस्य

मनाचेTalks च्या लेखांबद्दल वाचकांच्या प्रतिक्रिया….

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

7 COMMENTS

  1. very nice hingolichya lokanna changlya shikshanachi soy hoil mhanje navin kahi shikayla milel aani jag bharach loka hingolit yetil aani tithala pratyek manus changlya prakare pragati karu shakel

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.